Vivo भारतात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन घेऊन येत आहे. कंपनी हा फोन Z series मध्ये आणेल जो भारतात Vivo Z1 Pro नावाने लॉन्च होईल. आता कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने 120 W सुपर फ्लॅशचार्ज टेक्नॉलजी आणण्याची घोषणा केली आहे.
याबद्दल कंपनीचा दावा आहे कि त्यांची 120 वॉट चार्जिंग टेक्नॉलजी 4,000एमएएच बॅटरी असलेला फोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करू शकते. तसेच वीवो ने असे सांगितले आहे कि ते मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) शांघाई 2019 मध्ये आपल्या पहिल्या 5G फोनची पण घोषणा करेल.
या स्मार्टफोन बद्दल जास्त माहिती अजूनतरी समोर आली नाही. कंपनीने हा स्मार्टफोन टीज करत म्हटले आहे कि या मध्ये 120W ची सुपर फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी मिळू शकते. म्हणजे कंपनी आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन सह शांघाई मध्ये आयोजित होणाऱ्या या इवेंट मध्ये लेटेस्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण लॉन्च करेल. वीवोच्या लेटेस्ट फास्ट चार्ज 120W सुपर फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजीची टक्कर शाओमीच्या 100W फास्ट टेक्नोलॉजीशी होईल.
यावर्षी मार्च मध्ये वीवो ने आपल्या 100 W सुपर चार्ज टर्बो टेक्नॉलजी सादर केली होती. कंपनीचा दावा आहे कि हि 4,000 एमएएच ची बॅटरी फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करेल. शाओमीच्या टेक्नॉलजीच्या तुलनेत वीवोची 120 W सुपर फ्लॅशचार्ज टेक्नॉलजी कमी वेळात त्याच साइजची बॅटरी चार्ज करेल.
विशेष म्हणजे कंपनी लवकरच vivo Z1 Pro मॉडेल भारतात सादर करण्याची योजना बनवत आहे. हा फोन एक्सक्लूसिव ऑनलाइन स्टोर वर उपलब्ध होईल. Z1 Pro अजूनतरी सेल साठी आला आहे, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फ्लिपकार्ट वर उपलब्ध होऊ शकतो. परंतु फोनचे सर्व स्पेसिफिकेशन कंपनीने आधीच दिले आहेत.
Vivo Z1 Pro मध्ये 6.53-इंचाची फुल एचडी+ एलएसडी स्क्रीन देण्यात आली आहे. भारतात कंपनीचा हा पहिला फोन असेल ज्यात तुम्हाला पंच होल डिस्प्ले मिळेल. पंच होल मध्ये फोनचा फ्रंट कॅमेरा आहे.
सोबतच Vivo Z1 Pro जगातील पहिला फोन आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर सादर केला जाईल. हा फोन 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी च्या मेमरी वेरियंट मध्ये लॉन्च होऊ शकतो. तसेच फोन मध्ये 64जीबी आणि 128जीबी मेमरी मिळेल.
कॅमेरा पाहता या फोन मध्ये 16 एमपी + 8 एमपी + 3 एमपी चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच 32 एमपी चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मध्ये 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.















