Samsung Galaxy J4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Sep 2018 13:19:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग ने केल्या 6 स्मार्टफोन्सच्या किंमती कमी, 6,500 रुपयांनी स्वस्त झाले हे शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-galaxy-j4-galaxy-j8-galaxy-j7-prime-price-cut-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-galaxy-j4-galaxy-j8-galaxy-j7-prime-price-cut-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 13:19:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1924 जर तुम्ही खालील दिलेल्या कोणत्याही स्मार्टफोन्स पैकी कोणताही डिवाईस घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी गामावू नका.

The post सॅमसंग ने केल्या 6 स्मार्टफोन्सच्या किंमती कमी, 6,500 रुपयांनी स्वस्त झाले हे शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी वीवो ने काही दिवसांपूर्वी एक साथ आपल्या तीन स्मार्टफोन च्या किंमती कमी केल्या होत्या. तसेच देशातील दिग्गज कपंनी सॅमसंग ने आपल्या फॅन्स साठी अशीच भेट आणली आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने बातमी आली आहे की सॅमसंग ने एक साथ आपल्या 6 स्मार्टफोन्स च्या किंमती कमी केल्या आहेत. सॅमसंग ने या डिस्काउंट मध्ये गॅलेक्सी जे सीरीज आणि गॅलेक्सी ए सीरीज चा समावेश केला आहे. जर तुम्ही खालील दिलेल्या कोणत्याही स्मार्टफोन्स पैकी कोणताही डिवाईस घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी गामावू नका.

सॅमसंग ने गॅलेक्सी जे2 (2017), गॅलेक्सी जे4, गॅलेक्सी जे8 आणि गॅलेक्सी जे7 प्राइम सोबत गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6 प्लस च्या किंमती कमी केल्या आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज पाहता 21,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या 32जीबी वाल्या गॅलेक्सी ए6 स्मार्टफोन ची किंमत कंपनी ने 6,500 रुपयांनी कमी केली आहे तसेच फोनच्या 64जीबी वेरिएंट ची किंमत 6,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर 32जीबी वेरिएंट 15,490 रुपये तर 22,990 रुपयांचा 64जीबी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे 25,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए6+ स्मार्टफोन 4,000 रुपयांच्या प्राइस कट नंतर 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गॅलेक्सी जे2 (2017) बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन गेल्या वर्षी 7,990 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण आता सॅमसंग ने प्राइस कट केल्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 5,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2जीबी रॅम आणि 3,000एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी जे4 कंपनी ने 9,999 मध्ये बाजारात आणला होता. पण आता सॅमसंग ने या फोनची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे. म्हणजे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला गॅलेक्सी जे4 फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे सॅमसंग ने 16जीबी स्टोरेज वाल्या गॅलेक्सी जे7 प्राइम ची किंमत पण 500 रुपयांनी कमी केली आहे. आता पर्यंत हा स्मार्टफोन 10,490 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता प्राइस कट नंतर हा 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशा प्रकारे जून मध्ये लॉन्च झालेला कंपनी चा मीड रेंज स्मार्टफोन गॅलेक्सी जे8 पण 1,000 रुपयांनी कमी किंमतीत विकत घेता येईल. 18,990 रूपयांचा हा फोन आता 17,990 रुपयांमध्ये मिळेल.

The post सॅमसंग ने केल्या 6 स्मार्टफोन्सच्या किंमती कमी, 6,500 रुपयांनी स्वस्त झाले हे शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-galaxy-j4-galaxy-j8-galaxy-j7-prime-price-cut-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 06:54:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1913 हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने मे महिन्यात भारतीय बाजारात आपली गॅलेक्सी सीरीज वाढवत लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 लॉन्च केला होता. फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोन ने शाओमी च्या रेडमी स्मार्टफोन्सना चांगली टक्कर दिली होती. आता बातमी येत आहे की सॅमसंग आपली ही स्मार्टफोन सीरीज पुन्हा वाढवणार आहे. एका ताज्या लीक मध्ये सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स दिसले आहेत ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम सोबत गॅलेक्सी जे6 प्राइम आहे.

सॅमसंगच्या वियतनाम वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला आहे ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम स्मार्टफोन दिसले आहेत. एका परदेशी वेबसाइट ने सॅमसंगचा हा सपोर्ट पेज बघितला आहे. वेबसाइटच्या रिपोर्ट नुसार वियतनाम च्या आॅफिशियल सॅमसंग वेबसाइट वर सपोर्ट पेज बनवण्यात आला होता ज्यात सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स लिस्ट करण्यात आले होते. या सपोर्ट पेज वर लिस्ट झालेले स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम होते.

वेबसाइट वर गॅलेक्सी जे4 प्राइम एसएम-जे415एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तर गॅलेक्सी जे6 प्राइम एसएम-जे610एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. सपोर्ट पेज वर कोणत्याही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख नव्हता पण बोलले जात आहे की दोन्ही फोनचे हे प्राइम मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर लॉन्च होतील. विशेष म्हणजे गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 सॅमसंग च्या एक्सनॉस चिपसेट वर चालतात.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम बद्दल बोलले जात आहे की हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल. पण वियतनाम मधील वेबसाइट लिस्टिंग नंतर गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम भारतात कधी लॉन्च होतील हे सांगणे अवघड आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
समसंग गैलेक्सी जे6 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/feed/ 0
सॅमसंग पुन्हा देईल शाओमी ला टक्कर, 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला सॅमसंग गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-launched-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-launched-price-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 14:05:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=723 रिपोर्ट नुसार गॅलेक्सी जे4 चा हा नवीन वर्जन 9,999 रुपयांमध्ये आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post सॅमसंग पुन्हा देईल शाओमी ला टक्कर, 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला सॅमसंग गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने कालच एक एक्सक्लूसीव बातमी दिली होती की सॅमसंग लवकरच भारतीय बाजारात आपल्या गॅलेक्सी सीरीज चा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 लॉन्च करू शकते. त्या नुसार कंपनी ने हा स्मार्टफोन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध केला आहे. महेश टेलीकॉम च्या ट्वीटर हँडल वरून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी जे4 भारतीय आॅफलाईन बाजारात सादर करण्यात आला आहे. भारतात हा फोन 9,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.5-इंचाच्या एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे तसेच 1.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7570 ​चिपसेट वर चालतो. ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-टी720 जीपीयू आहे.

कंपनी ने हा फोन को 2जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला आहे. या फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. रिपोर्ट नुसार गॅलेक्सी जे4 चा हा नवीन वर्जन 9,999 रुपयांमध्ये आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post सॅमसंग पुन्हा देईल शाओमी ला टक्कर, 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला सॅमसंग गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-launched-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: 9,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे4, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-price-leak-in-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-price-leak-in-in-marathi/#respond Wed, 30 May 2018 05:47:35 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=683 हा फोन जून महिन्याच्या सुरवातीला उपलब्ध होऊ शकतो.

The post एक्सक्लूसिव: 9,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे4, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही बातमी दिली होती की सॅमसंग जे सीरीज आणि ए सीरीज मध्ये आपले फोन सादर करणार आहे. त्यानुसार मागच्या आठवड्यात कंपनी ने हे फोंस सादर केले. पण आम्हाला मिळालेल्या सुचने नुसार कंपनी गॅलेक्सी जे4 लॉन्च करणार होती पण हा फोन तेव्हा आला नाही आणि काही दिवसांनी पाकिस्तान आणि चीन च्या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर आशा होती की लवकरच हा फोन भारतात पण उपलब्ध होईल आणि आता 91मोबाईल्स ला या बद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यानुसार कंपनी लवकरच सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) भारतात सादर करणार आहे. एवढेच नाही तर आम्हाला फोनच्या किंमतीची माहिती पण मिळाली आहे.

आम्हाला ही माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे ज्या नुसार सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) ची डिलर प्राइस 9,699 रुपये असेल. तर ग्राहकांना हा फोन 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. लॉन्च डेट बद्दल बोलायचे तर सध्यातरी तारखे बाबत माहिती मिळाली नाही पण एवढे नक्की की लवकरच हा फोन सेल साठी येईल. सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) आॅफलाइन स्टोर वर उपलब्ध होईल.

फोन चे स्पेसिफिकेशन पाहता सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) मध्ये 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने सुपर एमोलेड डिसप्ले चा वापर केला आहे जो उत्तम व्यू देतो. हा फोन एक्सनोस 7570 चिपसेट वर चालतो आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत माली टी720 एमपी जीपीयू आहे.

कंपनी ने यात 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी ची इंटरनल मेमरी दिली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) मध्ये 13—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने यात एफ/1.9 अपर्चर दिला आहे. तसेच एलईडी फ्लॅश पण आहे. तर फोन मध्ये 5—मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/2.2 अपर्चर सह सादर केला आहे. तसेच यात फ्रंट एलईडी पण आहे. कनेक्टिवीटी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्हाला 4जी वोएलटीई पण मिळेल. या सोबत ब्लूटूथ 4.2, वाईफाई आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर चालतो.

हा फोन जून महिन्याच्या सुरवातीला उपलब्ध होऊ शकतो.

The post एक्सक्लूसिव: 9,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे4, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-price-leak-in-in-marathi/feed/ 0
सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 18:20:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=484 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने इंडोनेशियन बाजारात गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ सादर केले आहेत.

The post सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल अनेक दिवसांपासुन बातम्या येत होत्या. काही रिपोर्ट्स मधून सॅमसंग च्या गॅलेक्सी ए6 स्मार्टफोन मॉडेल्स ची माहिती मिळाली आहे तर काही रिपोर्ट मध्ये गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 च्या लॉन्च ची बातमी मिळत आहे. सॅमसंग ने अजूनपर्यंत कोणतीच माहिती दिली नव्हती पण आज सॅमसंग इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी 21 मे ला देशात ईवेंट चे आयोजन करणार आहे. 21 मे च्या ईवेंट साठी सॅमसंग ने मीडिया इन्वाईट पाठवेन सुरू केले आहेत, ज्यातून आगामी स्मार्टफोन ची माहिती मिळाली आहे.

सॅमसंग इंडिया ने 21 मे ला भारतात ईवेंट चे आयोजन केले जात आहे. सॅमसंग कडून पाठवण्यात आलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘से हॅलो टू, इनफिनिटी अँड मोर’ लिहिण्यात आले आहे. या टॅगलाईन वरून कळते की कपंनी यादिवशी भारतात जे डिवाईस लॉन्च करणार आहे त्यात इनफिनिटी डिस्प्ले असेल. सूत्रांनुसार 21 मे ला सॅमसंग भारतात एक नही तर अनेक स्मार्टफोन अनाउंस करेल.

प्राप्त माहितीनुसार या ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6+, गॅलेक्सी जे4 तसेच गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते. पण सॅमसंग ने लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे समोर आणली नाहीत पण एवढे निश्चित की कंपनी 21 मे ला भारतीय टेक बाजारात नवीन फोन्स आणून इतर कंपन्यांची समीकरणे बदलेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने इंडोनेशियन बाजारात गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए6 5.6-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तर गॅलेक्सी ए6+ 6-इंचाच्या सुपरएमोलेड स्क्रीन ला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सॅमसंग च्या कमी बजेट वाल्या गॅलेक्सी जे6 पण 5.6-इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात येईल.

The post सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/feed/ 0