91मोबाईल्सने या आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये माहिती दिली होती कि कंपनी डिसेंबर महिन्यात भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवणार आहे आणि या सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo V17 असेल. आम्ही आपल्या रिपोर्ट मध्ये असा खुलासा पण केला होता कि Vivo V17 स्मार्टफोन कंपनी पंच-होल डिस्प्ले डिजाईन सह सादर करेल. आज Vivo ने आमच्या रिपोर्ट वर शिक्कामोर्तब करत Vivo V17 च्या लॉन्चची माहिती दिली आहे. Vivo ने अधिकृतपणे खुलासा केला आहे कि येत्या 9 डिसेंबरला भारतात Vivo V सीरीजचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.
Vivo ने मीडिया ईन्वाईट पाठवत स्मार्टफोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 9 डिसेंबरला Vivo भारतात एका ईवेंटचे आयोजन केले जाईल आणि या ईवेंटच्या मंचावर ब्रँडच्या ‘वी सीरीज’ चा आगामी डिवाईस इंडियन मार्केट मध्ये येईल. Vivo ने या डिवाईसचे नाव सांगितले नाही, पण आम्हाला वाटते कि 9 डिसेंबरला लॉन्च होणारा स्मार्टफोन Vivo V17 असेल. सर्वात मोठी बाब अशी कि कंपनीने शेयर केलेल्या इन्वाईट मध्ये पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे Vivo V17 याच महिन्यात चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. पण चीन मध्ये Vivo ने हा स्मार्टफोन Vivo S5 नावाने आणला होता आणि वीवो एस5 च भारतात Vivo V17 नावाने लॉन्च होईल. कंपनीने फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तसेच आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार भारतात Vivo V17 ची किंमत 22,000 रुपयांच्या आसपास असेल.
हे देखील वाचा: Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये
Vivo V17
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo V17 को 20:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. चीनी बाजारात हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो ब्रँडच्या जोवी असिस्टेंट सह काम करतो. प्रोसेसिंग साठी Vivo V17 म्हणजे चीनच्या Vivo S5 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo S5 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Vivo S5 / Vivo V17 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite झाला गीकबेंच वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च
Vivo S5 नावाने चीनी बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे, ज्यात 8 जीबी रॅम + 128 मेमरी आणि 8 जीबी रॅम + 256 मेमरी देण्यात आली आहे. Vivo S5 मल्टी टर्बो फीचर सह येतो जो फोन मध्ये गेमिंग लॅग फ्री व स्मूद करतो. सिक्योरिटी साठी Vivo S5 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरने पण ऍक्सेस केला जाऊ शकतो. पावर बॅकअप साठी Vivo S5 म्हणजे Vivo V17 मध्ये 4100 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 22.5 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
















