7,040mAh बॅटरी, 10 इंच डिस्प्ले आणि 64GB स्टोरेजसह Samsung Galaxy Tab A7 भारतात लॉन्च

Samsung ने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतात आपला पावरफुल टॅबलेट Samsung Galaxy Tab A7 लॉन्च केला होता. हा टॅबलेट 17,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आणला होता जो Wi-Fi आणि LTE दोन मॉडेल्समध्ये मार्केटमध्ये आला होता. 7040mAh बॅटरी असलेला हा सॅमसंग टॅबलेट डिवायस 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते. आता हा टॅब अजून शक्तिशाली करत सॅमसंगने गॅलेक्सी ए7 चा अजून एक नवीन वेरिएंट सादर केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह लॉन्च झाला आहे. (Samsung back to school campaign Galaxy Tab A7 64GB storage variant launch)

Samsung Galaxy Tab A7

सॅमसंगचा हा टॅबलेट डिवायस मेटल फिनिशवर बनला आहे. ज्यात 2000 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 10 इंचाची मोठी डब्ल्यूयूएक्सजीए+ टीएफट स्क्रीन देण्यात आली आहे. या डिवायसचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 80 टक्के आहे. टॅबचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बटणलेस आहे तसेच हॉरिजॉन्टल ठेवल्यावर सेल्फी कॅमेरा वर येतो. Samsung Galaxy Tab A7 अँड्रॉइड ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो (4×2.0GHz + 4×1.8GHz) क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेटवर चालतो.

हे देखील वाचा : Xiaomi Mi 11X भारतात होईल 23 एप्रिलला लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Tab A7 च्या फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर उजव्या कोपऱ्यावर 8 मेगापिक्सल पावर असलेला रियर कॅमेरा आहे. टॅबच्या मागे मध्यभागी Samsung की ब्रँडिंग देण्यात आली आहे तसेच इतर कोणताही सेंसर नाही. टॅबच्या बाजूच्या पॅनलवर 3.5एमएम जॅक सोबतच यूएसबी टाईप सी पोर्ट आणि चार स्पीकर ग्रिल देण्यात आले आहेत जे डॉल्बी अ‍ॅटमॉस सराउंड टेक्नॉलॉजीसह येतात. तसेच पावर बॅकअपसाठी हा डिवायस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 7,040 एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Tab A7 चा नवीन वेरिएंट 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच जुन्या वेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी मेमरी देण्यात आली होती. गॅलेक्सी टॅब ए7 डिवायस Wi-Fi आणि LTE दोन मॉडेल्समध्ये आला आहे. 32 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या Wi-Fi मॉडेलची किंमत 17,999 रुपये आणि LTE मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तर 64 जीबी वेरिएंट 19 एप्रिलच्या विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा टॅबलेट Dark Gray, Gold आणि Silver कलरमध्ये विकत घेता येईल.

Back to School ऑफर

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए7 चा नवीन मॉडेल लॉन्च करण्यासोबत सॅमसंगने ‘बॅक टू स्कुल’ मोहिमेची सुरुवात पण केली आहे जिच्या अंतर्गत 13 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत सॅमसंग टॅबलेट डिस्काउंट प्राइसवर विकत घेता येईल. या ऑफरमध्ये Samsung Galaxy Tab S7+, Samsung Galaxy Tab S7, Samsung Galaxy Tab S6 Lite आणि Samsung Galaxy Tab A7 कंपनीच्या वेबसाइटवरून विकत घेतल्यास थेट 10 टक्के डिस्काउंट मिळेल. तसेच गॅलेक्सी टॅब एस7 प्लस आणि गॅलेक्सी टॅब एस7 सह कीबोर्ड कवरवर 10,000 रुपयांची सूट पण मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here