एक्सक्लूसिव: 9,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे4, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही बातमी दिली होती की सॅमसंग जे सीरीज आणि ए सीरीज मध्ये आपले फोन सादर करणार आहे. त्यानुसार मागच्या आठवड्यात कंपनी ने हे फोंस सादर केले. पण आम्हाला मिळालेल्या सुचने नुसार कंपनी गॅलेक्सी जे4 लॉन्च करणार होती पण हा फोन तेव्हा आला नाही आणि काही दिवसांनी पाकिस्तान आणि चीन च्या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर आशा होती की लवकरच हा फोन भारतात पण उपलब्ध होईल आणि आता 91मोबाईल्स ला या बद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यानुसार कंपनी लवकरच सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) भारतात सादर करणार आहे. एवढेच नाही तर आम्हाला फोनच्या किंमतीची माहिती पण मिळाली आहे.

आम्हाला ही माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे ज्या नुसार सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) ची डिलर प्राइस 9,699 रुपये असेल. तर ग्राहकांना हा फोन 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. लॉन्च डेट बद्दल बोलायचे तर सध्यातरी तारखे बाबत माहिती मिळाली नाही पण एवढे नक्की की लवकरच हा फोन सेल साठी येईल. सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) आॅफलाइन स्टोर वर उपलब्ध होईल.

फोन चे स्पेसिफिकेशन पाहता सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) मध्ये 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने सुपर एमोलेड डिसप्ले चा वापर केला आहे जो उत्तम व्यू देतो. हा फोन एक्सनोस 7570 चिपसेट वर चालतो आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत माली टी720 एमपी जीपीयू आहे.

कंपनी ने यात 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी ची इंटरनल मेमरी दिली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी जे4 (2018) मध्ये 13—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने यात एफ/1.9 अपर्चर दिला आहे. तसेच एलईडी फ्लॅश पण आहे. तर फोन मध्ये 5—मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/2.2 अपर्चर सह सादर केला आहे. तसेच यात फ्रंट एलईडी पण आहे. कनेक्टिवीटी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्हाला 4जी वोएलटीई पण मिळेल. या सोबत ब्लूटूथ 4.2, वाईफाई आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर चालतो.

हा फोन जून महिन्याच्या सुरवातीला उपलब्ध होऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here