Samsung Galaxy Tab S5e - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Jun 2019 10:12:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,070एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल Galaxy Tab S5e https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s5e-and-tab-a-10-1-launched-in-india-price-feature-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s5e-and-tab-a-10-1-launched-in-india-price-feature-specifications/#respond Mon, 24 Jun 2019 10:12:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4636 Galaxy Tab A 10.1 कंपनीने मीड बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे तसेच Galaxy Tab S5e भारतात हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणला आहे.

The post 7,070एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल Galaxy Tab S5e first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या टॅबलेट सीरीज अंतर्गत एकापेक्षा एक चांगले डिवाईस लॉन्च केले आहेत. या डिवाईसेज मध्ये Galaxy Tab A 10.1, Galaxy Tab A 8.0 आणि Galaxy Tab S5e यांचा समावेश आहे. स्टाईलिश लुक, आर्कषक फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हे डिवाईस आता भारतीय बाजारात आले आहेत. इंडियन टॅबलेट मार्केट मध्ये एक मोठा डाव टाकत Samsung ने आपली टॅबलेट सीरीज भारतात सादर केली आहे. वेगवेगळ्या बजेट मध्ये सॅमसंगचे हे डिवाईस भारतात सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग ने आपल्या आगामी अधिकृत वेबसाइट वर Galaxy Tab A 10.1 आणि Galaxy Tab S5e लिस्ट केला आहे. लिस्टिंग मध्ये कंपनी ने टॅबलेटच्या सर्व मॉडेल्स आणि वेरिएंट्सच्या किंमतीचा खुलासा केला आहे. Galaxy Tab A 10.1 कंपनीने मीड बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे तसेच Galaxy Tab S5e भारतात हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणला आहे.

Galaxy Tab S5e
Galaxy Tab S5e सॅमसंग ने दोन मॉडेल्स मध्ये सादर केला आहे. टॅबलेट के Wi-Fi Only वेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच याचा LTE वेरिएंट कंपनी ने 39,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. Samsung Galaxy Tab S5e चे दोन्ही मॉडेल्स ब्लॅक, गोल्ड आणि सिल्वर कलर वेरिएंट मध्ये कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेता येतील.

स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy Tab S5e 16:10 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो क्वॉड एचडी रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. भारतात या टॅबलेटचे दोन मॉडेल सादर केले गेले आहेत ज्यातील एक मॉडेल फक्त वाई-फाई कनेक्टिविटी सह इंटरनेट चालवतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये सिम कार्चा वापर करून एलटीई ने इंटरनेट वापरता येईल Galaxy Tab S5e 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे जो एंडरॉयड 9 पाई आधारित वनयूआई सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 670 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy Tab S5e च्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा डिवाईस 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. टॅबलेटच्या साइड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच म्यूजिक क्वालिटी साठी यात एकेजी आणि हरमन क्वॉड स्पीकर आहे. तसेच पावर बॅकअप साठी Galaxy Tab S5e 18वॉट रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 7,070एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर

Galaxy Tab A 10.1
Galaxy Tab A 10.1 पण दोन मॉडेल्स सह भारतात लॉन्च झाला आहे. यात वाई-फाई मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर टॅबलेटचा एलटीई मॉडेल 19,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा टॅबलेट पण ब्लॅक, गोल्ड आणि सिल्वर कलर वेरिएंट मध्ये कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेता येतील.

सॅमसंगने गॅलेक्सी टॅब ए 10.1 10.1-इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी आईपीएस डिस्प्ले सह सादर केला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित वनयूआई सह हा डिवाईस सॅमसंगच्या एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो. Samsung Galaxy Tab A 10.1 2जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो तसेच डिवाईस मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Vivo घेऊन येत आहे 120W सुपर फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजी, फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज होईल तुमचा स्मार्टफोन

फोटोग्राफी साठी Galaxy Tab A 10.1 8-मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा 5-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टॅबलेट मध्ये पण साइड पॅनल वर फिंगरप्रिंट बटन देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy Tab A 10.1 6,150एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 7,070एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल Galaxy Tab S5e first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s5e-and-tab-a-10-1-launched-in-india-price-feature-specifications/feed/ 0