सॅमसंग गॅलेक्सी जे6 चा अजून एक मॉडेल आला समोर, 4,350एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह क्वालकॉम चिपसेट वर होईल लॉन्च

सॅमसंग ने मे महिन्यात भारतीय बाजारात गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 स्मार्टफोन लॉन्च केले होते. गॅलेक्सी जे6 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे तर गॅलेक्सी जे8 एकाच वेरिएंट मध्ये बाजारात आणला आहे. सॅमसंग बद्दल आता एक नवीन बातमी समोर आली आहे की कंपनी लवकरच गॅलेक्सी जे6 चा अजून एक नवीन मॉडेल घेऊन येणार आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर चालेल.

एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या ब्लॉग मध्ये सांगितले आहे की सॅमसंग ने भारतात लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन चा अजून एक मॉडेल वर काम करत आहे आणि हा गॅलेक्सी जे6+ किंवा गॅलेक्सी आॅन6+ नावाने बाजारात येऊ शकतो. गॅलेक्सी जे6 मध्ये सॅमसंग एक्सनॉस 7 सीरीज चा चिपसेट देण्यात आला आहे तसेच येणारा नवीन मॉडल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो.

रिपोर्ट नुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6 च्या या आगामी मॉडेल चे कोडनेम जे6पीएलटीई ठेवण्यात आले आहे. तसेच लीक मधून समोर आलेल्या महिती नुसार हा फोन 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला जाईल आणि यात 1480 × 720 ​पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.6-इंचाची सुपर एमोलेड ​स्क्रीन मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+ किंवा गॅलेक्सी आॅन6+ नावाने लॉन्च होणार्‍या या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच फोन चा सेल्फी कॅमेरा एलईडी फ्लॅश सह येऊ शकतो. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो सह सादर केला जाईल तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,350एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. पण जो पर्यंत सॅमसंग या फोन बद्दल काही विधान करत नाही तोपर्यंत फोन च्या स्पेसिफिकेशन्स सह याच्या नावावर पण विश्‍वास ठेवता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here