Samsung Galaxy S8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Jul 2019 11:22:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S8 ने केली कमाल, 20 लोकांचे वाचवले प्राण https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-save-20-people-lives/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-save-20-people-lives/#respond Thu, 25 Jul 2019 11:22:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4897 बिकट प्रसंगी फक्त त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी S8 स्मार्टफोन चालत होता, ज्याच्या मदतीने त्यांनी बचाव दलाशी संपर्क करू शकले आणि ते वाचले.

The post Samsung Galaxy S8 ने केली कमाल, 20 लोकांचे वाचवले प्राण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S8 कंपनीने दोन वर्षांपूर्वी लॉन्च केला होता. पण काही दिवसांपूर्वी हा फोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. झाले असे, सॅमसंग Galaxy S8 मुळे 20 लोकांचा जीव वाचवता आला. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी फिलीपींस मधील सेबू येतील मलापसकुआ बेटाजवळ एक जहाज उलटेल होते, पण वॉटर रेसिस्टेंट सॅमसंग एस8 मुळे जहाजातील लोकांचा जीव वाचला.

जहाज पालटल्यानंतर त्यातील सर्वांचे फोन्स बंद पडले होते, पण जिम एम्डी नावाच्या व्यक्तीचा पाण्यात बुडालेला सॅमसंग एस8 फोन चालू होता, ज्यावरून एम्डी कॉल करू शकले. विशेष म्हणजे या फोन मध्ये एसओएस नावाचा फीचर नाही, पण IP68 वॉटर रेसिस्टेंट असल्यामुळे पाण्यात बुडाल्यानंतर पण फोन चालू राहिला.

हि घटना दोन आठवड्यांपूर्वीची आहे, जेव्हा एका जहाज 16 विदेशी आणि चार फिलीपीन्स नागरिकांना एका बेटावर घेऊन जात होते. जहाज पालटल्यानंतर या फोन वरून मदत मागवण्यात आली आणि जीपीएस च्या माध्यमातून लोकेशन शेयर करण्यात आले होते.

एम्डी नावाच्या व्यक्तीने एका रिपोर्ट मध्ये सांगितले कि त्या बिकट प्रसंगी फक्त त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी S8 स्मार्टफोन चालत होता, ज्याच्या मदतीने त्यांनी बचाव दलाशी संपर्क करू शकले आणि ते वाचले.

Samsung 7 ऑगस्टला नोट सीरीजचा आगामी हँडसेट Galaxy Note 10 सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीने या फ्लॅगशिप नोट लॉन्च साठी Unpacked इवेंटचे आयोजन केले आहे. Samsung चा ग्लोबल इवेंट न्यू यॉर्क मध्ये 7 ऑगस्टला होईल. भारतीय यूजर्स याची लाइव स्ट्रीमिंग 8 ऑगस्टला दुपारी 1.30 वाजता बघू शकतील.

तसेच ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन आणि फ्लिपकार्टने Galaxy Note 10 च्या लॉन्चचे एक डेडिकेटेड पेज बनवले आहे. याचा अर्थ असा कि ग्लोबल लॉन्च नंतर लगेचच हा भारतात पण सादर केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy Note मध्ये S Pen दिल जाईल ज्यामुळे प्रोडक्टिविटी संबंधित टास्क परफॉर्म करता येतील. तसेच Galaxy Note 10 स्मार्टफोन प्रीमियम स्पेसिफिकेशंस सह येईल. सध्या या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेक दिवसांपासून फोन संबंधित अनेक लीक समोर आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 वीडियो

The post Samsung Galaxy S8 ने केली कमाल, 20 लोकांचे वाचवले प्राण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-save-20-people-lives/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एस8+ ची किंमत झाली 12,000 रुपयांनी कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-plus-price-drop-by-rs-12000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-plus-price-drop-by-rs-12000-in-marathi/#respond Wed, 29 Aug 2018 10:48:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1856 आॅनलाईन प्लॅटफार्म वर हा फोन अमेजॉन इंडिया व सॅमसंग शॉप वर सेल साठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी एस8+ पेटीएम वरून पण विकत घेता येईल.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस8+ ची किंमत झाली 12,000 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी भारतीय टेक बाजारात आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस गॅलेक्सी नोट 9 लॉन्च केला होता. देशातील सॅमसंग फॅन्स या फोनच्या लॉन्च ची वाट बघत होते. पण आज आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने कंपनी च्या दुसर्‍या एका फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस8+ ची किंमत कमी केली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी एस8+ ची किंमत 12,000 रुपयांनी कमी केली आहे. हा फोन आॅनलाईन व आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर आपल्या नवीन किंमत सह सेल साठी उपलब्ध झाला आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी एस8+ गेल्या वर्षी भारतात लॉन्च केला होता. हा फोन 64,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता काही महिन्यांनी सॅमसंग इंडिया ने फोन ची किंमत 58,990 रुपये केली होती. सॅमसंग गॅलेक्सी एस8+ वर झालेल्या दुसर्‍या प्राइस कट नंतर हा फोन 51,990 रुपयांमध्ये मिळत होता. आता पुन्हा एकदा या फोनची किंमत कमी करून सॅमसंग ने आपल्या फॅन्सना भेट दिली आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी एस8+ च्या किंमतीत 12,000 रूपयांची मोठी कपात केली आहे. कमी झालेल्या किंमती मुळे सॅमसंग गॅलेक्सी एस8+ आता फक्त 39,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे. गॅलेक्सी एस8+ आॅनलाईन प्लॅटफार्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. आॅनलाईन प्लॅटफार्म वर हा फोन अमेजॉन इंडिया व सॅमसंग शॉप वर सेल साठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी एस8+ पेटीएम वरून पण विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8+ चे फीचर्स व फुल स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा)

The post सॅमसंग गॅलेक्सी एस8+ ची किंमत झाली 12,000 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-plus-price-drop-by-rs-12000-in-marathi/feed/ 0
चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 13:43:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=862 फायर विभाग ने या आगीचे कारण स्मार्टफोनच आहे असे सांगितले आहे.

The post चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती ज्यात गॅलेक्सी नोट 2 ला आग लागल्याची बाब समोर आली होती. ही घटना मुंबईत घडली होती, त्या नंतर स्मार्टफोन यूजर्स खुप घाबरले आहेत. या बातमीला अजून एक आठवडा पण झाला नाही की पुन्हा एकदा सॅमसंग स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची बातमी येत आहे. यावेळी प्रसंग इतका गंभीर होता ज्यात स्मार्टफोन च्या आगीने कार ला पण आग लागली.

सॅमसंग स्मार्टफोन मध्ये आग लागण्याची ही घटना अमेरिकेतील आहे. अमेरिकन मीडिया नुसार एक महिलेच्या सॅमसंग स्मार्टफोन मध्ये तेव्हा आग लागली जेव्हा ती कार चालवत होती. आगीच्या ज्वाला बघून महिला समझदारी दाखवत कार मधून उतरली पण फोन मध्ये लागलेली आग इतकी भयानक होती की तिने थोड्या वेळेत संपूर्ण कार ताब्यात घेतली आणि जाळून राख केली.

मीडिया रिपोर्ट नुसार महिले कडे सॅमसंग चे 2 स्मार्टफोन होते. यात गॅलेक्सी एस8 आणि गॅलेक्सी एस4 यांचा समावेश होता. जेव्हा महिला कार चालवत होती त्यावेळी हे दोन्ही स्मार्टफोन महिलेच्या कार मध्ये होते. दोन्ही फोन मध्ये अचानक आग लागली. महिले नुसार ती लवकरच कार थांबवून बाहेर पडली होती पण थोड्याच वेळात आग पूर्णपणे गाडीत पसरली होती.

महिले चे म्हणणे आहे की जर तिची कार ट्रॅफिक मध्ये अडकलेली असती तर तिला कार मधून बाहेर निघणे जमले नसते आणि तिचा जीव वाचला नसता. या घटने वर सॅमसंग ने सांगितले की त्यांचे डिवाईस संपूर्ण प्रशिक्षणानंतर विकले जात आहेत त्यामुळे अशी घटना घडणे अशक्य वाटते. तर दुसरीकडे फायर विभाग ने या आगीचे कारण स्मार्टफोनच आहे असे सांगितले आहे.

या घटनेत महिले चा जीव वाचला पण दोन्ही स्मार्टफोन आणि कार सह पीडित महिलेचे खुप नुकसान झाले आहे. याचा तपास पोलिस करत आहेत. तर दुसरीकडे रोजची गरज असणार्‍या स्मार्टफोंस मुळे अशा प्रकारचे प्रसंग घडणे आणि लोकांचा जीव धोक्यात येणे मोबाईल कंपन्यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. तसेच एका सामन्य यूजर च्या जिवाशी होणार्‍या खेळाचे गांभीर्य इथे स्पष्ट दिसते.

The post चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट आला समोर, 21 मे ला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-real-image-leak-might-launch-on-21-may-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-real-image-leak-might-launch-on-21-may-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 10 May 2018 14:30:41 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=405 माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आले आहेत.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट आला समोर, 21 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या गॅलेक्सी सीरीज च्या हिट स्मार्टफोन गॅलेक्सी एस8 च्या नवीन वर्जन वर काम करत आहे. चीनी ​सर्टिफिकेशन्स साइट टेना वर हा फोन लिस्ट झाल्यानंतर ही चर्चा जोर धरू लागली होती कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एस8 चा लाइट वर्जन टेक जगासमोर सादर करेल. आज पुन्हा एकदा सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट बद्दल नवीन लीक समोर आला आहे. या लीक मध्ये फोन चा आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आला आहे तसेच फोन च्या लॉन्च डेट चा खुलासा ​पण करण्यात आला आहे.

माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे आॅफिशियल फोटो शेयर करण्यात आले आहेत. या फोटो मध्ये फोन बर्गन्डी रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे. इथे फोन चे 4 फोटो शेयर करण्यात आले आहेत पण सर्व फोटो मध्ये गॅलेक्सी एस8 लाइट चा बॅक पॅनलच दाखविण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश लाईट सह येईल. रियर कॅमेरा सेटअपच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट चे किनारे कर्व्ड ​आहेत तसेच यात एंटिना बँड देण्यात आला आहे. फोन च्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत तसेच उजव्या पॅनल वर पण एक बटन आहे, जी कदाचित बिक्सबी ची शार्टकट की असू शकते. फोन च्या स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर लीक नुसार हा फोन 5.8-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी डिसप्ले वर सादर करण्यात येईल जो 2220 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512 जीपीयू दिला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट 4जीबी रॅम मेमरी सह येऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट ने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल ची वाईड एंगल कॅमेरा लेंस मिळेल. लीक नुसार हा फोन आईपी68 रेटिड असेल ज्यामुळे हा पाणी आणि धुळी पासून सु​रक्षित राहील. 4जी वोएलटीई, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट बद्दल बोलले जात आहे की सॅमंसग कंपनी आपल्या हा स्वस्त स्मार्टफोन येणार्‍या 21 मे ला अंर्तराष्ट्रीय मंचावर वर सादर करेल. अंदाज लावला जात आहे की हा फोन भारतीय करंसी नुसार जवळपास 23,000 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च केला जाऊ शकतो. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च संबंधी माहितीसाठी सॅमसंग च्या आॅफिशियल अनाउंसमेंट ची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस8 लाइट आला समोर, 21 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-real-image-leak-might-launch-on-21-may-feature-specifications-in-marathi/feed/ 0