सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये एस पेन ने बदलता येतील गाणी, वायरलेस स्पीकर प्रमाणे चालेल हा ‘स्मार्ट पेन’

सॅमसंग ने मागच्या आठवड्यात एक 22 सेकेंड चा टीजर शेयर केला होता ज्यात सांगण्यात आले होते की येत्या 9 ऑगस्ट ला कंपनी आपल्या गॅलेक्सी सीरीज चा सर्वात दमदार स्मार्टफोन नोट 9 लॉन्च करणार आहे. या टीजर मध्ये सॅमसंग ने नवीन डिवाईस च्या लॉन्च डेट चा खुलासा तर केलाच सोबत ‘एस पेन’ पण दाखविला होता. गॅलेक्सी एस9 की लॉन्च डेट संपूर्ण टेक विश्वाला समजली आहे तर आता या हाईएंड डिवाईस चा महत्वाचा भाग असलेल्या एस पेन बद्दल पण अनोखी माहिती समोर आली आहे. या बातमी मधून एस पेन मध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी असल्याची बाब समोर आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या एस पेन बद्दल आइस यूनिवर्स ने ही माहिती दिली आहे. या टेक वेबसाइट ने सांगितले आहे की सॅमसंगचा एस पेन यावेळी आधीपेक्षा वेगळा आणि खुप खास असणार आहे. कंपनी हा डिवाईस ब्लूटूथ​ कनेक्टिविटी सह सादर करू शकते. ब्लूटूथ इनेबल असल्यामुळे नवीन एस पेन स्मार्टफोन हातात न घेता अनेक कामे करू शकेल. एस पेन ने फोन मधील म्यूजिक कंट्रोल केला जाऊ शकतो तसेच हा टाइमर प्रमाणे पण वापरता येईल.

लीक मध्ये बोलले जात आहे की एस पेन वायरलेस ब्लूटूथ स्पीकर्स प्रमाणे पण वापरता येईल. तसेच या डिवाईस मध्ये स्मार्ट बँड किंवा फिटनेस बँड सारखे काही फीचर्स पण मिळतील. पण नवीन एस पेन मध्ये कोणते खास फीचर्स असतील हे अजून पूर्णपणे स्पष्ट झाले नाही पण हे बोलू शकतो की न्यू एस पेन आधीच्या एस पेन पेक्षा एडवांस असेल आणि गॅलेक्सी एस 9 सोबत हा खुप उपयोगी ठरेल.

काही लीक्स नुसार गॅलेक्सी नोट 9 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम असू शकते तसेच फोन 6.3-इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलले जात आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

गॅलेक्सी नोट 9 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी तसेच 6जीबी रॅम आॅप्शन उपलब्ध होतील. तसेच फोन मध्ये 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी नोट 9 मध्ये 3,850एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. असे बोलले जात आहे की सॅमसंग 9 ऑगस्ट ला गॅलेक्सी नोट 9 सोबत गॅलेक्सी टॅब एस4 आणि सॅमसंग गियर एस4 पण आॅफिशियल करू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here