Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा

Samsung आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या नवीन डिवायस Galaxy M42 वर काम करत आहे ज्याचे अनेक दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये या फोनच्या वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तर आज न्यूज एजेंसी IANS ने लॉन्चपूर्वीच Samsung Galaxy M42 5G च्या किंमतीचा खुलासा पण केला आहे. रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंग आपला हा फोन 20,000 ते 25,000 रुपयांदरम्यान लॉन्च करेल आणि हा फोन एप्रिलच्या अखेरीस बाजारात येईल. (Samsung Galaxy M42 5G India price under RS 25000 launch in April with Snapdragon 750G)

Samsung Galaxy M42 5G संबंधित आईएएनएसचा हा रिपोर्ट इंडस्ट्री सोर्सच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार गॅलेक्सी एम42 या महिन्यात भारतात लॉन्च होईल आणि सॅमसंग येत्या काही दिवसांत या फोनच्या लॉन्चची घोषणा करेल. Galaxy M42 ची लॉन्च डेट एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असू शकते. रिपोर्टनुसार या फोनची किंमत 20,000 ते 25,000 रुपयांदरम्यान असेल. फोन किती वेरिएंट्समध्ये लॉन्च होईल हे अजून स्पष्ट झाले नाही.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एम42 बद्दल रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर लॉन्च केला जाईल आणि या चिपसेटमुळे सॅमसंगच्या या फोनमध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट पण असेल. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy M42 क्चॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्याचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. हा फोन 6,000एमएएच बॅटरीसह हा फोन येईल असे रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

Galaxy A72

हे देखील वाचा : 7,040mAh बॅटरी, 10 इंच डिस्प्ले आणि 64GB स्टोरेजसह Samsung Galaxy Tab A7 भारतात लॉन्च

माहिती आली समोर

बोलले जात आहे सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी मध्ये तुम्हाला 6.6 इंचाची HD+ Super AMOLED स्क्रीन मिळेल. तसेच फोनमध्ये Infinity-U waterdrop नॉच दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन Android OS 11 वर काम करेल आणि यात 6 GB RAM मेमरीसह 128 GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर व्यतिरिक्त 8 MP ची अल्ट्रा—वाइड लेंस, 5 MP चा डेफ्थ सेंसर आणि 5 MP ची मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 5G सह 4G VOLTE सपोर्ट, डुअल बॅंड वाय-फाय, USP Type-C पोर्ट मिळेल. Samsung Galaxy M42 5G च्या लॉन्च डेटसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here