सॅमसंग ने आज ही घोषणा केली आहे की कंपनी येणार्या 21 मे ला भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे ज्यात कंपनी इनफिनिटी डिसप्ले वाले स्मार्टफोन सादर करेल. जरी सॅमसंग ने फोन्स ची नावे सांगितली नसली तरी अंदाज लावला जात आहे की यादिवशी गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6+, गॅलेक्सी जे6 किंवा गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे सॅमसंग कडून अजून एक बातमी समोर आली आहे ज्यात सांगितले आहे की कंपनी एका एंडरॉयड गो स्मार्टफोन वर पण काम करत आहे जो लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.
सॅम मोबाइल ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की कोरियन कंपनी सॅमसंग एका एंडरॉयड गो स्मार्टफोन वर काम करत आहे. हा फोन खासकरून इंडियन यूजर्स साठी बनावाला जात आहे जो येणार्या काही आठवड्यांमध्ये भारतात आॅफिशियल केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार भारतात हा स्मार्टफोन गॅलेक्सी जे2 कोर नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण सॅमसंग ने अजूनतरी या स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु हा रिपोर्ट समोर आल्यानंतर आपण म्हणू शकतो की सॅमसंग लवकरच गॅलेक्सी जे2 कोर सादर करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर बद्दल बोलायचे तर हा फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर एसएम-जे260जी मॉडेल नंबर सह आधीच लिस्ट करण्यात आला आहे. या वेबसाइट नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो (गो एडिशन) वर सादर करण्यात येईल जो 1जीबी च्या रॅम मेमरी ला सपोर्ट करेल. गीकबेंच var या फोन ला सिंगल-कोर मध्ये 625 स्कोर तर मल्टी-कोर मध्ये 1,747 स्कोर देण्यात आला आहे. पण फोन चे अन्य स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत.
सॅमसंग च्या एंडरॉयड गो फोन बद्दल बोलले जात आहे की कंपनी भारतीय बाजारात हा फोन 5,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर करेल. माहितीनुसार गॅलेक्सी जे2 कोर भारता सह नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका मध्ये पण लॉन्च केला जाईल. पण सॅमसंग च्या या स्वस्त स्मार्टफोन साठी अजून थोडी वाट बघावी लागेल.