Samsung Galaxy M34 5G च्या स्पेक्सचा खुलासा; 7 जुलैला येतोय भारतात

Highlights

  • Samsung Galaxy M34 5G येत्या 7 जुलैला भारतात लाँच होणार आहे.
  • ह्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल.
  • हँडसेट अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून खरेदी करता येईल.

Samsung नं सांगितलं आहे की Galaxy M34 5G स्मार्टफोन 7 जुलै 2023 ला भारतात सादर केला जाईल. हा फोन Galaxy M14 5G नंतर गॅलॅक्सी एम सीरिजमधील दुसरा स्मार्टफोन असेल जो यंदा लाँच झाला आहे. Samsung Galaxy M34 5G ह्याआधी आलेल्या Galaxy A34 चा रीब्रँड व्हर्जन असल्याची चर्चा होती परंतु नवीन स्पेक्स समोर आल्यामुळे दोन्हींमधील फरक स्पष्ट झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन इंडियावर ह्या गॅलॅक्सी एम34 5जी ची मायक्रो साइट लाइव्ह करण्यात आली होती त्यामुळे हा फोन रिटेल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल हे निश्चित झालं होतं. इंडस्ट्री सोर्सकडून ह्या आगामी फोनच्या प्रोसेसरची माहिती देखील मिळाली आहे.

Samsung Galaxy M34 चे स्पेसिफिकेशन्स

  • प्रोसेसर : Samsung Galaxy M34 5G मध्ये Exynos 1280 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो Galaxy M33, A33 आणि A53 स्मार्टफोनमध्ये देखील देण्यात आला होता. Galaxy M34 मध्ये 12 5जी बँड्सचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • डिस्प्ले : फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच असलेला 6.5″ sAMOLED डिस्प्ले एफएचडी+ रिजोल्यूशन आणि 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो. डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : ह्या डिवाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा दुसरा सेन्सर आणि 2MP चा तिसरा कॅमेरा मिळेल. मुख्य सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन दिला जाऊ शकतो. फ्रंटला 13MP चा सेल्फी शुटर मिळेल.
  • बॅटरी : Galaxy M34 मध्ये 6,000 mAH ची मोठी बॅटरी दिली जाईल.
  • डिजाईन : हा डिवाइस मिडनाइट ब्लु, टॉरकोईज आणि सिल्वर मध्ये उपलब्ध होईल.

6,000mAH ची बॅटरी Galaxy M30 सीरिजच्या मॉडेल्समध्ये नवी नाही. परंतु अ‍ॅमोलेड डिस्प्ले नक्कीच ह्या लाइनअप मध्ये नवा आहे. लवकरच ह्या हँडसेटची आणखी माहिती समोर येईल जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here