Samsung Galaxy S23 FE सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट, मिळाली बॅटरी संबंधित माहिती

Highlights

  • डिवाइसची एंट्री यावर्षीच्या अखेरीस होऊ शकते.
  • फोनमध्ये 4,500mAh बॅटरी मिळू शकते.
  • Exynos 2200 चिपसेट दिला जाऊ शकतो.

टेक कंपनी Samsung आपल्या Galaxy S23 सीरीजचा विस्तार करणार आहे. सॅमसंगचा Samsung Galaxy S23 FE फोन काही महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ताज्या अपडेटमध्ये डिवाइसचा मॉडेल नंबर आणि बॅटरी सर्टिफिकेशनची माहिती समोर आली आहे. जी तुम्ही पोस्टमध्ये वाचू शकता.

Samsung Galaxy S23 FE लीक रिपोर्ट

सॅमसंग गॅलेक्सी S23 FE ची माहिती सेफ्टीकोरिया सर्टिफिकेशनवर समोर आली आहे. डिवाइस बाबत GalaxyClub नं खुलासा केला आहे. डिवाइसच्या बॅटरीचा मॉडेल नंबर EB-BS711ABY सांगण्यात आला आहे. तर फोनचा मॉडेल नंबर SM-S711 आहे. परंतु सर्टिफिकेशनमध्ये बॅटरी किती mAh ची असेल ह्याची माहिती मात्र नाही. इतर लीकनुसार यात 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते.

Samsung Galaxy S23 FE ची लीक माहिती

  • सॅमसंगच्या नवीन Samsung Galaxy S23 FE डिवाइस बाबत WinFuture च्या एका रिपोर्टमध्ये देखील माहिती समोर आली आहे. ह्या रिपोर्टमध्ये डिवाइसच्या प्रोटोटाइप बाबत सांगण्यात आलं आहे.
  • फोन SM-711B मॉडेल नंबरसह दिसला आहे. बोलले जात आहे की हा युरोपियन व्हेरिएंट असू शकतो.
  • रिपोर्टमध्ये फोनच्या कॅमेरा फीचर्स बाबत माहिती मिळाली आहे. ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • Samsung Galaxy S23 FE फोनचा प्रोसेसर पाहता लीकमध्ये समोर आलं आहे की हा Exynos 2200 चिपसेट असू शकतो.
  • रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की डेटाबेसवर समोर आल्यानंतर कंपनी 3 महिन्यात फोन सेलसाठी उपलब्ध करू शकते.
  • डिवाइसची एंट्री यावर्षीच्या अखेरपर्यंत होऊ शकते. आता पाहावं लागेल की कंपनी पुढे कोणती घोषणा करत आहे.

Samsung Galaxy S23 FE हा कंपनीच्या फॅन एडिशन सीरिजचा मॉडेल आहे. ग्राहकांना कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देण्यासाठी सॅमसंगनं ही सीरिज सुरु केली आहे. ह्या सीरिजमध्ये फ्लॅगशिप एस सीरिजचे फिचर दिले जातात परंतु किंमत कमी ठेवली जाते. गेल्यावर्षी ह्या सीरिजचा मॉडेल आला नव्हता परंतु यंदा Samsung Galaxy S23 सीरिजला थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीनं फॅन एडिशन सादर करत आहे असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here