एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन

मागच्या दोन वर्षात ज्या फोनची सर्वात जास्त चर्चा झाली असेल तर तो आहे नोकिया 9 स्मार्टफोन. 2017 पासूनच या फोनचे लीक्स येत आहेत पण आतापर्यंत हा लॉन्च केला गेला नाही. पण आता ज्याप्रकारे लीक येत आहेत त्यावरून आता जवळपास हे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच हा सादर करणार आहे. कंपनी फेब्रुवारीच्या शेवटी आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस 2019 मध्ये इवेंट करत आहे आणि त्यात फोन सादर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स द्वारा या फोनचा लीक प्रकाशित केला गेला होता तसेच आज नोकिया 9 गूगल कंसोल वर दिसला आहे.

नोकिया 9 चे नवीन स्पेसिफिकेशन

सर्वात खास बाब अशी कि गूगल कंसोल वर फोनच्या नावासह काही स्पेसिफिकेशन पण उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही अंदाज शकता कि लवकरच कंपनी हा सादर करणार आहे. गूगल कंसोल वर लिस्ट करण्यात आलेला नोकिया 9 फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालत आहे. सोबत फोन मध्ये 6जीबी रॅम असेल. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती ज्यात नोकिया 9 चा एक 4जीबी रॅम वेरियंट पण दिसला होता. त्यामुळे अशा करू शकतो कि कंपनी हा दोन वेरियंट मध्ये लॉन्च करणार आहे. पण इथे मेमरीची माहिती नाही, आतापर्यंत जे लीक आलेआहेत त्यानुसार या फोन मध्ये 128जीबी मेमरी मिळू शकते.

नोकिया 9 चा प्रोसेसर

गूगल कंसोल वर लिस्ट केला गेलेला नोकिया 9 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 2.4गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर चिपसेट आहे जो क्रयो आर्किटेक्चर वर चालतो. सोबत चांगल्या ग्राफिक्स साठी एड्रीनो 630 जीपीयू देण्यात आला आहे. जरी क्वालकॉमचा हा चिपसेट खूप ताकदवान असला तरी जर कंपनीने हा आता आपल्या फ्लॅगशिप फोन मध्ये वापरला तर हा थोडा जुना ठरेल. कारण क्वालकॉमने आपला नवीन स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सादर केला आहे आणि यावर्षी शाओमी आणि वनप्लस सहित इतर फोन मध्ये हा येणार आहे.

नोकिया 9 चा डिस्प्ले

गूगल कंसोल वर नोकिया 9 ची डिस्प्ले साइज देण्यात आलेली नाही पण रेजल्यूशनची माहिती आहे. हा फोन 1440 X 2880 पिक्सल रेजल्यूशन सह लिस्ट केला गेला आहे. हे क्वॉडएचडी प्लस रेजल्यूशन आहे जे खूप चांगले म्हणता येईल. तसेच फोनची एक छोटीशी इमेज पण लिस्ट केली गेली आहे ज्यात 19:9 आसपेक्ट रेशियो असेलेला फुल व्यू डिस्प्ले दिसतो. तसेच फ्रंट मध्ये स्क्रीन वर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पण लीक मधून मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 5.99—इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते.

4जीबी रॅम आणि 6.1-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एलजी क्यू9 वन, पडल्यावर पण तुटणार नाही हा मिलिट्री ग्रेड फोन

इतर स्पेसिफिकेशन
वर सांगतिल्याप्रमाणे नोकिया 9 बद्दल आतापर्यंत बरीच माहिती आली आहे. त्यानुसार या फोन मध्ये 5 कॅमेरे असू शकतात. फोन मध्ये सर्व सेंसर्स गोल आकारात दिले जातील. तसेच कॅमेऱ्यासोबत फ्लॅश आणि इन्फ्रारेड पोर्ट असेल जो फास्ट फोटो डिटेक्शनच्या उपयोगी पडेल. कंपनी हा फोन कार्ल जेसिसच्या कॅमेरा सेंसर सह सादर करेल.

तसेच नोकिया 9 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह सादर केला जाऊ शकतो आणि कंपनीच्या इतर फोन प्रमाणे तुम्हाला यात एंडरॉयडवन इंटीग्रेशन मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here