जवळपास एक महिन्यापूर्वी सॅमसंग बद्दल बातमी आली होती की दिग्गज कंपनी एका स्वस्त डिवाईस वर काम करत आहे जो एंडरॉयड गो आधारित असेल. हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट पण करण्यात आला होता ज्यात फोन च्या स्पेसिफिकेशनस ची माहिती मिळाली होती. तसेच पुन्हा एकदा सॅमसंग च्या स्मार्टफोन बद्दल लीक समोर आला आहे ज्यात फोन च्या स्पेसिफिकेशन्स संबंधी महत्त्वाची माहिती आहे.
टेकीड्राईव ने सॅमसंग च्या या आगामी स्मार्टफोन ची माहिती आपल्या रिपोर्ट मध्ये शेयर केली आहे. या वेबसाइट ने सॅमसंग च्या एसएम-जे260एफ मॉडेल नंबर वाल्या स्मार्टफोन ची स्पेक्स शीट शेयर केली आहे. या शीट मध्ये सांगण्यात आले आहे की सॅमसंग चा हा आगामी स्मार्टफोन 5-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाईल. लीक नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच 1.4गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7570 चिपसेट वर चालेल.
सॅमसंग च्या या फोन मध्ये 1जीबी रॅम सांगण्यात आला आहे, तसेच फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. मॉडेल नंबर नंतर फोन मधील रॅम पण हा स्मार्टफोन सॅमसंग चा एंडरॉयड गो फोन असेल याकडे इशारा करत आहे. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा त्याचबरोबर फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा सांगण्यात आला आहे.
बोलले जात आहे की सॅमसंग आपला हा स्मार्टफोन गॅलेक्सी जे सीरीज अंतर्गत लॉन्च करेल आणि हा कंपनी चा पहिला स्मार्टफोन असेल जो एंडरॉयड गो एडिशन वर लॉन्च होईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,600एमएएच ची बॅटरी असल्याची माहिती पण या स्पेक्स शीट मध्ये आहे. अंदाज लावला जात आहे की सॅमसंग हा फोन 5,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत बाजारात आणेल.
माहितीनुसार हा स्मार्टफोन गॅलेक्सी जे2 कोर नावाने लॉन्च केला जाऊ शकतो तसेच भारता सह नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका सारखे बाजार सॅमसंग च्या या एंडरॉयड गो स्मार्टफोन साठी प्रमुख लक्ष्य असतील. पण सॅमसंग कधी हा फोन लॉन्च करेल याची या माहितीसाठी सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.