Samsung India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 13 Jan 2020 16:56:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung ने प्रसिद्ध केला ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा प्रोडक्ट पेज, भारतात येत आहेत Galaxy A51 आणि Galaxy A71 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-notify-me-page-goes-live-on-samsung-india-a51-and-a71-launching-soon-awesome-is-for-everyone/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-notify-me-page-goes-live-on-samsung-india-a51-and-a71-launching-soon-awesome-is-for-everyone/#respond Mon, 13 Jan 2020 16:56:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6283 आता गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन फोन Galaxy A51 आणि Galaxy A71 लवकरच बाजारात येणार आहेत.

The post Samsung ने प्रसिद्ध केला ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा प्रोडक्ट पेज, भारतात येत आहेत Galaxy A51 आणि Galaxy A71 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने जेव्हापासून इंटरनेशनल मार्केट मध्ये आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत Galaxy A51 आणि Galaxy A71 लॉन्च केले आहेत. तेव्हापासून या दोन्ही स्मार्टफोन्सची वाट इंडियन मोबाईल यूजर्स करत आहेत. 91मोबाईल्सने या सीरीज संबंधित अनेक एक्सक्लूसिव बातम्या दिल्या आहेत ज्यात गॅलेक्सी ए51 आणि ए71 चे वेरिएंट्स आणि त्यांच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. आता सॅमसंगने अधिकृत घोषणा केली आहे कि कंपनी भारतात Galaxy A51 आणि Galaxy A71 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Samsung ने गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्सचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर प्रसिद्ध केले आहे.

Samsung India ने कपंनीच्या माइक्रोसाइट वर ‘Galaxy A’ नावाने नवीन प्रोडक्ट पेज बनवले आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर Awesome is for everyone लिहिण्यात आले आहे. प्रोडक्ट पेज वर कंपनीने स्मार्टफोन फोटो पण शेयर केला आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये पंच-होल डिस्प्ले दिसत आहे ज्यात होल डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध आहे. या प्रोडक्ट पेज आणि फोटोने स्पष्ट केले आहे कि आता गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन फोन Galaxy A51 आणि Galaxy A71 लवकरच बाजारात येणार आहेत.

Samsung Galaxy A सीरीजच्या या प्रोडक्ट पेज वर फोनच्या फ्रंट पॅनलच्या फोटो सोबत रियर कॅमेरा प्लेटमेंट पण दाखवण्यात आली आहे जो L-शेप मध्ये आहे. वियतनाम मध्ये लॉन्च झालेले Galaxy A51 आणि Galaxy A71 अश्याच रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. प्रोडक्ट पेज बद्दल बोलायचे तर इथे फोन मध्ये Awesome Camera, Awesome Screen आणि Awesome Battery मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सॅमसंगने अधिकृतपणे गॅलेक्सी ए51 आणि ए71 स्मार्टफोनसाठी ‘Notify Me’ बटण सादर केले आहे.

91मोबाईल्सला दिल्ली/एनसीआर च्या रिटेल स्टोर्स वर Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 चा पोस्र्स मिळाले आहेत. हे दोन्ही वेगवेगळे आहेत ज्यात एकात Galaxy A51 तर दुसऱ्यात Galaxy A71 स्मार्टफोन लिहिण्यात आले आहे. या पोस्टर्स वर फक्त फोनचे नाव नाही तर फोन्सचे फोटोज पण आहेत. तसेच आम्हाला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy A51 भारतीय बाजारात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तर Galaxy A51 ची किंमत 29,990 रुपये असेल.

Samsung Galaxy A51

गॅलेक्सी ए51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5-इंच, फुल एचडी+ (1080 x2400) सुपर AMOLED इनफिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन सॅमसंगच्या Exynos 9611 चिपसेट ऑक्टा कोर (क्वाड 2.3GHz + क्वाड 1.7GHz) प्रोसेसर सह येतो. यात 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅम ऑप्शन सह 64GB व 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48MP, F2.0 सह डेप्थ मेन सेंसर, 5MP, F2.2 मेक्रो सेंसर, 5MP, F2.4 अल्ट्रा-वाइड आणि 12MP, F2.2 सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W फास्ट चार्जिंग सह येते.

Samsung Galaxy A71

Galaxy A71 पाहता यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ (1080 x2400) सुपर ऐमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा कोर (डुअल 2.2GHz + हेक्सा 1.8GHz) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज तुम्ही माइक्रोसएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64MP चा मेन डेप्थ सेंसर F1.8, 5MP मेक्रो सेंसर F2.2, 5MP अल्ट्रा वाइड F2.4 आणि 12MP, F2.2 सेंसर आहे. तसेच फ्रंट कॅमेरा फोन मध्ये 32MP चा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंग सह येते.

The post Samsung ने प्रसिद्ध केला ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा प्रोडक्ट पेज, भारतात येत आहेत Galaxy A51 आणि Galaxy A71 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-notify-me-page-goes-live-on-samsung-india-a51-and-a71-launching-soon-awesome-is-for-everyone/feed/ 0
हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/#respond Fri, 29 Nov 2019 13:26:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5919 Samsung चे अनेक असे स्मार्टफोन्स जे भारतात हिट झाले आहेत आणि जास्तीत जात यूजर्स द्वारा वापरले जातात, आता या शानदार Android 10 वर चालतील.

The post हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने या आठवड्यात इज्राइल मध्ये Android 10 चा रोडमॅप सादर केला होता. कंपनीने सांगितले होता कि सॅमसंगचा कोणता स्मार्टफोन कोणत्या महिन्यात नवीन एंडरॉयड ओएस ने अपडेट केला जाईल. तर आता सॅमसंगने भारतीय यूजर्सची प्रतीक्षा संपवत भारतात पण Android 10 चा रोडमॅप प्रसिद्ध केला आहे. Samsung ने सांगितले आहे कि इंडियन मार्केट मधील कंपनीच्या कोणत्या स्मार्टफोनला कधी Android 10 चा अपडेट मिळेल. Samsung ने आपल्या या यादीत प्रत्येक बजेट मधील स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे आणि आपल्या युजर्स लक्षात ठेऊन कंपनीचे स्वस्त स्मार्टफोन्स पण लवकरात लवकर Google च्या लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम Android 10 वर अपडेट करण्याचा दावा केला आहे.

Google ने यावर्षी आपल्या एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टमचा लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 सादर केला होता. एंडरॉयड 10 अनेक नवीन अपडेट्स सह आला आहे जो अनेक आर्कषक फीचर्स सह येतो. काही नवीन स्मार्टफोन्स एंडरॉयड 10 सोबतच लॉन्च झाले आहेत तर Samsung चे अनेक असे स्मार्टफोन्स जे भारतात हिट झाले आहेत आणि जास्तीत जात यूजर्स द्वारा वापरले जातात, आता या शानदार Android 10 वर चालतील.

Samsung कंपनी भारतात Android 10 अपडेशन दोन फेज मध्ये करेल. पहिला फेज जानेवारी 2020 ला सुरु होऊन मार्च पर्यंत चालेल. तर दुसरा फेज मार्च मध्ये सुरु होऊन सप्टेंबर पर्यंत चालू राहील. या काळात Samsung च्या लो बजेट डिवाईसेज पासून हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फ्लॅगशिप स्मार्टफोन पण Android 10 वर अपडेट होतील. Samsung ने सांगितले आहे कि कंपनी एंडरॉयड 10 सॅमसंगच्या यूजर इंटरफेस One UI 2.0 सह सादर करेल.

हे देखील वाचा: 9 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo V17, याचा लुक असेल वेगळा

हे Samsung फोन होतील Android 10 ने सुसज्ज

Samsung Galaxy M20, Samsung Galaxy M30 आणि Samsung Galaxy A30 सारखे हिट स्मार्टफोन 2020 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मधेच Android 10 वर अपडेट होतील. तर पहिल्या फेज म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान Samsung Galaxy S9, Samsung Galaxy S9+, Samsung Galaxy Note 9, Samsung Galaxy S10, Samsung Galaxy S10+, Samsung Galaxy S10e, Samsung Galaxy Note 10 आणि Samsung Galaxy Note 10+ पण एंडरॉयड 10 ने सुसज्ज होतील.

Samsung Galaxy M40 ला कंपनी मार्च महिन्यात Android 10 OS चा अपडेट देईल. तर एप्रिल मध्ये Samsung Galaxy A6, Samsung Galaxy A6+, Samsung Galaxy A7, Samsung Galaxy A9, Samsung Galaxy A50, Samsung Galaxy A50s, Samsung Galaxy A70, Samsung Galaxy A70s, Samsung Galaxy A80, Samsung Galaxy M30s, Samsung Galaxy Tab S6 आणि Samsung Galaxy Fold ला एंडरॉयड 10 चा अपडेट मिळेल.

Samsung Galaxy A8 Star, Samsung Galaxy A10, Samsung Galaxy A10s, Samsung Galaxy A20, Samsung Galaxy A30s, Samsung Galaxy M10s, Samsung Galaxy A20s, Samsung Galaxy A30s, Samsung Galaxy M10s सॅमसंग द्वारा मे महिन्यात एंडरॉयड 10 वर अपडेट केले जातील. तर जून महिन्यात एंडरॉयड 10 ने अपडेट होणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये Samsung Galaxy On6, Samsung Galaxy J6 आणि Samsung Galaxy A20s चे नाव आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये

एंडरॉयड 10 वर अपडेट होणाऱ्या सॅमसंग स्मार्टफोन्सच्या यादीत जुलै साठी Samsung Galaxy J6+, Samsung Galaxy J7 Duo, Samsung Galaxy On8, Samsung Galaxy J8, Samsung Galaxy Tab S4 आणि Galaxy Tab S5e च्या नावांचा समावेश केला गेला आहे. तर Samsung Galaxy Tab A 8 आणि Samsung Galaxy Tab S5e ला ऑगस्ट तर Samsung Galaxy Tab A 10.5 (2018) आणि Samsung Galaxy Tab A 10.1 ला सप्टेंबर महिन्यात Android 10 OS वर अपडेट केले जातील.

The post हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/feed/ 0
7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच स्क्रीन वाला सॅमसंग टॅबलेट भारतात झाला लॉन्च, बघा या डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-lte-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-lte-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 13:35:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1636 हा डिवाईस 15 ऑगस्टला फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच यूजर्स उद्या म्हणजे 9 ऑगस्ट पासून हा प्री-आॅर्डर करू शकतात.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच स्क्रीन वाला सॅमसंग टॅबलेट भारतात झाला लॉन्च, बघा या डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले दोन नवीन डिवाईस सादर केले आहेत. कंपनीने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच न्यूयार्क मध्ये लॉन्च केले होते. तसेच आज आपल्या भारतीय फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच भारतीय बाजारात आणला आहे. कंपनी ने या दमदार टॅबलेट डिवाईस ची किंमत 29,990 रुपये ठेवली आहे जो 13 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग ने भारतात गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच चा एलटीई मॉडेल लॉन्च करण्यात आला आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा शानदार टॅबलेट 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केले आहे जो 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या मोठया टीएफटी एलसीडी स्क्रीन ला सपोर्ट करतो. नवीन टॅब लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर झाला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच 3 जीबी रॅम सह सादर केले आहे. या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत त्याचबरोबर दमदार साउंड क्वालिटी साठी यात डॉल्बी एटमॉस वाले क्वॉड स्पीकर देण्यात आले आहेत. कंपनी ने आपला डिवाईस किड्स मोड आणि पॅरंटल कंट्रोल फीचर सह सादर केला आहे सोबत 8 चिल्ड्रन अॅप पण मोफत देण्यात आले आहेत. सॅमसंग च्या स्मार्टथिंग फीचर सोबत या डिवाईस मध्ये पावर बॅकअप साठी 7,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच ब्लू, ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा डिवाईस 15 ऑगस्टला फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच यूजर्स उद्या म्हणजे 9 ऑगस्ट पासून हा प्री-आॅर्डर करू शकतात. फ्लिपकार्ट सोबतच गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच आॅनलाईन सॅमसंग शॉप वरून विकत घेता येईल. 29,990 रुपयांचा हा डिवाईस विकत घेतल्यास जियो कडून 2,750 रूपयांची आॅफर पण मिळेल.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच स्क्रीन वाला सॅमसंग टॅबलेट भारतात झाला लॉन्च, बघा या डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-lte-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0