Samsung Galaxy M34 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Jun 2023 05:34:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M34 5G च्या स्पेक्सचा खुलासा; 7 जुलैला येतोय भारतात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m34-5g-battery-camera-specs-revealed-chipset-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m34-5g-battery-camera-specs-revealed-chipset-tipped/#respond Wed, 28 Jun 2023 05:34:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21776 Samsung नं सांगितलं आहे की Galaxy M34 5G स्मार्टफोन 7 जुलै 2023 ला भारतात सादर केला जाईल. हा फोन Galaxy M14 5G नंतर गॅलॅक्सी एम सीरिजमधील दुसरा स्मार्टफोन असेल जो यंदा लाँच झाला आहे. Samsung Galaxy M34 5G ह्याआधी आलेल्या Galaxy A34 चा रीब्रँड व्हर्जन असल्याची चर्चा होती परंतु नवीन स्पेक्स समोर आल्यामुळे दोन्हींमधील फरक […]

The post Samsung Galaxy M34 5G च्या स्पेक्सचा खुलासा; 7 जुलैला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy M34 5G येत्या 7 जुलैला भारतात लाँच होणार आहे.
  • ह्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल.
  • हँडसेट अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून खरेदी करता येईल.

Samsung नं सांगितलं आहे की Galaxy M34 5G स्मार्टफोन 7 जुलै 2023 ला भारतात सादर केला जाईल. हा फोन Galaxy M14 5G नंतर गॅलॅक्सी एम सीरिजमधील दुसरा स्मार्टफोन असेल जो यंदा लाँच झाला आहे. Samsung Galaxy M34 5G ह्याआधी आलेल्या Galaxy A34 चा रीब्रँड व्हर्जन असल्याची चर्चा होती परंतु नवीन स्पेक्स समोर आल्यामुळे दोन्हींमधील फरक स्पष्ट झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन इंडियावर ह्या गॅलॅक्सी एम34 5जी ची मायक्रो साइट लाइव्ह करण्यात आली होती त्यामुळे हा फोन रिटेल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल हे निश्चित झालं होतं. इंडस्ट्री सोर्सकडून ह्या आगामी फोनच्या प्रोसेसरची माहिती देखील मिळाली आहे.

Samsung Galaxy M34 चे स्पेसिफिकेशन्स

  • प्रोसेसर : Samsung Galaxy M34 5G मध्ये Exynos 1280 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो Galaxy M33, A33 आणि A53 स्मार्टफोनमध्ये देखील देण्यात आला होता. Galaxy M34 मध्ये 12 5जी बँड्सचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • डिस्प्ले : फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच असलेला 6.5″ sAMOLED डिस्प्ले एफएचडी+ रिजोल्यूशन आणि 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो. डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : ह्या डिवाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा दुसरा सेन्सर आणि 2MP चा तिसरा कॅमेरा मिळेल. मुख्य सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन दिला जाऊ शकतो. फ्रंटला 13MP चा सेल्फी शुटर मिळेल.
  • बॅटरी : Galaxy M34 मध्ये 6,000 mAH ची मोठी बॅटरी दिली जाईल.
  • डिजाईन : हा डिवाइस मिडनाइट ब्लु, टॉरकोईज आणि सिल्वर मध्ये उपलब्ध होईल.

6,000mAH ची बॅटरी Galaxy M30 सीरिजच्या मॉडेल्समध्ये नवी नाही. परंतु अ‍ॅमोलेड डिस्प्ले नक्कीच ह्या लाइनअप मध्ये नवा आहे. लवकरच ह्या हँडसेटची आणखी माहिती समोर येईल जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

The post Samsung Galaxy M34 5G च्या स्पेक्सचा खुलासा; 7 जुलैला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m34-5g-battery-camera-specs-revealed-chipset-tipped/feed/ 0
Samsung Galaxy M34 5G येतोय भारतात, अ‍ॅमेझॉनवर दिसलं प्रोडक्ट पेज https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m34-5g-launching-in-india-on-amazon-page-goes-live/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m34-5g-launching-in-india-on-amazon-page-goes-live/#respond Thu, 22 Jun 2023 06:29:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21699 Samsung Galaxy M34 5G भारतात उपलब्ध होणार आहे. कंपनी लवकरच फोनच्या लाँच डेटची घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी ह्याचं सपोर्ट पेज समोर आलं होतं तर आता फोनच्या अ‍ॅमेझॉन प्रोडक्ट पेजवरून बरीच माहिती समोर आली आहे. फोनच्या फोटो सोबतच स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत, ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी इंडिया लाँच […]

The post Samsung Galaxy M34 5G येतोय भारतात, अ‍ॅमेझॉनवर दिसलं प्रोडक्ट पेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनचं पेज अ‍ॅमेझॉनवर दिसलं आहे.
  • इथून इंडिया लाँच कन्फर्म झाला आहे.
  • लाँच डेटची लवकरच घोषणा केली जाईल.

Samsung Galaxy M34 5G भारतात उपलब्ध होणार आहे. कंपनी लवकरच फोनच्या लाँच डेटची घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी ह्याचं सपोर्ट पेज समोर आलं होतं तर आता फोनच्या अ‍ॅमेझॉन प्रोडक्ट पेजवरून बरीच माहिती समोर आली आहे. फोनच्या फोटो सोबतच स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत, ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी इंडिया लाँच

ह्या सॅमसंग फोनचं प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर दिसलं आहे. जिथे फोनचं मायक्रो पेज लाइव्ह झालं आहे ज्यावर गॅलेक्सी एम34 5जी टीज करण्यात आला आहे. इथे फोनच्या डिजाईन सोबतच असं समजलं आहे की Galaxy M34 5G लवकरच भारतात लाँच होईल तसेच अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की हा फोन पुढील सात दिवसांत बाजारात येऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 1080
  • 48MP Rear Camera
  • 13MP Front Camera
  • 25W 5,000mAh battery

  • स्क्रीन : गॅलेक्सी एम34 5जी फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येते. ह्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर : हा सॅमसंग मोबाइल मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 ऑक्टाकोर प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. फोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय मिळेल.
  • रियर कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. ह्या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 5 मेेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरचा समावेश केला जाऊ शकतो.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy M34 5G फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.

The post Samsung Galaxy M34 5G येतोय भारतात, अ‍ॅमेझॉनवर दिसलं प्रोडक्ट पेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m34-5g-launching-in-india-on-amazon-page-goes-live/feed/ 0