7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच स्क्रीन वाला सॅमसंग टॅबलेट भारतात झाला लॉन्च, बघा या डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले दोन नवीन डिवाईस सादर केले आहेत. कंपनीने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच न्यूयार्क मध्ये लॉन्च केले होते. तसेच आज आपल्या भारतीय फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच भारतीय बाजारात आणला आहे. कंपनी ने या दमदार टॅबलेट डिवाईस ची किंमत 29,990 रुपये ठेवली आहे जो 13 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग ने भारतात गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच चा एलटीई मॉडेल लॉन्च करण्यात आला आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा शानदार टॅबलेट 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केले आहे जो 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या मोठया टीएफटी एलसीडी स्क्रीन ला सपोर्ट करतो. नवीन टॅब लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर झाला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच 3 जीबी रॅम सह सादर केले आहे. या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत त्याचबरोबर दमदार साउंड क्वालिटी साठी यात डॉल्बी एटमॉस वाले क्वॉड स्पीकर देण्यात आले आहेत. कंपनी ने आपला डिवाईस किड्स मोड आणि पॅरंटल कंट्रोल फीचर सह सादर केला आहे सोबत 8 चिल्ड्रन अॅप पण मोफत देण्यात आले आहेत. सॅमसंग च्या स्मार्टथिंग फीचर सोबत या डिवाईस मध्ये पावर बॅकअप साठी 7,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच ब्लू, ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा डिवाईस 15 ऑगस्टला फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच यूजर्स उद्या म्हणजे 9 ऑगस्ट पासून हा प्री-आॅर्डर करू शकतात. फ्लिपकार्ट सोबतच गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच आॅनलाईन सॅमसंग शॉप वरून विकत घेता येईल. 29,990 रुपयांचा हा डिवाईस विकत घेतल्यास जियो कडून 2,750 रूपयांची आॅफर पण मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here