सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट आला समोर, 21 मे ला होईल लॉन्च

टेक कंपनी सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या गॅलेक्सी सीरीज च्या हिट स्मार्टफोन गॅलेक्सी एस8 च्या नवीन वर्जन वर काम करत आहे. चीनी ​सर्टिफिकेशन्स साइट टेना वर हा फोन लिस्ट झाल्यानंतर ही चर्चा जोर धरू लागली होती कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एस8 चा लाइट वर्जन टेक जगासमोर सादर करेल. आज पुन्हा एकदा सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट बद्दल नवीन लीक समोर आला आहे. या लीक मध्ये फोन चा आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आला आहे तसेच फोन च्या लॉन्च डेट चा खुलासा ​पण करण्यात आला आहे.

माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आले आहेत. या फोटो मध्ये फोन बर्गन्डी रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे. इथे फोन चे 4 फोटो शेयर करण्यात आले आहेत पण सर्व फोटो मध्ये गॅलेक्सी एस8 लाइट चा बॅक पॅनलच दाखविण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश लाईट सह येईल. रियर कॅमेरा सेटअपच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे किनारे कर्व्ड ​आहेत तसेच यात एंटिना बँड देण्यात आला आहे. फोन च्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत तसेच उजव्या पॅनल वर पण एक बटन आहे, जी कदाचित बिक्सबी ची शार्टकट की असू शकते. फोन च्या स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर लीक नुसार हा फोन 5.8-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी डिसप्ले वर सादर करण्यात येईल जो 2220 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512 जीपीयू दिला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट 4जीबी रॅम मेमरी सह येऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट ने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल ची वाईड एंगल कॅमेरा लेंस मिळेल. लीक नुसार हा फोन आईपी68 रेटिड असेल ज्यामुळे हा पाणी आणि धुळी पासून सु​रक्षित राहील. 4जी वोएलटीई, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट बद्दल बोलले जात आहे की सॅमंसग कंपनी आपल्या हा स्वस्त स्मार्टफोन येणार्‍या 21 मे ला अंर्तराष्ट्रीय मंचावर वर सादर करेल. अंदाज लावला जात आहे की हा फोन भारतीय करंसी नुसार जवळपास 23,000 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च केला जाऊ शकतो. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च संबंधी माहितीसाठी सॅमसंग च्या आॅफिशियल अनाउंसमेंट ची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here