Samsung Galaxy J6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Sep 2018 06:54:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 06:54:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1913 हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने मे महिन्यात भारतीय बाजारात आपली गॅलेक्सी सीरीज वाढवत लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 लॉन्च केला होता. फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोन ने शाओमी च्या रेडमी स्मार्टफोन्सना चांगली टक्कर दिली होती. आता बातमी येत आहे की सॅमसंग आपली ही स्मार्टफोन सीरीज पुन्हा वाढवणार आहे. एका ताज्या लीक मध्ये सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स दिसले आहेत ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम सोबत गॅलेक्सी जे6 प्राइम आहे.

सॅमसंगच्या वियतनाम वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला आहे ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम स्मार्टफोन दिसले आहेत. एका परदेशी वेबसाइट ने सॅमसंगचा हा सपोर्ट पेज बघितला आहे. वेबसाइटच्या रिपोर्ट नुसार वियतनाम च्या आॅफिशियल सॅमसंग वेबसाइट वर सपोर्ट पेज बनवण्यात आला होता ज्यात सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स लिस्ट करण्यात आले होते. या सपोर्ट पेज वर लिस्ट झालेले स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम होते.

वेबसाइट वर गॅलेक्सी जे4 प्राइम एसएम-जे415एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तर गॅलेक्सी जे6 प्राइम एसएम-जे610एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. सपोर्ट पेज वर कोणत्याही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख नव्हता पण बोलले जात आहे की दोन्ही फोनचे हे प्राइम मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर लॉन्च होतील. विशेष म्हणजे गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 सॅमसंग च्या एक्सनॉस चिपसेट वर चालतात.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम बद्दल बोलले जात आहे की हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल. पण वियतनाम मधील वेबसाइट लिस्टिंग नंतर गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम भारतात कधी लॉन्च होतील हे सांगणे अवघड आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
समसंग गैलेक्सी जे6 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी जे6 चा अजून एक मॉडेल आला समोर, 4,350एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह क्वालकॉम चिपसेट वर होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-galaxy-on-6-plus-specifications-with-qualcomm-snapdragon-chipset-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-galaxy-on-6-plus-specifications-with-qualcomm-snapdragon-chipset-in-marathi/#respond Fri, 13 Jul 2018 09:57:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1244 कंपनी लवकरच गॅलेक्सी जे6 चा अजून एक नवीन मॉडेल घेऊन येणार आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर चालेल.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 चा अजून एक मॉडेल आला समोर, 4,350एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह क्वालकॉम चिपसेट वर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने मे महिन्यात भारतीय बाजारात गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 स्मार्टफोन लॉन्च केले होते. गॅलेक्सी जे6 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे तर गॅलेक्सी जे8 एकाच वेरिएंट मध्ये बाजारात आणला आहे. सॅमसंग बद्दल आता एक नवीन बातमी समोर आली आहे की कंपनी लवकरच गॅलेक्सी जे6 चा अजून एक नवीन मॉडेल घेऊन येणार आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर चालेल.

एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या ब्लॉग मध्ये सांगितले आहे की सॅमसंग ने भारतात लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन चा अजून एक मॉडेल वर काम करत आहे आणि हा गॅलेक्सी जे6+ किंवा गॅलेक्सी आॅन6+ नावाने बाजारात येऊ शकतो. गॅलेक्सी जे6 मध्ये सॅमसंग एक्सनॉस 7 सीरीज चा चिपसेट देण्यात आला आहे तसेच येणारा नवीन मॉडल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो.

रिपोर्ट नुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6 च्या या आगामी मॉडेल चे कोडनेम जे6पीएलटीई ठेवण्यात आले आहे. तसेच लीक मधून समोर आलेल्या महिती नुसार हा फोन 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला जाईल आणि यात 1480 × 720 ​पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.6-इंचाची सुपर एमोलेड ​स्क्रीन मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+ किंवा गॅलेक्सी आॅन6+ नावाने लॉन्च होणार्‍या या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच फोन चा सेल्फी कॅमेरा एलईडी फ्लॅश सह येऊ शकतो. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो सह सादर केला जाईल तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,350एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. पण जो पर्यंत सॅमसंग या फोन बद्दल काही विधान करत नाही तोपर्यंत फोन च्या स्पेसिफिकेशन्स सह याच्या नावावर पण विश्‍वास ठेवता येणार नाही.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 चा अजून एक मॉडेल आला समोर, 4,350एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह क्वालकॉम चिपसेट वर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-galaxy-on-6-plus-specifications-with-qualcomm-snapdragon-chipset-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 भारतात झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-galaxy-j8-launched-in-india-price-specifications-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-galaxy-j8-launched-in-india-price-specifications-feature-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 05:38:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=564 सॅमसंग ने भारतीय बाजारात आज गॅलेक्सी ए सीरीज च्या नवीन स्मार्टफोन्स सह गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 स्मार्टफोन पण लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी जे6 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला तर गॅलेक्सी जे8 एकाच वेरिएंट मध्ये बाजारात आला आहे. गॅलेक्सी जे6 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपये तसेच 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 16,490 रुपयांमध्ये लॉन्च […]

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 भारतात झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने भारतीय बाजारात आज गॅलेक्सी ए सीरीज च्या नवीन स्मार्टफोन्स सह गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 स्मार्टफोन पण लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी जे6 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला तर गॅलेक्सी जे8 एकाच वेरिएंट मध्ये बाजारात आला आहे. गॅलेक्सी जे6 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपये तसेच 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 16,490 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गॅलेक्सी जे8 कंपनी ने 18,990 रुपयांच्या किंमतीत आणला आहे ज्यात 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे8
सॅमसंग ने गॅलेक्सी जे8 स्मार्टफोन पॉलीकार्बोनेट यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला आहे जो इ​नफिनिटी डिस्प्ले ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6-इंचाची एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने गॅलेक्सी जे8 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या दोन्ही पॅनल वर फ्लॅश लाईट आहे. तर पावर बॅकअप साठी 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे6
गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन पण कंपनी ने इ​नफिनिटी डिस्प्ले सह पॉलीकार्बोनेट यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला आहे. या फोन मध्ये 5.6-इंचाची एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे तसेच सॅमसंग च्या एक्सनॉस 7 सीरीज च्या चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी जे6 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक क्नेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे6 उद्या म्हणजे 22 मे पासून सेल साठी उपलब्ध होईल तसेच गॅलेक्सी जे8 साठी 20 जून ची वाट बघावी लागेल. सॅमसंग गॅलेक्सी जे6 शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच हा फोन पेटीएम, सॅमसंग शॉप तसेच सॅमसंग स्टोर वरून पण विकत घेता येईल.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 भारतात झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-galaxy-j8-launched-in-india-price-specifications-feature-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी जे6 इनफिनिटी डिस्प्ले सह भारतात होत आहे लॉन्च, 22 मे पासून होईल सेल, रिटेल स्टोर्स वर होईल उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-launching-on-21-may-with-infinity-display-sale-start-by-22-may-on-offline-retail-stores-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-launching-on-21-may-with-infinity-display-sale-start-by-22-may-on-offline-retail-stores-in-india-in-marathi/#respond Fri, 18 May 2018 16:50:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=547 सॅमसंग ने ट्वीट मध्ये गॅलेक्सी जे6 चा वीडियो शेयर केला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 इनफिनिटी डिस्प्ले सह भारतात होत आहे लॉन्च, 22 मे पासून होईल सेल, रिटेल स्टोर्स वर होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी ही घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 21 मे ला भारतात नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. सॅमसंग ने मीडिया इन्वाईट पण पाठवले आहेत ज्यात सांगण्यात आले आहे की कंपनी चे आगामी स्मार्टफोन इनफिनिटी डिस्प्ले सह येतील. सॅमसंग ने लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे सांगितली नाहीत पण कंपनी चा एक आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी जे6 रिटेल स्टोर्स दिसला आहे. बाजारात होर्डिंग लावून तसेच सॅमसंग इंडिया ने पण आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून या फोन ची माहिती दिली आहे.

सॅमसंग ने ट्वीट मध्ये गॅलेक्सी जे6 चा वीडियो शेयर केला आहे. तसेच राजधानी मध्ये रिटेल स्टोर्स च्या बाहेर या फोन चे होर्डिंग पण लागले आहेत. हे स्पष्ट झाले आहे की सॅमसंग गॅलेक्सी जे6 येणार्‍या 21 मे भारतात लॉन्च केला जाईल तसेच 22 मे पासून आॅफलाईन प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी ने गॅलेक्सी जे6 च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली नाही पण फोटो वरून समजले आहे की हा फोन बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले वर लॉन्च होईल. फोन बद्दल आलेले लीक्स पाहता यात 5.6-इंचाचा एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळेल जो 1480 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे6 बद्दल बोलले जात आहे की कंपनी हा फोन 2जीबी, 3जीबी तसेच 4जीबी च्या तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते तसेच हा फोन आॅक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7870 चिपसेट वर चालेल. त्याचबरोबर फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तर 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी जे6 मध्ये बाईक मोड, अल्ट्रा डाटा सेविंग मोड व सॅमसंग मॉल ​मिळू शकतात.

सॅमसंग या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देऊ शकते. विशेष म्हणजे सॅमसंग कडून हा 21 मे ला लॉन्च केला जात आहे त्यादिवशी कंपनी एका पेक्षा जास्त डिवाईस सादर करू शकते. त्यामुळे असे वाटते की गॅलेक्सी जे6 सोबत कंपनी गॅलेक्सी ए सीरीज मध्ये पण नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जो इनफिनिटी डिस्प्ले सह येईल. पण गॅलेक्सी जे6 ची किंमत आणि ठोस स्पेसिफिकेशन्स साठी पण 21 मे ला फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 इनफिनिटी डिस्प्ले सह भारतात होत आहे लॉन्च, 22 मे पासून होईल सेल, रिटेल स्टोर्स वर होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-launching-on-21-may-with-infinity-display-sale-start-by-22-may-on-offline-retail-stores-in-india-in-marathi/feed/ 0
सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 18:20:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=484 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने इंडोनेशियन बाजारात गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ सादर केले आहेत.

The post सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल अनेक दिवसांपासुन बातम्या येत होत्या. काही रिपोर्ट्स मधून सॅमसंग च्या गॅलेक्सी ए6 स्मार्टफोन मॉडेल्स ची माहिती मिळाली आहे तर काही रिपोर्ट मध्ये गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 च्या लॉन्च ची बातमी मिळत आहे. सॅमसंग ने अजूनपर्यंत कोणतीच माहिती दिली नव्हती पण आज सॅमसंग इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी 21 मे ला देशात ईवेंट चे आयोजन करणार आहे. 21 मे च्या ईवेंट साठी सॅमसंग ने मीडिया इन्वाईट पाठवेन सुरू केले आहेत, ज्यातून आगामी स्मार्टफोन ची माहिती मिळाली आहे.

सॅमसंग इंडिया ने 21 मे ला भारतात ईवेंट चे आयोजन केले जात आहे. सॅमसंग कडून पाठवण्यात आलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘से हॅलो टू, इनफिनिटी अँड मोर’ लिहिण्यात आले आहे. या टॅगलाईन वरून कळते की कपंनी यादिवशी भारतात जे डिवाईस लॉन्च करणार आहे त्यात इनफिनिटी डिस्प्ले असेल. सूत्रांनुसार 21 मे ला सॅमसंग भारतात एक नही तर अनेक स्मार्टफोन अनाउंस करेल.

प्राप्त माहितीनुसार या ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6+, गॅलेक्सी जे4 तसेच गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते. पण सॅमसंग ने लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे समोर आणली नाहीत पण एवढे निश्चित की कंपनी 21 मे ला भारतीय टेक बाजारात नवीन फोन्स आणून इतर कंपन्यांची समीकरणे बदलेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने इंडोनेशियन बाजारात गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए6 5.6-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तर गॅलेक्सी ए6+ 6-इंचाच्या सुपरएमोलेड स्क्रीन ला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सॅमसंग च्या कमी बजेट वाल्या गॅलेक्सी जे6 पण 5.6-इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात येईल.

The post सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी जे6 होणार आहे लॉन्च, 3जीबी रॅम सह असेल 5.6-इंचाचा इनफिनिटी डिसप्ले https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-india-launch-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-india-launch-features-specifications-in-marathi/#respond Tue, 15 May 2018 06:17:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=439 सॅमसंग ने एप्रिल महिन्यात भारतात आपले दोन शानदार स्मार्टफोन गॅलेक्सी जे7 डुओ आणि गॅलेक्सी जे2 (2018) लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की ही टेक दिग्गज कंपनी या महिन्यात आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए6 लॉन्च करू शकते तसेच कर 91मोबाईल्सला सॅमसंग च्या अजून एका नवीन स्मार्टफोन ची माहिती […]

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी जे6 होणार आहे लॉन्च, 3जीबी रॅम सह असेल 5.6-इंचाचा इनफिनिटी डिसप्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने एप्रिल महिन्यात भारतात आपले दोन शानदार स्मार्टफोन गॅलेक्सी जे7 डुओ आणि गॅलेक्सी जे2 (2018) लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की ही टेक दिग्गज कंपनी या महिन्यात आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए6 लॉन्च करू शकते तसेच कर 91मोबाईल्सला सॅमसंग च्या अजून एका नवीन स्मार्टफोन ची माहिती मिळाली आहे. बातमी नुसार सॅमसंग काही दिवसांमध्ये आपल्या अजून एक स्मार्टफोन जागा समोर आणणार आहे आणि गॅलेक्सी जे6 नावाने नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करेल.

91मोबाईल्‍सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार सॅमसंग भारतात आपले नवीन स्मार्टफोन्स घेऊन येत आहे आणि याची सुरवात कंपनी गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन सह करेल. सूत्रांकडून मिळालेल्या सॅमसंग गॅलेक्सी जे6 कमी बजेट वाला स्मार्टफोन असेल जो बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये 5.6-इंचाचा मोठा इनफिनिटी डिसप्ले दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी जे6 कंपनी कडून 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल. फोन मध्ये 32जीबी की इंटरनल स्टोरेज देण्यात येईल जी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट ने वाढवता येईल. गॅलेक्सी जे6 क्वालकॉम चिपसेट वर चालेल की सॅमसंग च्या एक्सनोस वर याची ठोस माहिती अजून मिळाली नाही, पण बातमीनुसार हा फोन क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालेल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग इंडिया गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन गॅलेक्सी ए6 सीरीज च्या आधी देशात लॉन्च करेल. फोन ची किंमत काय असेल तसेच हा फोन केव्हा भारतात येईल या माहितीसाठी अजून वाट बघावी लागेल. पण एवढे म्हणू शकतो की की सॅमसंग चा हा फोन कमी किंमतीत लॉन्च केला जाईल.

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी जे6 होणार आहे लॉन्च, 3जीबी रॅम सह असेल 5.6-इंचाचा इनफिनिटी डिसप्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-india-launch-features-specifications-in-marathi/feed/ 0