Samsung Galaxy J7 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Sep 2018 07:32:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 07:32:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2160 सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आॅफिशियल घोषणा केली आहे की कंपनी येत्या 11 ऑक्टोबरला एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मध्ये गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 प्रो लॉन्च होऊ शकतो. तसेच सॅमसंग आपल्या स्वस्त गॅलेक्सी जे सीरीज मध्ये पण दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्लस आणि गॅलेक्सी जे7 प्लस घेऊन येत आहे. गॅलेक्सी जे सीरीज चे हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट पण झाले आहेत. पण आता अशी बातमी येत आहे की हे दोन्ही फोन गॅलेक्सी जे सीरीज चे शेवटचे फोन असू शकतात. सॅमसंग आपली जे सीरीज बंद करू शकते आणि एक नवीन सीरीज ‘गॅलेक्सी एम’ नावाने आणू शकते.

सॅमसंग संबंधित ही बातमी विदेशी वेबसाइट ईटीन्यूज ने पब्लिश केली आहे. रिपोर्ट नुसार सॅमसंग आपल्या लो बजेट तसेच मीड बजेट सेग्मेंट मध्ये नवीन योजना बनवत आहे. मीड बजेट सेग्मेंट मजबूत करण्यासाठी गॅलेक्सी ए सीरीज ला अजून चांगले व एडवांस करत तिच्यात ताकदवान स्पेसिफिकेशन्स दिले जातील. तसेच लो बजेट सेग्मेंट मधील गॅलेक्सी जे सीरीज कंपनी बंद करून त्याजागी नवीन गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते. सॅमसंग या सीरीज मध्ये कमी किंमतीत जास्त चांगले स्पेसिफिकेशन्स देण्याचा प्रयत्न करेन. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की सॅमसंग ची गॅलेक्सी आॅन सीरीज पण गॅलेक्सी एम सीरीज द्वारा रिप्लेस केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे गॅलेक्सी आॅन स्मार्टफोन सीरीज सॅमसंग द्वारा मुख्यत: भारतीय आणि चीनी बाजारात विकली जाते. त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज मधील सर्वात जास्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होऊ शकतात. तसेच दुसरीकडे असे बोलले जात आहे की भारतात शाओमीच्या लो बजट स्मार्टफोन्स मुळे सॅमसंग ने आपली नंबर वन पॉजिशन गामावली आहे त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज ने कंपनी फक्त शाओमी ला टक्कर देणार नाही तर भारतीय टेक बाजारात आपला शेयर पण वाढवेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस 24 सप्टेंबरला होऊ शकतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-plus-galaxy-j4-plus-launch-date-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-plus-galaxy-j4-plus-launch-date-leaked-in-marathi/#respond Mon, 17 Sep 2018 09:13:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2143 जरी सॅमसंग ने अजून गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची लॉन्च डेट सांगितली नसली तरी एका टिप्सटर ने आपल्या ट्वीटर हँडल वरून फोन लॉन्च ची माहिती दिली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस 24 सप्टेंबरला होऊ शकतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग गॅलेक्सी जे सीरीज चे दोन स्मार्टफोन सतत चर्चेत आहेत. गॅलेक्सी जे7 प्राइम आणि गॅलेक्सी जे4 प्लस बद्दल लीक्स समोर येत आहेत. फोटो आणि स्पेसिफिकेशन्स संबधीत माहिती आल्यानंतर आता गॅलेक्सी जे7 प्राइम/ जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची लॉन्च डेट पण समोर आली आहे. ताजा लीक मधून समजले आहे की सॅमसंग आपली गॅलेक्सी जे सीरीज चे हे दोन्ही स्मार्टफोन्स 24 सप्टेंबरला भारतात लॉन्च करेल.

जरी सॅमसंग ने अजून गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची लॉन्च डेट सांगितली नसली तरी एका टिप्सटर ने आपल्या ट्वीटर हँडल वरून फोन लॉन्च ची माहिती दिली आहे. या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे की येत्या 24 सप्टेंबरला गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस स्मार्टफोन इंडियन टेक मार्केट मध्ये येतील. पण या ट्वीट मध्ये फोनची किंमत तसेच यांची उपलब्धता याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

समोर आलेल्या लीक मध्ये दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मधील काही महत्वपूर्ण स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख करण्यात आला आहे. लीक नुसार गॅलेक्सी जे7 प्लस मध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल तसेच गॅलेक्सी जे4 प्लस 3जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी जे7 प्लस च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा आहे. तसेच गॅलेक्सी जे4 प्लस मध्ये 13 मेगापिक्सल चा सिंगल रियर कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

सेल्फी साठी गॅलेक्सी जे7 प्लस मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच गॅलेक्सी जे4 प्लस 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सह बाजारात येईल. या लीक मध्ये गॅलेक्सी जे4 प्लस च्या स्टोरेजची माहिती पण देण्यात आली आहे जी ट्वीट नुसार 32जीबी असेल. लक्षात घ्या सॅमसंग ने अजूनही गॅलेक्सी जे7 प्लस किंवा गॅलेक्सी जे4 प्लस बद्दल कोणतीही आॅफिशियल घोषणा केली नाही, त्यामुळे कंपनी च्या घोषणीची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस 24 सप्टेंबरला होऊ शकतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-plus-galaxy-j4-plus-launch-date-leaked-in-marathi/feed/ 0