Samsung Galaxy S8 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 11 May 2018 13:04:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 21 मे ला लॉन्च होत आहे सॅमसंग चा हा दमदार फोन, शानदार प्रोसेसर सह असेल वाटर प्रूफ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-lite-to-launch-soon-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-lite-to-launch-soon-specifications-and-features-in-marathi/#respond Fri, 11 May 2018 13:04:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=420 आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर आधारित असेल.

The post 21 मे ला लॉन्च होत आहे सॅमसंग चा हा दमदार फोन, शानदार प्रोसेसर सह असेल वाटर प्रूफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की सॅमसंग गॅलेक्सी एस8 चा नवीन वेरिएंट येणार आहे आणि हा फोन 21 मे ला लॉन्च होईल. पण याबद्दल कंपनी ने अजूनपर्यंत अधिकृतपणे कोणतेच विधान केले नाही पण बातमीनुसार हा गॅलेक्सी एस 8 लाइट नावाने लॉन्च करण्यात येईल आणि हा स्पेसिफिकेशन च्या बाबतीत थोडा हलका असेल. आज पुन्हा एकदा सॅमसंग चा हा फोन सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.

91मोबाईल्स ला सॅमसंग गॅलेक्सी ए8 लाइट चीनी सर्टिफिकेशन साइट डब्लू 3सी वर दिसला. हा फोन एसएम—जी8750 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच फोन मधील 4जी एलटीई ची पण माहिती देण्यात आली आहे. पण आम्हाला तिथे फोन बद्दल जास्त डिटेल्स नाही मिळाले परंतु एवढे स्पष्ट झाले आहे की सॅमसंग लवकरच हा मॉडेल लॉन्च करणार आहे.

काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर आला होता आणि तिथे फोन चे काही स्पेसिफिकशन होते. ज्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट मध्ये 6.2-इंचाचा फुलएचडी+ इ​नफिनिटी डिसप्ले वापरला जाऊ शकतो. फोन मध्ये 2220 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ची ओएलईडी स्क्रीन मिळेल.
आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर आधारित असेल. त्याचबरोबर फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 840 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट 4जीबी रॅम मेमरी सह येऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट ने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा वाईड एंगल कॅमेरा लेंस मिळेल. विशेष म्हणजे सॅमसंग चा हा फोन वाटर आणि डस्ट प्रूफ असेल. फोन आईपी68 रेटिंग सह येऊ शकतो. फोन मध्ये इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह एनएफसी पण मिळू शकते. तसेच पावर साठी कंपनी यात 3,000एमएएच ची बॅटरी देऊ शकते.

The post 21 मे ला लॉन्च होत आहे सॅमसंग चा हा दमदार फोन, शानदार प्रोसेसर सह असेल वाटर प्रूफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-lite-to-launch-soon-specifications-and-features-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट आला समोर, 21 मे ला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-real-image-leak-might-launch-on-21-may-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-real-image-leak-might-launch-on-21-may-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 10 May 2018 14:30:41 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=405 माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आले आहेत.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट आला समोर, 21 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या गॅलेक्सी सीरीज च्या हिट स्मार्टफोन गॅलेक्सी एस8 च्या नवीन वर्जन वर काम करत आहे. चीनी ​सर्टिफिकेशन्स साइट टेना वर हा फोन लिस्ट झाल्यानंतर ही चर्चा जोर धरू लागली होती कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एस8 चा लाइट वर्जन टेक जगासमोर सादर करेल. आज पुन्हा एकदा सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट बद्दल नवीन लीक समोर आला आहे. या लीक मध्ये फोन चा आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आला आहे तसेच फोन च्या लॉन्च डेट चा खुलासा ​पण करण्यात आला आहे.

माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आले आहेत. या फोटो मध्ये फोन बर्गन्डी रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे. इथे फोन चे 4 फोटो शेयर करण्यात आले आहेत पण सर्व फोटो मध्ये गॅलेक्सी एस8 लाइट चा बॅक पॅनलच दाखविण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश लाईट सह येईल. रियर कॅमेरा सेटअपच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे किनारे कर्व्ड ​आहेत तसेच यात एंटिना बँड देण्यात आला आहे. फोन च्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत तसेच उजव्या पॅनल वर पण एक बटन आहे, जी कदाचित बिक्सबी ची शार्टकट की असू शकते. फोन च्या स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर लीक नुसार हा फोन 5.8-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी डिसप्ले वर सादर करण्यात येईल जो 2220 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512 जीपीयू दिला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट 4जीबी रॅम मेमरी सह येऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट ने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल ची वाईड एंगल कॅमेरा लेंस मिळेल. लीक नुसार हा फोन आईपी68 रेटिड असेल ज्यामुळे हा पाणी आणि धुळी पासून सु​रक्षित राहील. 4जी वोएलटीई, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट बद्दल बोलले जात आहे की सॅमंसग कंपनी आपल्या हा स्वस्त स्मार्टफोन येणार्‍या 21 मे ला अंर्तराष्ट्रीय मंचावर वर सादर करेल. अंदाज लावला जात आहे की हा फोन भारतीय करंसी नुसार जवळपास 23,000 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च केला जाऊ शकतो. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च संबंधी माहितीसाठी सॅमसंग च्या आॅफिशियल अनाउंसमेंट ची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट आला समोर, 21 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-real-image-leak-might-launch-on-21-may-feature-specifications-in-marathi/feed/ 0