सॅमसंग गॅलेक्सी एस8+ ची किंमत झाली 12,000 रुपयांनी कमी

सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी भारतीय टेक बाजारात आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस गॅलेक्सी नोट 9 लॉन्च केला होता. देशातील सॅमसंग फॅन्स या फोनच्या लॉन्च ची वाट बघत होते. पण आज आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने कंपनी च्या दुसर्‍या एका फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस8+ ची किंमत कमी केली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी एस8+ ची किंमत 12,000 रुपयांनी कमी केली आहे. हा फोन आॅनलाईन व आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर आपल्या नवीन किंमत सह सेल साठी उपलब्ध झाला आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी एस8+ गेल्या वर्षी भारतात लॉन्च केला होता. हा फोन 64,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता काही महिन्यांनी सॅमसंग इंडिया ने फोन ची किंमत 58,990 रुपये केली होती. सॅमसंग गॅलेक्सी एस8+ वर झालेल्या दुसर्‍या प्राइस कट नंतर हा फोन 51,990 रुपयांमध्ये मिळत होता. आता पुन्हा एकदा या फोनची किंमत कमी करून सॅमसंग ने आपल्या फॅन्सना भेट दिली आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी एस8+ च्या किंमतीत 12,000 रूपयांची मोठी कपात केली आहे. कमी झालेल्या किंमती मुळे सॅमसंग गॅलेक्सी एस8+ आता फक्त 39,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे. गॅलेक्सी एस8+ आॅनलाईन प्लॅटफार्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. आॅनलाईन प्लॅटफार्म वर हा फोन अमेजॉन इंडिया व सॅमसंग शॉप वर सेल साठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी एस8+ पेटीएम वरून पण विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस8+ चे फीचर्स व फुल स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here