Samsung Galaxy S23 FE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Oct 2023 15:49:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/#respond Wed, 04 Oct 2023 15:49:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22638 सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Samsung Galaxy S23 FE ची किंमत गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला […]

The post Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy S23 FE ची किंमत

गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 59,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 64,999 रुपये आहे. हा फोन 7 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल आणि Mint, Graphite आणि Purple कलरमध्ये उपलब्ध होईल.

Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई मध्ये 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स स्क्रीन आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसर: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड वर चालतो.
  • मेमरी: Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 8जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 1टीबीचं मेमरी कार्ड वापरता येईल.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस23 फॅन एडिशन मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये फास्ट वायरलेस चार्जिंग पण देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 FE फीचर्स

  • हा स्मार्टफोन अ‍ॅल्युमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.
  • गॅलेक्सी एस23 एफईला IP68 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ बनतो.
  • Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 14 5G Bands ना सपोर्ट करतो.
  • ह्या फोनमध्ये Eye Care Display चा वापर केला गेला आहे जो बराच काळ वापरल्यावर देखील डोळ्यांना सुरक्षित ठेवतो.
  • ह्यात NFC, Wi-Fi 6E, Bluetooth v5.3 आणि USB Type-C सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
  • सिक्योरिटीसाठी मोबाइलमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault देण्यात आला आहे.

The post Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/feed/ 0
Samsung Galaxy S23 FE फोन गीकबेंचवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन आले समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-geekbench-listing/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-geekbench-listing/#respond Fri, 07 Jul 2023 09:20:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22283 सॅमसंग आपल्या प्रीमियम गॅलेक्सी S23 सीरीजचा फॅन एडिशन मॉडेल Samsung Galaxy S23 FE सादर करण्याची तयारी करत आहे. दरम्यान हा मोबाइल बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला आहे. ह्यात फोनच्या काही खास स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. तसेच याआधीही स्मार्टफोनची बरीचशी माहिती लीक झाली आहे. चला जाणून घेऊया लेटेस्ट लिस्टिंग आणि स्पेक्सची माहिती. Samsung Galaxy S23 FE गीकबेंच […]

The post Samsung Galaxy S23 FE फोन गीकबेंचवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन Exynos 2200 चिपसेटसह समोर आला आहे.
  • हा डिवाइस 8GB रॅमसह येऊ शकतो.
  • 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.

सॅमसंग आपल्या प्रीमियम गॅलेक्सी S23 सीरीजचा फॅन एडिशन मॉडेल Samsung Galaxy S23 FE सादर करण्याची तयारी करत आहे. दरम्यान हा मोबाइल बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला आहे. ह्यात फोनच्या काही खास स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. तसेच याआधीही स्मार्टफोनची बरीचशी माहिती लीक झाली आहे. चला जाणून घेऊया लेटेस्ट लिस्टिंग आणि स्पेक्सची माहिती.

Samsung Galaxy S23 FE गीकबेंच लिस्टिंग

  • सॅमसंगचा मोबाइल गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर SM-S711B मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगमधून समजलं आहे की हा डिवाइस 8GB रॅम आणि s5e9925 नावाच्या मदरबोर्डसह लिस्ट झाला आहे.
  • असा अंदाज लावला होता की हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच होईल. परंतु हा डिवाइस Exynos 2200 चिपसेटसह समोर आला आहे.
  • Exynos 2200 चिपसेट सध्याच्या इंडस्ट्री स्टँडर्डनुसार खूप जुना वाटतो.

Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : Samsung Galaxy S23 FE डिवाइसमध्ये 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल, असं समजलं आहे. डिस्प्लेवर पंच-होल कटआउट डिजाइन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : आतापर्यंत अंदाज लावला जातो होता की हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल, गीकबेंच लिस्टिंग मात्र वेगळंच काही तरी दाखवत आहे. लिस्टिंग नुसार हा Exynos 2200 चिपसेटसह येईल.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइस 8GB रॅमसह लिस्टिंगमध्ये समोर आला आहे. इंटरनल स्टोरेज पाहता डिवाइस 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेजसह येऊ शकतो.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 4500mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच होऊ शकतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता ह्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात बॅक पॅनलवर 8MP ची टेलीफोटो लेन्स, 12MP ची अल्ट्रा वाइड-अँगल लेन्स आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • ओएस : हा मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.

The post Samsung Galaxy S23 FE फोन गीकबेंचवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-geekbench-listing/feed/ 0
Samsung Galaxy S23 FE सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट, मिळाली बॅटरी संबंधित माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-phone-launch-leak-battery-and-camera-details-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-phone-launch-leak-battery-and-camera-details-revealed/#respond Tue, 13 Jun 2023 06:34:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21556 टेक कंपनी Samsung आपल्या Galaxy S23 सीरीजचा विस्तार करणार आहे. सॅमसंगचा Samsung Galaxy S23 FE फोन काही महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ताज्या अपडेटमध्ये डिवाइसचा मॉडेल नंबर आणि बॅटरी सर्टिफिकेशनची माहिती समोर आली आहे. जी तुम्ही पोस्टमध्ये वाचू शकता. Samsung Galaxy S23 FE लीक रिपोर्ट सॅमसंग गॅलेक्सी S23 FE ची माहिती सेफ्टीकोरिया सर्टिफिकेशनवर समोर आली […]

The post Samsung Galaxy S23 FE सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट, मिळाली बॅटरी संबंधित माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिवाइसची एंट्री यावर्षीच्या अखेरीस होऊ शकते.
  • फोनमध्ये 4,500mAh बॅटरी मिळू शकते.
  • Exynos 2200 चिपसेट दिला जाऊ शकतो.

टेक कंपनी Samsung आपल्या Galaxy S23 सीरीजचा विस्तार करणार आहे. सॅमसंगचा Samsung Galaxy S23 FE फोन काही महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ताज्या अपडेटमध्ये डिवाइसचा मॉडेल नंबर आणि बॅटरी सर्टिफिकेशनची माहिती समोर आली आहे. जी तुम्ही पोस्टमध्ये वाचू शकता.

Samsung Galaxy S23 FE लीक रिपोर्ट

सॅमसंग गॅलेक्सी S23 FE ची माहिती सेफ्टीकोरिया सर्टिफिकेशनवर समोर आली आहे. डिवाइस बाबत GalaxyClub नं खुलासा केला आहे. डिवाइसच्या बॅटरीचा मॉडेल नंबर EB-BS711ABY सांगण्यात आला आहे. तर फोनचा मॉडेल नंबर SM-S711 आहे. परंतु सर्टिफिकेशनमध्ये बॅटरी किती mAh ची असेल ह्याची माहिती मात्र नाही. इतर लीकनुसार यात 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते.

Samsung Galaxy S23 FE ची लीक माहिती

  • सॅमसंगच्या नवीन Samsung Galaxy S23 FE डिवाइस बाबत WinFuture च्या एका रिपोर्टमध्ये देखील माहिती समोर आली आहे. ह्या रिपोर्टमध्ये डिवाइसच्या प्रोटोटाइप बाबत सांगण्यात आलं आहे.
  • फोन SM-711B मॉडेल नंबरसह दिसला आहे. बोलले जात आहे की हा युरोपियन व्हेरिएंट असू शकतो.
  • रिपोर्टमध्ये फोनच्या कॅमेरा फीचर्स बाबत माहिती मिळाली आहे. ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • Samsung Galaxy S23 FE फोनचा प्रोसेसर पाहता लीकमध्ये समोर आलं आहे की हा Exynos 2200 चिपसेट असू शकतो.
  • रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की डेटाबेसवर समोर आल्यानंतर कंपनी 3 महिन्यात फोन सेलसाठी उपलब्ध करू शकते.
  • डिवाइसची एंट्री यावर्षीच्या अखेरपर्यंत होऊ शकते. आता पाहावं लागेल की कंपनी पुढे कोणती घोषणा करत आहे.

Samsung Galaxy S23 FE हा कंपनीच्या फॅन एडिशन सीरिजचा मॉडेल आहे. ग्राहकांना कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देण्यासाठी सॅमसंगनं ही सीरिज सुरु केली आहे. ह्या सीरिजमध्ये फ्लॅगशिप एस सीरिजचे फिचर दिले जातात परंतु किंमत कमी ठेवली जाते. गेल्यावर्षी ह्या सीरिजचा मॉडेल आला नव्हता परंतु यंदा Samsung Galaxy S23 सीरिजला थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीनं फॅन एडिशन सादर करत आहे असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

The post Samsung Galaxy S23 FE सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट, मिळाली बॅटरी संबंधित माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-phone-launch-leak-battery-and-camera-details-revealed/feed/ 0
Oneplus ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज; येत आहे नवीन Galaxy S23 FE 5G स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-launch-in-q3-2023-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-launch-in-q3-2023-specifications-leaked/#respond Thu, 25 May 2023 07:41:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21177 Samsung Galaxy S series च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा प्रीमियम फिल मिड-बजेटमध्ये देण्यासाठी कंपनीनं ‘फॅन एडिशन’ सादर केले होते. भारतात Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE लाँच झाले होते जे लोकांना आवडले. आता बातमी आली आहे की सॅमसंग Galaxy S23 FE आणण्याची तयारी करत आहे. हा फोन OnePlus 11 आणि OnePlus 11R सारख्या फोन्सना टक्कर देऊ […]

The post Oneplus ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज; येत आहे नवीन Galaxy S23 FE 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन तिसऱ्या तिमाहीत लाँच होऊ शकतो.
  • ह्यात Samsung Exynos 2200 मिळू शकतो.
  • हा Galaxy S23 सीरीजचा चौथा फोन असेल.

Samsung Galaxy S series च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा प्रीमियम फिल मिड-बजेटमध्ये देण्यासाठी कंपनीनं ‘फॅन एडिशन’ सादर केले होते. भारतात Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE लाँच झाले होते जे लोकांना आवडले. आता बातमी आली आहे की सॅमसंग Galaxy S23 FE आणण्याची तयारी करत आहे. हा फोन OnePlus 11 आणि OnePlus 11R सारख्या फोन्सना टक्कर देऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए23 एफई लाँच

सॅमसंग गॅलेक्सी ए23 फॅन एडिशनसंबंधित नवीन रिपोर्ट समोर आला आहे ज्यात दावा केला जात आहे की कंपनी हा मोबाइल फोन मार्केटमध्ये लवकरच सादर करू पाहत आहे. आधी हा फोन चौथ्या तिमाहीत म्हणजे अक्टूबर-नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान येणार होता. तर आता सॅमसंग तिसऱ्या तिमाहीत हा फोन बाजारात सादर करण्याची योजना बनवत आहे. म्हणजे Samsung Galaxy S23 FE जूननंतर लाँच केला जाऊ शकतो.

फोन लाँच करने की जल्दी

रिपोर्टनुसार सॅमसंग कंपनी आपला हा फोन लाँच करण्यास उशीर करू इच्छित नाही तसेच लवकरच हा बाजारात आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार कंपनीनं लाँच केलेल्या लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीज ‘गॅलेक्सी एस23’ ला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे कंपनी हे पाऊल उचलत आहे. बातमीनुसार Galaxy S23 series चा सेल खूप मंद आहे आणि त्यामुळे कंपनी Galaxy S23 FE नं सेल बूस्ट करू इच्छित आहे.

Samsung Galaxy S23 FE स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 120Hz AMOLED display
  • Samsung Exynos 2200
  • 50MP Rear Camera
  • 25W 4,500mAh battery

सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई संबंधित लीक्सनुसार हा मोबाइल फोन कंपनीच्या एक्सीनॉस 2200 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. ह्यात 6जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज मिळू शकते.

लीकनुसार Samsung Galaxy S23 FE मध्ये अ‍ॅमोलेड पॅनलवर पंच होल डिस्प्ले दिली जाईल जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. लीकनुसार गॅलेक्सी एस23 एफई 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येईल.

The post Oneplus ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज; येत आहे नवीन Galaxy S23 FE 5G स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-launch-in-q3-2023-specifications-leaked/feed/ 0