Samsung Galaxy J2 Core - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 Aug 2018 10:23:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग चा पहिला एंडरॉयड गो फोन गॅलेक्सी जे2 कोर फक्त 6,190 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j2-core-with-android-oreo-go-edition-launched-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j2-core-with-android-oreo-go-edition-launched-in-india-in-marathi/#respond Tue, 28 Aug 2018 10:23:04 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1838 कंपनी ने गॅलेक्सी जे2 कोर 6,190 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post सॅमसंग चा पहिला एंडरॉयड गो फोन गॅलेक्सी जे2 कोर फक्त 6,190 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कडून खुप दिवसांपासून बातमी येत होती की कंपनी एंडरॉयड गो एडिशन वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा गॅलेक्सी जे2 कोर नावाने टेक बाजारात सादर करेल. त्यानुसार आज सॅमसंग इंडिया ने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. गो एडिशन मुळे हा फोन कमी स्पेसिफिकेशन्स वर पण फास्ट प्रोसेसिंग करू शकेल. कंपनी ने गॅलेक्सी जे2 कोर 6,190 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर चे ​फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता याची सर्वात मोठी खासियत हीच आहे की हा फोन एंडरॉयड ओेरियो (गो एडिशन) वर चालतो. कंपनी ने हा 5-इंचाच्या टीएफटी डिस्प्ले सह सादर केला आहे आणि फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 540 x 960 पिक्सल आहे. हा फोन सॅमसंग च्या एक्सनोस 7570 प्रोसेसर वर चालतो आणि फोन मध्ये 1जीबी रॅम देण्यात आला आहे. हा फोन 8जीबी स्टोरेज सह येतो, सोबत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर मध्ये 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला जो एफ/2.2 अपर्चर सह उपलब्ध आहे. कॅमेरा सोबत तुम्हाला एलईडी फ्लॅश पण मिळेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा पण एफ/2.2 अपर्चर सह येतो. डाटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये ड्यूअल सिम सोबत 4जी वोएलटीई देण्यात आली आहे. त्याचबरोबर वाईफाई ब्लूटूथ आणि जीपीएस पण आहे.

एंडरॉयड गो मुळे हा फोन कमी स्पेसिफिकेशन्स व हलका प्रोसेसर असूनही बिनदिक्कतपणे लॅग फ्री वापरता येतो. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 2,600 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर आज पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल. हा गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 6,190 रुपयांमध्ये विकत घेता येईल. गॅलेक्सी जे2 कोर सॅमसंग वेबसाइट सोबतच रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

The post सॅमसंग चा पहिला एंडरॉयड गो फोन गॅलेक्सी जे2 कोर फक्त 6,190 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j2-core-with-android-oreo-go-edition-launched-in-india-in-marathi/feed/ 0
सॅमसंग च्या पहिल्या एंडरॉयड गो फोन चे स्पेसिफिकेशनस आले समोर, गॅलेक्सी जे सीरीज मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-first-android-go-edition-smartphone-galaxy-j-series-specification-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-first-android-go-edition-smartphone-galaxy-j-series-specification-leak-in-marathi/#respond Mon, 25 Jun 2018 13:41:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1045 सॅमसंग आपला हा स्मार्टफोन गॅलेक्सी जे सीरीज अंतर्गत लॉन्च करेल आणि हा कंपनी चा पहिला स्मार्टफोन असेल जो एंडरॉयड गो एडिशन वर लॉन्च होईल.

The post सॅमसंग च्या पहिल्या एंडरॉयड गो फोन चे स्पेसिफिकेशनस आले समोर, गॅलेक्सी जे सीरीज मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जवळपास एक महिन्यापूर्वी सॅमसंग बद्दल बातमी आली होती की ​दिग्गज कंपनी एका स्वस्त डिवाईस वर काम करत आहे जो एंडरॉयड गो आधारित असेल. हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट पण करण्यात आला होता ज्यात फोन च्या स्पेसिफिकेशनस ची माहिती मिळाली होती. तसेच पुन्हा एकदा सॅमसंग च्या स्मार्टफोन बद्दल लीक समोर आला आहे ज्यात फोन च्या स्पेसिफिकेशन्स संबंधी महत्त्वाची माहिती आहे.

टेकीड्राईव ने सॅमसंग च्या या आगामी स्मार्टफोन ची माहिती आपल्या रिपोर्ट मध्ये शेयर केली आहे. या वेबसाइट ने सॅमसंग च्या एसएम-जे260एफ मॉडेल नंबर वाल्या स्मार्टफोन ची स्पेक्स शीट शेयर केली आहे. या शीट मध्ये सांगण्यात आले आहे की सॅमसंग चा हा आगामी स्मार्टफोन 5-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाईल. लीक नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच 1.4गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7570 चिपसेट वर चालेल.

सॅमसंग च्या या फोन मध्ये 1जीबी रॅम सांगण्यात आला आहे, तसेच फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. मॉडेल नंबर नंतर फोन मधील रॅम पण हा स्मार्टफोन सॅमसंग चा एंडरॉयड गो फोन असेल याकडे इशारा करत आहे. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा त्याचबरोबर फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा सांगण्यात आला आहे.

बोलले जात आहे की सॅमसंग आपला हा स्मार्टफोन गॅलेक्सी जे सीरीज अंतर्गत लॉन्च करेल आणि हा कंपनी चा पहिला स्मार्टफोन असेल जो एंडरॉयड गो एडिशन वर लॉन्च होईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,600एमएएच ची बॅटरी असल्याची माहिती पण या स्पेक्स शीट मध्ये आहे. अंदाज लावला जात आहे की सॅमसंग हा फोन 5,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत बाजारात आणेल.

माहितीनुसार हा स्मार्टफोन गॅलेक्सी जे2 कोर नावाने लॉन्च केला जाऊ शकतो तसेच भारता सह नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका सारखे बाजार सॅमसंग च्या या एंडरॉयड गो स्मार्टफोन साठी प्रमुख लक्ष्य असतील. पण सॅमसंग कधी हा फोन लॉन्च करेल याची या माहितीसाठी सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग च्या पहिल्या एंडरॉयड गो फोन चे स्पेसिफिकेशनस आले समोर, गॅलेक्सी जे सीरीज मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-first-android-go-edition-smartphone-galaxy-j-series-specification-leak-in-marathi/feed/ 0
सॅमसंग बनवत आहे इंडिया स्पेशल एंडरॉयड गो स्मार्टफोन, 5,000 रुपयांपेक्षा कमी बजेट सह शाओमी ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j2-core-android-go-edition-smartphone-india-launch-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j2-core-android-go-edition-smartphone-india-launch-soon-in-marathi/#respond Thu, 17 May 2018 06:11:14 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=490 माहितीनुसार गॅलेक्सी जे2 कोर भारता सह नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका मध्ये पण लॉन्च केला जाईल.

The post सॅमसंग बनवत आहे इंडिया स्पेशल एंडरॉयड गो स्मार्टफोन, 5,000 रुपयांपेक्षा कमी बजेट सह शाओमी ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आज ही घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 21 मे ला भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे ज्यात कंपनी इनफिनिटी डिसप्ले वाले स्मार्टफोन सादर करेल. जरी सॅमसंग ने फोन्स ची नावे सांगितली नसली तरी अंदाज लावला जात आहे की यादिवशी गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6+, गॅलेक्सी जे6 किंवा गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे सॅमसंग कडून अजून एक बातमी समोर आली आहे ज्यात सांगितले आहे की कंपनी एका एंडरॉयड गो स्मार्टफोन वर पण काम करत आहे जो लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

सॅम मोबाइल ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की कोरियन कंपनी सॅमसंग एका एंडरॉयड गो स्मार्टफोन वर काम करत आहे. हा फोन खासकरून इंडियन यूजर्स साठी बनावाला जात आहे जो येणार्‍या काही आठवड्यांमध्ये भारतात आॅफिशियल केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार भारतात हा स्मार्टफोन गॅलेक्सी जे2 कोर नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण सॅमसंग ने अजूनतरी या स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु हा रिपोर्ट समोर आल्यानंतर आपण म्हणू शकतो की सॅमसंग लवकरच गॅलेक्सी जे2 कोर सादर करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर बद्दल बोलायचे तर हा फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर एसएम-जे260जी मॉडेल नंबर सह आधीच लिस्ट करण्यात आला आहे. या वेबसाइट नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो (गो एडिशन) वर सादर करण्यात येईल जो 1जीबी च्या रॅम मेमरी ला सपोर्ट करेल. गीकबेंच var या फोन ला सिंगल-कोर मध्ये 625 स्कोर तर मल्टी-कोर मध्ये 1,747 स्कोर देण्यात आला आहे. पण फोन चे अन्य स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत.

सॅमसंग च्या एंडरॉयड गो फोन बद्दल बोलले जात आहे की कंपनी भारतीय बाजारात हा फोन 5,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर करेल. माहितीनुसार गॅलेक्सी जे2 कोर भारता सह नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका मध्ये पण लॉन्च केला जाईल. पण सॅमसंग च्या या स्वस्त स्मार्टफोन साठी अजून थोडी वाट बघावी लागेल.

The post सॅमसंग बनवत आहे इंडिया स्पेशल एंडरॉयड गो स्मार्टफोन, 5,000 रुपयांपेक्षा कमी बजेट सह शाओमी ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j2-core-android-go-edition-smartphone-india-launch-soon-in-marathi/feed/ 0