सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Samsung Galaxy S23 FE ची किंमत
गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 59,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 64,999 रुपये आहे. हा फोन 7 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल आणि Mint, Graphite आणि Purple कलरमध्ये उपलब्ध होईल.
Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स
- स्क्रीन : सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई मध्ये 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही डायनॅमिक अॅमोलेड 2एक्स स्क्रीन आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
- प्रोसेसर: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड वर चालतो.
- मेमरी: Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 8जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 1टीबीचं मेमरी कार्ड वापरता येईल.
- बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
- फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस23 फॅन एडिशन मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये फास्ट वायरलेस चार्जिंग पण देण्यात आली आहे.
Samsung Galaxy S23 FE फीचर्स
- हा स्मार्टफोन अॅल्युमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.
- गॅलेक्सी एस23 एफईला IP68 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ बनतो.
- Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 14 5G Bands ना सपोर्ट करतो.
- ह्या फोनमध्ये Eye Care Display चा वापर केला गेला आहे जो बराच काळ वापरल्यावर देखील डोळ्यांना सुरक्षित ठेवतो.
- ह्यात NFC, Wi-Fi 6E, Bluetooth v5.3 आणि USB Type-C सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
- सिक्योरिटीसाठी मोबाइलमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault देण्यात आला आहे.














