काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की सॅमसंग गॅलेक्सी एस8 चा नवीन वेरिएंट येणार आहे आणि हा फोन 21 मे ला लॉन्च होईल. पण याबद्दल कंपनी ने अजूनपर्यंत अधिकृतपणे कोणतेच विधान केले नाही पण बातमीनुसार हा गॅलेक्सी एस 8 लाइट नावाने लॉन्च करण्यात येईल आणि हा स्पेसिफिकेशन च्या बाबतीत थोडा हलका असेल. आज पुन्हा एकदा सॅमसंग चा हा फोन सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.
91मोबाईल्स ला सॅमसंग गॅलेक्सी ए8 लाइट चीनी सर्टिफिकेशन साइट डब्लू 3सी वर दिसला. हा फोन एसएम—जी8750 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच फोन मधील 4जी एलटीई ची पण माहिती देण्यात आली आहे. पण आम्हाला तिथे फोन बद्दल जास्त डिटेल्स नाही मिळाले परंतु एवढे स्पष्ट झाले आहे की सॅमसंग लवकरच हा मॉडेल लॉन्च करणार आहे.
काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर आला होता आणि तिथे फोन चे काही स्पेसिफिकशन होते. ज्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट मध्ये 6.2-इंचाचा फुलएचडी+ इनफिनिटी डिसप्ले वापरला जाऊ शकतो. फोन मध्ये 2220 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ची ओएलईडी स्क्रीन मिळेल.
आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर आधारित असेल. त्याचबरोबर फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 840 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट 4जीबी रॅम मेमरी सह येऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट ने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा वाईड एंगल कॅमेरा लेंस मिळेल. विशेष म्हणजे सॅमसंग चा हा फोन वाटर आणि डस्ट प्रूफ असेल. फोन आईपी68 रेटिंग सह येऊ शकतो. फोन मध्ये इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह एनएफसी पण मिळू शकते. तसेच पावर साठी कंपनी यात 3,000एमएएच ची बॅटरी देऊ शकते.














