Samsung Galaxy M34 5G येतोय भारतात, अ‍ॅमेझॉनवर दिसलं प्रोडक्ट पेज

Highlights

  • फोनचं पेज अ‍ॅमेझॉनवर दिसलं आहे.
  • इथून इंडिया लाँच कन्फर्म झाला आहे.
  • लाँच डेटची लवकरच घोषणा केली जाईल.

Samsung Galaxy M34 5G भारतात उपलब्ध होणार आहे. कंपनी लवकरच फोनच्या लाँच डेटची घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी ह्याचं सपोर्ट पेज समोर आलं होतं तर आता फोनच्या अ‍ॅमेझॉन प्रोडक्ट पेजवरून बरीच माहिती समोर आली आहे. फोनच्या फोटो सोबतच स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत, ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी इंडिया लाँच

ह्या सॅमसंग फोनचं प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर दिसलं आहे. जिथे फोनचं मायक्रो पेज लाइव्ह झालं आहे ज्यावर गॅलेक्सी एम34 5जी टीज करण्यात आला आहे. इथे फोनच्या डिजाईन सोबतच असं समजलं आहे की Galaxy M34 5G लवकरच भारतात लाँच होईल तसेच अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की हा फोन पुढील सात दिवसांत बाजारात येऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 1080
  • 48MP Rear Camera
  • 13MP Front Camera
  • 25W 5,000mAh battery

  • स्क्रीन : गॅलेक्सी एम34 5जी फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येते. ह्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर : हा सॅमसंग मोबाइल मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 ऑक्टाकोर प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. फोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय मिळेल.
  • रियर कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. ह्या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 5 मेेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरचा समावेश केला जाऊ शकतो.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy M34 5G फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here