Samsung Galaxy Note 9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-announces-best-days-offers-galaxy-note-9-galaxy-s9-plus-discount-cashback-price-cut-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-announces-best-days-offers-galaxy-note-9-galaxy-s9-plus-discount-cashback-price-cut-in-marathi/#respond Tue, 12 Feb 2019 13:37:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3610 गॅलेक्सी नोट 9 च्या खरेदीवर 24,990 रुपयांचा गॅलेक्सी वॉच फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल

The post सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऍप्पल ने आपल्या इंडियन फॅन्सना व्हॅलेंटाईनची भेट देत आईफोन एक्सआर वर मोठ्या ऑफरची सुरवात केली आहे. आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या खरेदीवर कंपनी 5,300 रुपयांची सूट देत आहे. ऍप्पल नंतर आता सॅमसंग ने पण आपला दाव टाकला आहे. जास्तीत जास्त तरुणांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंग ने एक साथ आपल्या दोन हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन वर ऑफर सुरु केली आहे. कंपनीने गॅलेक्सी नोट 9 आणि गॅलेक्सी एस9 प्लस कमी किंमतीती विकले जात होते तसेच डिस्काउंट सह कंपनी या दोन्ही फोन वर कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर पण देत आहे.

सॅमसंगने व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने ‘बेस्ट डेज’ ची सुरवात केली आहे. कंपनीने गॅलेक्सी नोट 9 च्या किंमतीवर 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे त्यात कंपनी ने गॅलेक्सी एस9प्लस च्या किंमतीती 7,000 रुपयांची कपात केली आहे. प्राइज कट नंतर गॅलेक्सी एस9 प्लस चे सर्व वेरिएंट्स कमी किंमतीती विकत घेता येतील तसेच गॅलेक्सी नोट 9 च्या 8जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज वेरिएंट या ऑफर अंतर्गत कमी किंमतीती विकत घेता येईल.

एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन

अशा असतील नव्या किंमती

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 (8जीबी/512जीबी) = 77,900 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ (6जीबी/64जीबी) = 57,900 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ (6जीबी/128जीबी) = 61,900 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ (6जीबी/256जीबी) = 65,900 रुपये

4जीबी रॅम आणि 6.1-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एलजी क्यू9 वन, पडल्यावर पण तुटणार नाही हा मिलिट्री ग्रेड फोन

या ऑफर्सचा पण मिळेल फायदा

प्राइज कट आणि डिस्काउंट व्यतिरिक्त सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 तसेच गॅलेक्सी एस9+ स्मार्टफोन जर एचडीएफसी कार्डने विकत घेतले तर सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 वर 6,000 रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक मिळेल तर गॅलेक्सी एस9 प्लस वर 4,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. एवढेच नव्हे तर काही मर्यादित काळासाठी गॅलेक्सी नोट 9 तसेच गॅलेक्सी एस9+ वर 2,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

सॅमसंग डिस्काउंट आणि कॅशबॅक सोबत आपल्या स्मार्टफोन्स वर 9,000 रुपयांची एक्सचेंज वॅल्यू पण देत आहे. तसेच गॅलेक्सी नोट 9 च्या खरेदीवर 24,990 रुपयांचा गॅलेक्सी वॉच फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल. एकूणच सॅमसंग गॅलेक्सी एस9+ आणि गॅलेक्सी नोट 9 व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने विकत घेतल्यास 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल.

*सॅमसंग गॅलेक्सी एस 9+ च्या प्राइज कटची बातमी आम्ही कंपनीच्या घोषणेच्या आधीच 4 फेब्रुवारीला आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे*

The post सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-announces-best-days-offers-galaxy-note-9-galaxy-s9-plus-discount-cashback-price-cut-in-marathi/feed/ 0
एडवांस सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 इंडिया मध्ये झाला लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हींची कामे करेल एक साथ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-launched-in-india-feature-specifications-price-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-launched-in-india-feature-specifications-price-offer-in-marathi/#respond Thu, 18 Oct 2018 13:08:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2567 गॅलेक्सी नोट 9 इंडियन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे तर आज कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 पण भारतात लॉन्च केला आहे.

The post एडवांस सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 इंडिया मध्ये झाला लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हींची कामे करेल एक साथ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग फॅन्ससाठी ऑगस्ट महिना खूप खास होता. एकाच आठवड्यात सॅमसंग ने एकीकडे आपला सर्वात ताकदवान नोट गॅलेक्सी नोट 9 लॉन्च केला होता तर कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच प अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले होते. गॅलेक्सी नोट 9 इंडियन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे तर आज कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 पण भारतात लॉन्च केला आहे.

सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे. कंपनी ने यात ‘सॅमसंग डेएक्स’ फीचर दिला आहे ज्यामुळे हा टॅबलेट सोबतच लॅपटॉप म्हणून पण वापरता येईल. टॅब सोबत कीबोर्ड अटॅच करू शकता. डेएक्स फीचर मुळे विंडोज लॅपटॉप प्रमाणे यात पण एक साथ अनेक अॅप विंडोज ओपन करता येतात. तसेच यूएसबी पोर्ट द्वारा टॅब एस4 कोणत्याही मॉनिटरशी जोडता येतो.

गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पे​सिफिकेशन्स पाहता सॅमसंग ने हा नवीन डिवाईस 2560 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या डब्ल्यूक्यूएक्सजीए सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा डिवाईस एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो. टॅब एस4 4जीबी रॅम सह 64जीबी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब एस4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या डिवाईस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 7,300एमएएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 सोबतचा ‘एस पेन’ पण खुप एडवांस केलाय आहे. या द्वारे मेमो व नोट्स लिहण्यासोबतच लोकेशन, डायरेक्शन व टेक्स्ट मेसेज पण लिहून सेव पण करता येतील तसेच सेंड पण करता येतील. सॅमसंग ने आपल्या या डिवाईस मध्ये ऐकेजी द्वारा ट्यून्ड 4 स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी एटमॉस चा साउंड देतात.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 57,900 रुपयांमध्ये देशात सेल साठी उपलब्ध होईल. हा डिवाईस आज पासून सॅमसंग वेबसाइट आणि आॅफिशियल रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. तसेच 20 ऑगस्ट पासून गॅलेक्सी टॅब एस4 अमेझॉन इंडिया वरून पण एक्लूसिव विकत घेता येईल. एचडीएफसी क्रेडिट कार्ड ग्राहक गॅलेक्सी टॅब एस4 च्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतील.

The post एडवांस सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 इंडिया मध्ये झाला लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हींची कामे करेल एक साथ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-launched-in-india-feature-specifications-price-offer-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 12:14:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2337 सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही कधी विचार केला आहे का अचानक पणे स्मार्टफोन मधील रॅम बद्दल इतकी चर्चा का सुरू झाली आहे? लोक जास्त रॅम असलेला फोन का शोधत आहेत? त्यामागील एक कारण म्हणजे आता अॅप्स आणि गेम्स हेवी होत आहेत. हाय रेजल्यूशन असलेले हे अॅप्स चालवण्यासाठी जास्त रॅम ची गरज असते नाही तर फोन लॅग होईल किंवा स्लो होईल. फोन मध्ये अॅप्स आणि गेम्स इंटरनल मेमरी मध्ये स्टोर झाले तरी जेव्हा तुम्ही ते चालवता तेव्हा ते रॅम चा वापर करतात. याच कारणामुळे लोक जास्त रॅम असलेला फोन शोधतात. फोन मध्ये रॅम जास्त असल्यास तो लवकर हँग होणार नाही. फोन फास्ट चालेल आणि लॅग पण कमी होईल. सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी 2 प्रो

सध्या भारतीय बाजारात हा सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाला फोन आहे. रियलमी 2 प्रो नुकताच कंपनी ने लॉन्च केला आहे. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

2. शाओमी पोको एफ1

शाओमी ने भारतीय बाजारात पोको नावाने दुसरा ब्रँड सादर केला आहे. या अंतर्गत कंपनी ने पोको एफ1 नावाने पहिला मॉडेल लॉन्च केला आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. 8जीबी वाला वेरियंट 256जीबी मेमरी सह येतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे.

3. असूस झेनफोन 5झेड

या वर्षी असूस ने पण 8जीबी रॅम सह आपला फोन सादर केला आहे. कंपनी झेनफोन 5झेड आणला आहे जो चांगल्या प्रोसेसर सोबत 8जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. याचा एक वेरियंट 6जीबी रॅम सह पण येतो. असूस झेनफोन 5झेड मध्ये 6.2-इंचाची नॉच स्टाइल वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात 6जीबी व 8जीबी रॅम वाले दोन मेमरी वेरियंट उपलब्ध आहेत. 8जीबी रॅम मॉडेल सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर 6जीबी वाला वेरियंट 128जीबी मेमरी सह येतो. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. या फोन मध्ये एआई कॅपेबिलिटी आहे. कॅमेरा सोबत वाइड एंगल सपोर्ट आहे आणि यात एआई इंटीग्रेशन पण देण्यात आला आहे.

4. वनप्लस 6

भारतात 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात वनप्लस ने गेल्या वर्षीच केली होती. या वर्षी पण कंपनी ने 8जीबी रॅम सह वनप्लस 6 आणला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.28-इंच एमोलेड डिस्प्ले आहे जो नॉच स्टाइल सह सादर करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. रॅम सोबत सर्वात ताकदवान प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो यात 2.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण हा मागे नाही आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

5. वीवो नेक्स

ओपो व्यतिरिक्त वीवो ने पण इनविजिबल कॅमेरा वाला फोन सादर केला आहे आणि हा फोन पण खुप दमदार आहे. वीवो ने नेक्स भारतात आणला आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कमेरा देण्यात आला आहे. वीवो नेक्स मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फोन मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे.

6. ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोनच्या बॉडी च्या आत आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप उघडताच फोनच्या बॉडी च्या आतून कॅमेरा सेंसर बाहेर येतात आणि फोटो घेतात. कंपनी ने बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. पण इतर स्पेसिफिकेशन पण काही कमी दमदार नाहीत. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन कलर ओएस 5.1 वर चालतो जो एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

7. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सह कंपनी ने 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात केली ज्यात 512जीबी इंटरनल स्टारेेज देण्यात आली. याचा एक मॉडल 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाला पण आहे. फोन मध्ये एसपेन फीचर आहे जो इतर कोणत्याही फोन मध्ये नाही. तुम्ही यात सहज नोट बनवू शकता आणि याने कॅमेरा कंट्रोल करू शकता आणि यूट्यूब वीडियो प्ले करू शकता. प्रत्येक बाबतीत तुम्हाला हा फोन आवडेल. गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4-इंचाची सुपरएमोलेड कर्व्ड स्क्रीन दिली आहे. फोनचा कॅमेरा पण खुप दमदार आहे. यात एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे जो एफ1.7 अपर्चर सह येतो.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/feed/ 0
24 ऑगस्ट पासून भारतात विकला जाईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-india-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-india-price-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 22 Aug 2018 10:00:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1794 सॅमसंग ने आज इंडियन मार्केट मध्ये आपला सर्वात एडवांस आणि ताकदवान डिवाईस गॅलेक्सी नोट 9 भारतात आॅफिशियली लॉन्च केला आहे. तसे पाहता सॅमसंग ने आधीच गॅलेक्सी नोट 9 ची प्री-बुकिंग सुरू केली आहे आणि काही टेलीकॉम आॅपरेटर सोबतच डिजीटल वॉलेट पण यावर चांगला कॅशबॅक आॅफर देत आहे. पण आज कंपनी चे ग्लोबल हेड डीजे कोह […]

The post 24 ऑगस्ट पासून भारतात विकला जाईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आज इंडियन मार्केट मध्ये आपला सर्वात एडवांस आणि ताकदवान डिवाईस गॅलेक्सी नोट 9 भारतात आॅफिशियली लॉन्च केला आहे. तसे पाहता सॅमसंग ने आधीच गॅलेक्सी नोट 9 ची प्री-बुकिंग सुरू केली आहे आणि काही टेलीकॉम आॅपरेटर सोबतच डिजीटल वॉलेट पण यावर चांगला कॅशबॅक आॅफर देत आहे. पण आज कंपनी चे ग्लोबल हेड डीजे कोह यांच्या उपस्थितीत गॅलेक्सी नोट 9 च्या किंमती सोबत फोन च्या सेल ची तारीख सांगितली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 येत्या 24 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

सर्वात आधी तुम्हाला गॅलेक्सी नोट 9 च्या किंमतीची माहिती सांगतो. सॅमसंग इंडिया ने भारतात गॅलेक्सी नोट 9 2 वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8जीबी  रॅम सोबत 512जीबी पावरफुल इंटरनल स्टोरेज आहे. गॅलेक्सी नोट 9 चे हे दोन्ही वेरिएंट भारतीय बाजारात पण प्रीबुकिंग साठी उपलब्ध आहेत. 6जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 67,900 रुपये ठेवण्यात आली आहे तर 8जीबी रॅम वेरिएंट 84,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

डिजाइन
तुम्ही बघितलेच असेल की कंपनी आपल्या फ्लॅगशिप सीरीज मध्ये काचेचा वापर केला आहे. यावेळी पण असेच झाले आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ची बॉडी काचेपासून बनलेली आहे आणि कोपरे थोडे कर्व्ड आहे. हा मोठ्याप्रमाणात गॅलेक्सी नोट 8 सारखाच आहे पण काही चांगले बदल दिसतील. आधीपेक्षा बेजल्स खुप कमी झाले आहेत तर फिंगरप्रिंट प्लेसमेंट पण बदलली आहे. फोनच्या मागील पॅनल वर होरिजेंटल स्टाइल मध्ये कॅमेरा देण्यात आला आहे आणि याच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. पण नोट 8 मध्ये कॅमेरा सोबतच देण्यात आला होता. नोट 9 आईपी68 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा धुळ आणि पाण्यापासून वाचू शकतो.

डिस्प्ले
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4—इंचाची सुपरएमोलेड स्क्रीन दिली आहे. नोट 8 प्रमाणे कंपनी ने यात पण कर्व्ड डिस्प्ले वापरला आहे. हा क्यूएचडी+ डिस्प्ले आहे. फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 1440 x 2960 पिक्सल आहे. चांगली बाब ही आहे की स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. फोन चा डिस्प्ले एचडीआर 10 कंपॅटिबल आहे आणि यात पण सॅमसंग ट्रेडमार्क आॅलवेज आॅन डिस्प्ले मिळेल.

कॅमेरा
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 कंपनी ने डुअल रियर कॅमेरा सह सादर केला आहे. फोन मध्ये एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12—मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा एक सेंसर वाइड एंगल आहे तर दुसरी टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. दुसरा सेंसर एफ2.4 अपर्चर सह सादर करण्यात आला आहे. ब्लर बॅकग्राऊंड सह हा ओएसएस ला पण सपोर्ट करतो. फोन मध्ये अल्ट्रास्लो मोशन वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आहे. कॅमेरा सोबत 2एक्स आॅप्टिकल झूम आणि 10एक्स डिजिटल झूम देण्यात आला आहे. नोट 9 चा सेल्फी कॅमेरा 8—मेगापिक्सलचा आहे. जो एफ1.7 अपर्चर सह आॅटो फोकस ला सपोर्ट करतो.

प्रोसेसर
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ला कंपनी ने दोन प्रोसेसर सह सादर केले आहे. एक मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर उपलब्ध आहे आणि दुसरा सॅमसंग च्या एक्सनोस 9810 चिपसेट वर. भारतात एक्सनोस चिपसेट वाला फोन उपलब्ध होईल. यात तुम्हाला 10 नॅनो मीटर वाला 64बिट्सचा आॅक्टाकोर प्रोसेसर ( 2.7 गीगाहट्र्ज आॅक्टाकोर + 1.7 गीगाहट्र्ज आॅक्टाकोर) मिळेल. कंपनी चा दावा आहे की हा फोन आधीपेक्षा खुप फास्ट आहे आणि भारी ग्राफिक्स वाले गेम सहज खेळता येतील. तसेच यात हीटिंग ची समस्या पण नसेल. ग्राफिक्स साठी माली-जी72 एमपी18 – ईएमईए जीपीयू देण्यात आला आहे.

मेमरी
पहिल्यांदाच कंपनी ने 8जीबी रॅम चा वापर केला आहे. गॅलेक्सी नोट 9 चा एक मॉडेल 8जीबी रॅम सोबत 512जीबी इंटरनल मेमरी सह उपलब्ध आहे. कंपनी ने नवीन टेक्नोलॉजी वाल्या एलपीडीडीआर4 रॅम चा वापर केला आहे. तर दुसर्‍या मॉडेल मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

डेटा आणि कनेक्टिविटी
कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही स्लॉट मध्ये नॅनो सिम वापरता येतील. पण दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे तिथे सिम किंवा माइक्रोएसडी कार्ड पैकी काहीतरी एक वापरता येईल. त्याचबरोबर एनएफसी, हार्डरेट मॉनिटर आणि वाईफाई पण मिळेल.

बॅटरी
कंपनी ने यावेळी आपला नोट फोन मोठया बॅटरी सह सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये तुम्हाला 4,000 एमएएच की बॅटरी मिळेल. ही फास्ट चार्जिंग सोबत वायरलेस चार्जिंग ला पण सपोर्ट करते.

एसपेन
तुम्हाला तर माहित आहे सॅमसंग गॅलेक्सी नोट सीरीज खासकरून आपल्या एसपेन साठी ओळखला जातो. या फोन सोबत पण तुम्हाला एसपेन मिळेल जो आधीपेक्षा जास्त अडवांस आणि स्टइलिश असेल. खास बाब ही आहे की एसपेन मध्ये पण ब्लूटूथ सपोर्ट आहे आणि हा फोन सोबत रिमोट प्रमाणे वापरता येईल. स्मार्ट सलेक्शन, कॉपी पेस्ट, एयर जेस्चर, ट्रांस्लेशन, आणि ड्राइंग सोबतच हा रिमोटली फोनचे अनेक फीचर्स कंट्रोल करू शकेल. फोन च्या एसपेन ने तुम्ही सेल्फी, ग्रुप पिक्चर, स्लाइड प्रजेंटेशन, वीडियो प्ले आणि पाॅज सहित अनेक कामे करू शकता.

The post 24 ऑगस्ट पासून भारतात विकला जाईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-india-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0
22 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, कंपनी ने पाठवले मीडिया इन्वाईट, ही असेल या फोनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-to-launch-in-india-on-22-august-offer-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-to-launch-in-india-on-22-august-offer-price-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 16 Aug 2018 13:37:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1728 6जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 67,900 रुपये ठेवण्यात आली आहे तर 8जीबी रॅम वेरिएंट 84,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 22 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, कंपनी ने पाठवले मीडिया इन्वाईट, ही असेल या फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने 9 ऑगस्टला अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या गॅलेक्सी नोट सीरीज ला पुढे नेत कंपनी चा सर्वात ताकदवान आणि दमदार डिवाईस गॅलेक्सी नोट 9 सादर केला होता. इंटरनेशनल मार्केट सोबतच भारतातील सॅमसंग फॅन आणि टेक लवर पण हा डिवाईस भारतात लॉन्च होण्याची वाट बघत आहेत. आज सॅमसंग इंडिया ने घोषणा केली आहे की गॅलेक्सी नोट 9 येत्या 22 ऑगस्टला भारतात लॉन्च केला जाईल.

सॅमसंग इंडिया ने आज गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च ईवेंट साठी मीडिया इन्वाईट शेयर केला आहे. कंपनी ने सांगितले आहे की गॅलेक्सी नोट 9 22 ऑगस्टला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे सॅमसंग ने आधीच गॅलेक्सी नोट 9 ची प्रीबुकिंग सुरू केली आहे आणि काही टेलीकॉम आॅपरेटर सोबतच डिजीटल वॉलेट पण यावर जबरदस्त कॅशबॅक आॅफर देत आहेत. तर शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 साठी प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे.

गॅलेक्सी नोट 9 सॅमसंग ने अंर्तराष्ट्रीय बाजारात 2 वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सोबत 512जीबी पावरफुल इंटरनल स्टोरेज आहे. गॅलेक्सी नोट 9 चे हे दोन्ही वेरिएंट भारतीय बाजारात पण प्रीबुकिंग साठी उपलब्ध आहेत. 6जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 67,900 रुपये ठेवण्यात आली आहे तर 8जीबी रॅम वेरिएंट 84,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गॅलेक्सी नोट 9 22 ऑगस्टला इंडिया मध्ये लॉन्च होऊन कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी फोन लॉन्च ची वाट बघावी लागेल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या फुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स च्या माहितीसाठी (इथे क्लिक करा). तसेच सॅमसंग च्या या शानदार डिवाईस वर कंपनी कडून मिळणार्‍या आॅफर्स च्या माहिती साठी (इथे क्लिक करा).

The post 22 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, कंपनी ने पाठवले मीडिया इन्वाईट, ही असेल या फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-to-launch-in-india-on-22-august-offer-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0
‘एस पेन’ ने घेता येतील फोटो ​आणि हात न लावता चालेल गॅलेक्सी नोट 9, जाणून घ्या या छोट्या डिवाईस चे 5 मोठे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/5-amazing-feature-of-samsung-galaxy-note-9-s-pen-with-bluetooth-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/5-amazing-feature-of-samsung-galaxy-note-9-s-pen-with-bluetooth-in-marathi/#respond Fri, 10 Aug 2018 08:10:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1675 ब्लूटूथ कनेक्टिविटी एस पेन ला अल्टीमेट रिमोट कंट्रोल बनवते ज्यामुळे हा गॅलेक्सी नोट 9 सोबत कनेक्ट करून फोन चा हॅण्डस फ्री यूज केला जाऊ शकतो.

The post ‘एस पेन’ ने घेता येतील फोटो ​आणि हात न लावता चालेल गॅलेक्सी नोट 9, जाणून घ्या या छोट्या डिवाईस चे 5 मोठे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काल भरपुर प्रतीक्षेनंतर आपला सर्वात ताकदवान डिवाईस गॅलेक्सी नोट 9 जगासमोर आणला. गॅलेक्सी नोट 9 चा लॉन्च ईवेंट न्यूयार्क मध्ये आयोजित करण्यात आला होता. जो भारतातील टेक प्रेमी पण बघत होते. ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग ने दमदार डिवाईस गॅलेक्सी नोट 9 सोबत दोन शानदार व स्टाइलिश स्मार्ट वॉच पण सादर केले आहेत. या मोठ्या लॉन्च दरम्यान एका खास गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि तो आहे गॅलेक्सी नोट 9 सोबत मिळणारा ‘एस पेन’.

एस पेन चे महत्व यावरुन समजते कि कंपनी गॅलेक्सी नोट 9 सोबत बॉक्स वर ‘एस पेन’ चा फोटो लाऊन बाजारात घेऊन येत आहे. एस पेन ला खुप एडवांस करत सॅमसंग ने हा ब्लूटूथ सपोर्ट सह सादर केला आहे. ब्लूटूथ कनेक्टिविटी एस पेन ला अल्टीमेट रिमोट कंट्रोल बनवते ज्यामुळे हा गॅलेक्सी नोट 9 सोबत कनेक्ट करून फोन चा हॅण्डस फ्री यूज केला जाऊ शकतो. आम्ही एस पेन चे 5  शानदार फीचर्स सांगितले आहेत, जे वाचून तुम्ही हैराण व्हाल.

1. एस पेन घेईल सेल्फी
हे फीचर मजेदार असेल असे वाटते आहे की एस पेन ने सेल्फी घेता येईल. आधी सांगितल्याप्रमाणे यावेळी कंपनी ने एस पेन मध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी दिली आहे. या कनेक्टिविटी मुळे तुम्ही फोन च्या कॅमेरा वर क्लिक बटन दाबण्याची गरज नाही, फक्त एस पेन वरील बटन प्रेस करताच फोटो क्लिक होईल. म्हणजे तुम्ही फोन लांब ठेऊन त्याला हात न लावता फोटो क्लिक करू शकाल. आता ग्रुप सेल्फी मध्ये फोन लांब ठेऊन, कोणत्याही मित्राला फ्रेम बाहेर न ठेवता शानदार सेल्फी घेता येईल. एस पेन फोन ने 30 फुटांवरून पण फोटो क्लिक करता येईल.

2. यूट्यूब वापरणे झाले सोप्पे
घरात पार्टी चालू असेल किंवा तुम्ही स्पीकर सोबत फोन कनेक्ट करून गाणी ऐकत असाल. ही गाणी तुम्ही यूट्यूब वरून ऐकत असाल आणि जर लागलेले गाणे तुमच्या आवडीचे नसेल तर तुम्हाला तुमच्या जागेवरून उठून फोन पर्यंत जावे लागत होते. पण एस पेन तुमचा हा त्रास वाचवेल. आता तुम्ही दुरूनच एस पेन च्या क्लिक ने यूट्यूब वर चालू असलेली गाणी प्ले व पॉज करू शकता आणि नेक्टस गाण्यावर पण जाऊ शकता. म्हणजे पार्टी यूं ही चालेगी..

3. चुटकीसरशी बनेल स्लाइड प्रेजेंटेशन
आॅफिसचे काम असो वा मुलांच्या शाळेचे प्रेजेंटेशन, एस पेन च्या मदतीने गॅलेक्सी नोट 9 मध्ये हे काम एका झटक्यात. गॅलेक्सी नोट 9 मध्ये फक्त तुम्हाला सब्जेक्ट अनुरूप प्रेजेंटेशन बनवता येत नाही, तर एस पेन मुळे प्रेजेंटेशन व स्लाइड वापरता पण येतील. गॅलेक्सी नोट 9 मोठया स्क्रीन किंवा प्रोजेक्टरशी कनेक्ट करून एस पेन च्या या फीचर लाभ घेता येईल. फक्त छोटासा हा एस पेन हातात घेऊन संपूर्ण स्लाइड प्रेजेंटेशन करता येईल.

4. ड्राइंग व स्मार्ट सिलेक्शन
प्रेजेंटेशन सोबतच एस पेन ने गॅलेक्सी नोट 9 मध्ये तुम्ही कोणतेही स्केच काढू शकता. एस पेन पेंटिंग ब्रश प्रमाणे वापरता येईल आणि विना दिक्कत एस पेन फक्त गॅलेक्सी नोट 9 च्या डिस्प्ले वर वापरून चित्र काढता येईल. गॅलेक्सी नोट 9 ची मोठी स्क्रीन हे काम अजून मजेदार बनवते. तसेच एस पेन मध्ये फोन मधील कोणतेही कटेंट कॉपी व पेस्ट करण्यासाठी स्मार्ट सलेक्शन ची सुविधा पण देण्यात आली आहे.

5. फोन बंद झाल्यावर पण वापरता येईल
एस पेन ने फक्त फोन मध्ये अॅप ओपन असल्यावर ते एक्सेस करता येतील असे नाही तर फोन स्लीप मोड मध्ये असतानाही एस पेन ने फोन मधील अॅप्सना कमांड देता येईल. जसे की एस पेन बटन लॉन्ग प्रेस केल्यास फोन मध्ये आपोआप कॅमेरा ओपन होईल. तसेच डबल क्लिक केल्यास सेल्फी कॅमेरा पण ओपन होईल. तसेच फोन गॅलेरी मधील सेव फोटोज पण एस पेन ने एक्सेस करता येतील. एस पेन वर क्लिक करताच गॅलेरी मधील फोटो मागे पुढे करता येतील.

एस पेन ब्लूटूथ लो एनर्जी कनेक्टिविटी टेक्नोलॉजी वर बनवलेला आहे. सॅमसंग ने सांगितले आहे की ‘एस पेन’ एका चार्ज वर जवळपास 200 वेळा क्लिक करू शकतो. विशेष म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होताच हा गॅलेक्सी नोट 9 मध्ये टाकताच हा फक्त 1 मिनिटात चार्ज होतो आणि पुन्हा 200 क्लिक पर्यंत चालतो. तसेच बॅटरी नसतानाही एस पेन स्टाइलस प्रमाणे वापरता येईल.

फोटो सौजन्य : engadget.com

The post ‘एस पेन’ ने घेता येतील फोटो ​आणि हात न लावता चालेल गॅलेक्सी नोट 9, जाणून घ्या या छोट्या डिवाईस चे 5 मोठे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-amazing-feature-of-samsung-galaxy-note-9-s-pen-with-bluetooth-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला सॅमसंगचा सर्वात ताकदवान फोन गॅलेक्सी नोट 9, यात आहे 512जीबी स्टोरेज, डुअल कॅमेरा आणि रिमोट वाला एसपेन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Fri, 10 Aug 2018 05:49:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1669 आम्ही न्यूयॉर्क मध्ये नव्हतो पण भारतातून हा इवेंट लाइव बघत होतो आणि या बहुप्रतिक्षित इवेंट चे साक्षी झालो.

The post लॉन्च झाला सॅमसंगचा सर्वात ताकदवान फोन गॅलेक्सी नोट 9, यात आहे 512जीबी स्टोरेज, डुअल कॅमेरा आणि रिमोट वाला एसपेन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इवेंट ला गर्दी खुप होती आणि सर्वांच्या नजारा स्टेज कडे होत्या. जरी या इवेंट चे आयोजन अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये होत असले तरी जगभरातील लोकांचे त्याकडे लक्ष होते. आणि कारण होते की आज सॅमसंगचा सर्वोत्कृष्ट फोन लॉन्च होणार होता. हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत, आम्ही सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलतोय. कंपनी दरवर्षी नोट सीरीज मध्ये एक फोन लॉन्च केल्या नंतर आपल्या फीचर्स मुळे चर्चेत असते आणि यावेळी तर गॅलेक्सी नोट 9 बद्दल ही चर्चा अजूनच मोठी होती. आम्ही न्यूयॉर्क मध्ये नव्हतो पण भारतातून हा इवेंट लाइव बघत होतो आणि या बहुप्रतिक्षित इवेंट चे साक्षी झालो. फोन प्रदर्शित होताच संपूर्ण हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आता प्रत्येकाला उत्सुकता होती ती सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या फीचर्सची आणि कंपनी ने एक एक करुन या फोन बद्दल सांगायला सुरवात केली. सर्वात आधी एसपेन पासून सुरवात करू.

एसपेन
तुम्हाला तर माहित आहे सॅमसंग गॅलेक्सी नोट सीरीज खासकरून आपल्या एसपेन साठी ओळखला जातो. या फोन सोबत पण तुम्हाला एसपेन मिळेल जो आधीपेक्षा जास्त अडवांस आणि स्टइलिश असेल. खास बाब ही आहे की एसपेन मध्ये पण ब्लूटूथ सपोर्ट आहे आणि हा फोन सोबत रिमोट प्रमाणे वापरता येईल. स्मार्ट सलेक्शन, कॉपी पेस्ट, एयर जेस्चर, ट्रांस्लेशन, आणि ड्राइंग सोबतच हा रिमोटली फोनचे अनेक फीचर्स कंट्रोल करू शकेल. फोन च्या एसपेन ने तुम्ही सेल्फी, ग्रुप पिक्चर, स्लाइड प्रजेंटेशन, वीडियो प्ले आणि पाॅज सहित अनेक कामे करू शकता.

डिजाइन
तुम्ही बघितलेच असेल की कंपनी आपल्या फ्लॅगशिप सीरीज मध्ये काचेचा वापर केला आहे. यावेळी पण असेच झाले आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ची बॉडी काचेपासून बनलेली आहे आणि कोपरे थोडे कर्व्ड आहे. हा मोठ्याप्रमाणात गॅलेक्सी नोट 8 सारखाच आहे पण काही चांगले बदल दिसतील. आधीपेक्षा बेजल्स खुप कमी झाले आहेत तर फिंगरप्रिंट प्लेसमेंट पण बदलली आहे. फोनच्या मागील पॅनल वर होरिजेंटल स्टाइल मध्ये कॅमेरा देण्यात आला आहे आणि याच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. पण नोट 8 मध्ये कॅमेरा सोबतच देण्यात आला होता. नोट 9 आईपी68 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा धुळ आणि पाण्यापासून वाचू शकतो.

डिस्प्ले
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4—इंचाची सुपरएमोलेड स्क्रीन दिली आहे. नोट 8 प्रमाणे कंपनी ने यात पण कर्व्ड डिस्प्ले वापरला आहे. हा क्यूएचडी+ डिस्प्ले आहे. फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 1440 x 2960 पिक्सल आहे. चांगली बाब ही आहे की स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. फोन चा डिस्प्ले एचडीआर 10 कंपॅटिबल आहे आणि यात पण सॅमसंग ट्रेडमार्क आॅलवेज आॅन डिस्प्ले मिळेल.

कॅमेरा
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 कंपनी ने डुअल रियर कॅमेरा सह सादर केला आहे. फोन मध्ये एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12—मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा एक सेंसर वाइड एंगल आहे तर दुसरी टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. दुसरा सेंसर एफ2.4 अपर्चर सह सादर करण्यात आला आहे. ब्लर बॅकग्राऊंड सह हा ओएसएस ला पण सपोर्ट करतो. फोन मध्ये अल्ट्रास्लो मोशन वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट आहे. कॅमेरा सोबत 2एक्स आॅप्टिकल झूम आणि 10एक्स डिजिटल झूम देण्यात आला आहे. नोट 9 चा सेल्फी कॅमेरा 8—मेगापिक्सलचा आहे. जो एफ1.7 अपर्चर सह आॅटो फोकस ला सपोर्ट करतो.

प्रोसेसर
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ला कंपनी ने दोन प्रोसेसर सह सादर केले आहे. एक मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर उपलब्ध आहे आणि दुसरा सॅमसंग च्या एक्सनोस 9810 चिपसेट वर. भारतात एक्सनोस चिपसेट वाला फोन उपलब्ध होईल. यात तुम्हाला 10 नॅनो मीटर वाला 64बिट्सचा आॅक्टाकोर प्रोसेसर ( 2.7 गीगाहट्र्ज आॅक्टाकोर + 1.7 गीगाहट्र्ज आॅक्टाकोर) मिळेल. कंपनी चा दावा आहे की हा फोन आधीपेक्षा खुप फास्ट आहे आणि भारी ग्राफिक्स वाले गेम सहज खेळता येतील. तसेच यात हीटिंग ची समस्या पण नसेल. ग्राफिक्स साठी माली-जी72 एमपी18 – ईएमईए जीपीयू देण्यात आला आहे.

मेमरी
पहिल्यांदाच कंपनी ने 8जीबी रॅम चा वापर केला आहे. गॅलेक्सी नोट 9 चा एक मॉडेल 8जीबी रॅम सोबत 512जीबी इंटरनल मेमरी सह उपलब्ध आहे. कंपनी ने नवीन टेक्नोलॉजी वाल्या एलपीडीडीआर4 रॅम चा वापर केला आहे. तर दुसर्‍या मॉडेल मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

डेटा आणि कनेक्टिविटी
कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही स्लॉट मध्ये नॅनो सिम वापरता येतील. पण दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे तिथे सिम किंवा माइक्रोएसडी कार्ड पैकी काहीतरी एक वापरता येईल. त्याचबरोबर एनएफसी, हार्डरेट मॉनिटर आणि वाईफाई पण मिळेल.

बॅटरी
कंपनी ने यावेळी आपला नोट फोन मोठया बॅटरी सह सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये तुम्हाला 4,000 एमएएच की बॅटरी मिळेल. ही फास्ट चार्जिंग सोबत वायरलेस चार्जिंग ला पण सपोर्ट करते.

The post लॉन्च झाला सॅमसंगचा सर्वात ताकदवान फोन गॅलेक्सी नोट 9, यात आहे 512जीबी स्टोरेज, डुअल कॅमेरा आणि रिमोट वाला एसपेन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट, 19 ऑगस्ट पासून होऊ शकते अगस्त से हो सकती है प्री-बुकिंग शुरू https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-flipkart-19-august-in-india-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-flipkart-19-august-in-india-launch-in-marathi/#respond Mon, 30 Jul 2018 10:23:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1452 देशातील प्रसिद्ध शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चा प्रोडक्ट पेज पण बनवण्यात आला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट, 19 ऑगस्ट पासून होऊ शकते अगस्त से हो सकती है प्री-बुकिंग शुरू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने एक आठवड्यापूर्वी आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते की दिग्गज टेक कंपनी सॅमसंग ऑगस्ट च्या 19 तारखेला आपला आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस गॅलेक्सी नोट 9 भारतात सादर करेल. हा डिवाईस 9 ऑगस्ट ला ग्लोबल मंचावरून लॉन्च होईल तसेच 10 दिवसानंतर 19 ऑगस्ट पासून भारतात प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल. आता देशातील प्रसिद्ध शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चा प्रोडक्ट पेज पण बनवण्यात आला आहे. या पेज वरून स्पष्ट झाले आहे की सॅमसंग चा नेक्स्ट नोट फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल.

फ्लिपकार्ट ने सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चा स्पेशल वेबपेज बनवाला आहे ज्यावर फोन च्या ग्लोबल लॉन्च ची तारीख म्हणजे 9 ऑगस्ट लिहिण्यात आली आहे. वेबपेज वरून हे कन्फर्म झाले आहे की फ्लिपकार्ट फोन चा लॉन्च ईवेंट आपल्या वेबसाइट वर लाईव दाखवणार आहे तर दुसरीकडे भारतात फोन चा सेल फ्लिपकार्ट वरून होईल हे देखील स्पष्ट झाले आहे. या वेबपेज वरून फोन च्या मोठया स्टोरेज, पावरफुल बॅटरी बॅकअप आणि दमदार प्रोसेसिंग चा खुलासा करण्यात आला आहे.

गॅलेक्सी नोट 9 चे स्पेसिफिकेशन्स फ्लिपकार्ट वर दिसत नाहीत पण 3 वेगवेगळ्या वीडियोज वरून फोन च्या स्टोरेज, बॅटरी व चिपसेट च्या पावर चा अंदाज लावता येतो. विशेष म्हणजे 9 ऑगस्ट ला सॅमसंग न्यूयॉर्क मध्ये ईवेंट चे आयोजन करून गॅलेक्सी नोट 9 ग्लोबल मंचावर लॉन्च करेल. तसेच आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 19 ऑगस्ट पासून भारतात प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल तसेच सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यापासून याचा सेल सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ची प्राइस जवळपास 72,990 रुपये असू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चे स्पेसिफिकेशन पाहता आता पर्यंत आलेल्या लीक्स नुसार हा फोन 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम असू शकते तसेच फोन 6.3-इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलले जात आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

गॅलेक्सी नोट 9 मध्ये 6जीबी रॅम मेमरी मिळू शकते. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. गॅलेक्सी नोट 9 मध्ये हॉरिजेंटल शेप चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर फोन च्या मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. तसेच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

सॅमसंग च्या गॅलेक्सी नोट सीरीज ची ओळख असलेला स्टायलस म्हणजे एसपेन पण यावेळी कंपनी ने आधीपेक्षा जास्त एडवांस व हाईटक केला आहे. बोलले जात आहे की सॅमसंग यावेळी एसपेन ब्लूटूथ​ कनेक्टिविटी सह सादर करेल. जेस्चर कंट्रोल वापरून एसपेन ने फोन चे म्यूजिक कंट्रोल केले जाऊ शकते, गॅलेरी एक्सेस करता येईल तसेच हा टाइमर प्रमाणे पण वापरता येइल.

The post सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट, 19 ऑगस्ट पासून होऊ शकते अगस्त से हो सकती है प्री-बुकिंग शुरू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-flipkart-19-august-in-india-launch-in-marathi/feed/ 0
बंद होणार आहे का सॅमसंग ची ‘गॅलेक्सी एस’ सीरीज? https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-merge-galaxy-s-series-with-galaxy-note-series-before-galaxy-s10-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-merge-galaxy-s-series-with-galaxy-note-series-before-galaxy-s10-launch-in-marathi/#respond Mon, 23 Jul 2018 12:47:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1378 सॅमसंग बद्दल बातमी येत आहे की येत्या काळात कंपनी च्या गॅलेक्सी एस सीरीज मध्ये मोठा बदल होऊ शकतो.

The post बंद होणार आहे का सॅमसंग ची ‘गॅलेक्सी एस’ सीरीज? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग स्मार्टफोंस ची ओळख जगभरात ‘गॅलेक्सी’ शब्दावरून होते. सॅमसंग ची ‘गॅलेक्सी एस’ सीरीज कंपनी ची सर्वात जास्त विकली जाणार्‍या स्मार्टफोन सीरीज पैकी एक आहे. गॅलेक्सी एस सीरीज खासकरून हाई बजेट वाल्या फ्लॅगशिप स्मार्टफोंस साठी प्रसिद्ध आहे. गॅलेक्सी एस8, गॅलेक्सी एस9 च्या यशानंतर आता कंपनी या सीरीज च्या नवीन फोन वर काम करत आहे आणि काही दिवसांमध्ये हे टेक जगासमोर येतील. पण सॅमसंग च्या या फेमस सीरीज बद्दल एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे की लवकरच सॅमसंग ची गॅलेक्सी एस सीरीज बंद होऊ शकते.

सॅमसंग बद्दल बातमी येत आहे की येत्या काळात कंपनी च्या गॅलेक्सी एस सीरीज मध्ये मोठा बदल होऊ शकतो. कोरियन मीडिया मध्ये बातमी आली आहे की सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप गॅलेक्सी एस सीरीज आणि गॅलेक्सी नोट सीरीज एकत्र करू शकते. सॅमसंग वाइस चेयरमन जे ली म्हणतात की येत्या काळात गॅलेक्सी एस सीरीज आणि एस पेन असलेली गॅलेक्सी नोट सीरीज एकच होतील. म्हणजे यूजर्सना या दोन्ही पैकी एकाच सीरीज चे स्मार्टफोन मिळतील.

ली ने आपल्या वक्तव्यात ही गोष्ट अपूर्णच ठेवली आहे त्यामुळे टेक जगात चर्चेला उधाण आले आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार सॅमसंग स्वतः आपल्या गॅलेक्सी एस सीरीज आणि गॅलेक्सी नोट सीरीज मधील स्पर्धेत अडकली आहे. या दोन्ही सॅमसंग सीरीज चे स्मार्टफोन एकमेकांना बाजारात टक्कर देत आहेत तसेच आपलच मार्केट कमजोर करत आहेत. सॅमसंग फॅन्स एक बेस्ट फोन मिळवण्यासाठी गॅलेक्सी एस किंवा गॅलेक्सी नोट पैकी एक निवडत आहेत आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करत आहेत याचा तोटा कंपनी ला होत आहे.

सॅमसंग च्या वेगवेगळ्या स्मार्टफोंस मधील स्पर्धेचा तोटा कंपनी ला भोगावा लागत आहे. उदाहरणार्थ सॅमसंग एकीकडे गॅलेक्सी एस8 डिवाईस लॉन्च करते आणि थोड्याच दिवसांनी गॅलेक्सी नोट 8 बाजारात येतो. त्यामुळे सॅमसंग ने मार्केट मध्ये आधी आणलेल्या गॅलेक्सी एस 8 चा स्टॉक तसाच राहतो आणि यूजर गॅलेक्सी नोट 8 कडे वळतात. अशा परिस्थितिला दोन्ही गॅलेक्सी सीरीजला सामोरे जावे लागते.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी सॅमसंग ने 11 मिलियन सेल च्या टारगेट सह गॅलेक्सी नोट 8 लॉन्च केला होता. आणि बातमी आहे की कंपनी यावेळी गॅलेक्सी नोट 9 12 मिलियन सेल च्या टारगेट सह बाजारात आणणार आहे. म्हणजे सॅमसंग स्वतःहून बाजारात गॅलेक्सी नोट सीरीज चा जास्त स्टॉक आणत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनी गॅलेक्सी नोट 9 मुळे गॅलेक्सी एस9 कमी करू इच्छित नाही.

सॅमसंग बद्दल बोलले जात आहे की पुढल्या वर्षी कंपनी गॅलेक्सी एस सीरीज गॅलेक्सी नोट सीरीज मध्ये विलीन करेल. त्यानंतर एकाच स्मार्टफोन सीरीज चे फोन बाजारात येतील. रिपोर्ट्स नुसार कंपनी गॅलेक्सी एस10 चे 3 वेरिएंट लॉन्च करणार आहे. या वेरिएंट्स मधील एक गॅलेक्सी एस10+ असेल जो गॅलेक्सी नोट सीरीज ची ओळख असलेल्या ‘एस पेन’ सह येईल. या वेरिएंट चा डिस्प्ले पण इतर वेरिएंट्स पेक्षा मोठा असेल.

गॅलेक्सी एस10+ एस पेन सोबत सादर येण्याचा अर्थ हाच काढला जात आहे की गॅलेक्सी एस10+ लॉन्च केल्यानंतर कंपनी गॅलेक्सी नोट10 सादर करणार नाही. गॅलेक्सी एस सीरीज मध्ये एस पेन सोबत लॉन्च होणारा डिवाईस गॅलेक्सी नोट 10 च्या जागी सादर केला जाईल. असे झाल्यास गॅलेक्सी नोट सीरीज मध्ये नवीन कोणताही डिवाईस येणार नाही आणि नोट फीचर्स वाला स्मार्टफोन गॅलेक्सी एस सीरीज मध्ये लॉन्च होईल.

सॅमसंग कडून हा निर्णय होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. पण जर कंपनी ने गॅलेक्सी एस सीरीज आणि गॅलेक्सी नोट सीरीज एक केली तर कंपनी चे हे डिवाईस खुपच एडवांस असतील आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह येतील त्याचबरोबर फ्लॅगशिप चे नवीन रेकॉर्ड बनवतील. या बातमी कडे दुर्लक्ष करून चालणार नाही सॅमसंग या दोन्ही सीरीज एकत्र करू शकते तसेच टेक बाजारात आपली स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एक्स’ सादर करू शकते जी फ्लेक्सिबल ​डिस्प्ले सह येईल.

The post बंद होणार आहे का सॅमसंग ची ‘गॅलेक्सी एस’ सीरीज? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-merge-galaxy-s-series-with-galaxy-note-series-before-galaxy-s10-launch-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये एस पेन ने बदलता येतील गाणी, वायरलेस स्पीकर प्रमाणे चालेल हा ‘स्मार्ट पेन’ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-bluetooth-s-pen-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-bluetooth-s-pen-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 02 Jul 2018 08:04:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1121 तसेच या डिवाईस मध्ये स्मार्ट बँड किंवा फिटनेस बँड सारखे काही फीचर्स पण मिळतील.

The post सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये एस पेन ने बदलता येतील गाणी, वायरलेस स्पीकर प्रमाणे चालेल हा ‘स्मार्ट पेन’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने मागच्या आठवड्यात एक 22 सेकेंड चा टीजर शेयर केला होता ज्यात सांगण्यात आले होते की येत्या 9 ऑगस्ट ला कंपनी आपल्या गॅलेक्सी सीरीज चा सर्वात दमदार स्मार्टफोन नोट 9 लॉन्च करणार आहे. या टीजर मध्ये सॅमसंग ने नवीन डिवाईस च्या लॉन्च डेट चा खुलासा तर केलाच सोबत ‘एस पेन’ पण दाखविला होता. गॅलेक्सी एस9 की लॉन्च डेट संपूर्ण टेक विश्वाला समजली आहे तर आता या हाईएंड डिवाईस चा महत्वाचा भाग असलेल्या एस पेन बद्दल पण अनोखी माहिती समोर आली आहे. या बातमी मधून एस पेन मध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी असल्याची बाब समोर आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या एस पेन बद्दल आइस यूनिवर्स ने ही माहिती दिली आहे. या टेक वेबसाइट ने सांगितले आहे की सॅमसंगचा एस पेन यावेळी आधीपेक्षा वेगळा आणि खुप खास असणार आहे. कंपनी हा डिवाईस ब्लूटूथ​ कनेक्टिविटी सह सादर करू शकते. ब्लूटूथ इनेबल असल्यामुळे नवीन एस पेन स्मार्टफोन हातात न घेता अनेक कामे करू शकेल. एस पेन ने फोन मधील म्यूजिक कंट्रोल केला जाऊ शकतो तसेच हा टाइमर प्रमाणे पण वापरता येईल.

लीक मध्ये बोलले जात आहे की एस पेन वायरलेस ब्लूटूथ स्पीकर्स प्रमाणे पण वापरता येईल. तसेच या डिवाईस मध्ये स्मार्ट बँड किंवा फिटनेस बँड सारखे काही फीचर्स पण मिळतील. पण नवीन एस पेन मध्ये कोणते खास फीचर्स असतील हे अजून पूर्णपणे स्पष्ट झाले नाही पण हे बोलू शकतो की न्यू एस पेन आधीच्या एस पेन पेक्षा एडवांस असेल आणि गॅलेक्सी एस 9 सोबत हा खुप उपयोगी ठरेल.

काही लीक्स नुसार गॅलेक्सी नोट 9 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम असू शकते तसेच फोन 6.3-इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलले जात आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

गॅलेक्सी नोट 9 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी तसेच 6जीबी रॅम आॅप्शन उपलब्ध होतील. तसेच फोन मध्ये 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी नोट 9 मध्ये 3,850एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. असे बोलले जात आहे की सॅमसंग 9 ऑगस्ट ला गॅलेक्सी नोट 9 सोबत गॅलेक्सी टॅब एस4 आणि सॅमसंग गियर एस4 पण आॅफिशियल करू शकते.

The post सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये एस पेन ने बदलता येतील गाणी, वायरलेस स्पीकर प्रमाणे चालेल हा ‘स्मार्ट पेन’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-bluetooth-s-pen-feature-specifications-in-marathi/feed/ 0