Samsung Galaxy M42 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 13 Apr 2021 09:42:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-india-price-under-rs-25000-launch-in-april-with-snapdragon-750g/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-india-price-under-rs-25000-launch-in-april-with-snapdragon-750g/#respond Tue, 13 Apr 2021 09:42:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10579 Samsung Galaxy M42 5G संबंधित आईएएनएसचा हा रिपोर्ट इंडस्ट्री सोर्सच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या नवीन डिवायस Galaxy M42 वर काम करत आहे ज्याचे अनेक दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये या फोनच्या वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तर आज न्यूज एजेंसी IANS ने लॉन्चपूर्वीच Samsung Galaxy M42 5G च्या किंमतीचा खुलासा पण केला आहे. रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंग आपला हा फोन 20,000 ते 25,000 रुपयांदरम्यान लॉन्च करेल आणि हा फोन एप्रिलच्या अखेरीस बाजारात येईल. (Samsung Galaxy M42 5G India price under RS 25000 launch in April with Snapdragon 750G)

Samsung Galaxy M42 5G संबंधित आईएएनएसचा हा रिपोर्ट इंडस्ट्री सोर्सच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार गॅलेक्सी एम42 या महिन्यात भारतात लॉन्च होईल आणि सॅमसंग येत्या काही दिवसांत या फोनच्या लॉन्चची घोषणा करेल. Galaxy M42 ची लॉन्च डेट एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असू शकते. रिपोर्टनुसार या फोनची किंमत 20,000 ते 25,000 रुपयांदरम्यान असेल. फोन किती वेरिएंट्समध्ये लॉन्च होईल हे अजून स्पष्ट झाले नाही.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एम42 बद्दल रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर लॉन्च केला जाईल आणि या चिपसेटमुळे सॅमसंगच्या या फोनमध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट पण असेल. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy M42 क्चॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्याचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. हा फोन 6,000एमएएच बॅटरीसह हा फोन येईल असे रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

Galaxy A72

हे देखील वाचा : 7,040mAh बॅटरी, 10 इंच डिस्प्ले आणि 64GB स्टोरेजसह Samsung Galaxy Tab A7 भारतात लॉन्च

माहिती आली समोर

बोलले जात आहे सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी मध्ये तुम्हाला 6.6 इंचाची HD+ Super AMOLED स्क्रीन मिळेल. तसेच फोनमध्ये Infinity-U waterdrop नॉच दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन Android OS 11 वर काम करेल आणि यात 6 GB RAM मेमरीसह 128 GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर व्यतिरिक्त 8 MP ची अल्ट्रा—वाइड लेंस, 5 MP चा डेफ्थ सेंसर आणि 5 MP ची मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 5G सह 4G VOLTE सपोर्ट, डुअल बॅंड वाय-फाय, USP Type-C पोर्ट मिळेल. Samsung Galaxy M42 5G च्या लॉन्च डेटसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-india-price-under-rs-25000-launch-in-april-with-snapdragon-750g/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-certification-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-certification-with-6000mah-battery/#respond Tue, 17 Nov 2020 14:37:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8961 Samsung बाबत चर्चा आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या नवीन डिवायस वर काम करत आहे जो Samsung Galaxy M42 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बाबत चर्चा आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या नवीन डिवायस वर काम करत आहे जो Samsung Galaxy M42 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल. सॅमसंगने आतापर्यंत गॅलेक्सी एम3.. आणि गॅलेक्सी एम5.. टायटल असलेले फोन्स बाजारात आणले आहेत पण पहिल्यांदा गॅलेक्सी एम4.. टायटल सह फोन लॉन्च होईल. सॅमसंगने गॅलेक्सी एम42 बाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही पण हा फोन सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे जिथे समजले आहे कि Samsung Galaxy M42 स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy M42 3C सर्टिफिकेशन साइट आणि DEKRA सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे. या दोन्ही वेबसाइट्स वर फोन EM-BM425ABY बॅटरी मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोन मध्ये मधील बॅटरीची रेटेड कपॅसिटी 5,830mAh सांगण्यात आली आहे जिची चार्जिंग लिमिट वॉलटेज 4.43V आहे. हे सर्टिफिकेशन समोर आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम42 स्मार्टफोन 6,000mAh बॅटरी सोबतच बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम42 संबंधित इतर रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन SM-M425F मॉडेल नंबर सह मार्केट मध्ये एंट्री घेईल. रिपोर्टनुसार Samsung Galaxy M42 मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हे लीक्स पाहता अंदाज लावला जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी स्मार्टफोन मिडबजेट मधेच लॉन्च करेल. गॅलेक्सी एम42 कधी मार्केट मध्ये येईल, याबाबत अजूनतरी काही सांगता येणार नाही.

Samsung Galaxy M51

सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि हँडसेट मध्ये 128 जीबी पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज आहे, जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये मागे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

तसेच रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या भागात पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो.

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. तसेच फोनच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. सॅमसंगच्या या फोन मध्ये 7000mAh ची बॅटरी आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-certification-with-6000mah-battery/feed/ 0