सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट

सॅमसंग बद्दल अनेक दिवसांपासुन बातम्या येत होत्या. काही रिपोर्ट्स मधून सॅमसंग च्या गॅलेक्सी ए6 स्मार्टफोन मॉडेल्स ची माहिती मिळाली आहे तर काही रिपोर्ट मध्ये गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 च्या लॉन्च ची बातमी मिळत आहे. सॅमसंग ने अजूनपर्यंत कोणतीच माहिती दिली नव्हती पण आज सॅमसंग इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी 21 मे ला देशात ईवेंट चे आयोजन करणार आहे. 21 मे च्या ईवेंट साठी सॅमसंग ने मीडिया इन्वाईट पाठवेन सुरू केले आहेत, ज्यातून आगामी स्मार्टफोन ची माहिती मिळाली आहे.

सॅमसंग इंडिया ने 21 मे ला भारतात ईवेंट चे आयोजन केले जात आहे. सॅमसंग कडून पाठवण्यात आलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘से हॅलो टू, इनफिनिटी अँड मोर’ लिहिण्यात आले आहे. या टॅगलाईन वरून कळते की कपंनी यादिवशी भारतात जे डिवाईस लॉन्च करणार आहे त्यात इनफिनिटी डिस्प्ले असेल. सूत्रांनुसार 21 मे ला सॅमसंग भारतात एक नही तर अनेक स्मार्टफोन अनाउंस करेल.

प्राप्त माहितीनुसार या ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6+, गॅलेक्सी जे4 तसेच गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते. पण सॅमसंग ने लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे समोर आणली नाहीत पण एवढे निश्चित की कंपनी 21 मे ला भारतीय टेक बाजारात नवीन फोन्स आणून इतर कंपन्यांची समीकरणे बदलेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने इंडोनेशियन बाजारात गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए6 5.6-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तर गॅलेक्सी ए6+ 6-इंचाच्या सुपरएमोलेड स्क्रीन ला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सॅमसंग च्या कमी बजेट वाल्या गॅलेक्सी जे6 पण 5.6-इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here