Tecno Camon 17 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 May 2021 11:34:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन 48MP फ्रंट आणि 64MP बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-17-pro-smartphone-launched-with-48mp-front-and-64mp-back-camera-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-17-pro-smartphone-launched-with-48mp-front-and-64mp-back-camera-check-price-and-specifications/#respond Mon, 10 May 2021 11:34:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10864 Tecno Camon 17 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+ 1080 × 2460 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे.

The post Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन 48MP फ्रंट आणि 64MP बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ने गेल्या महिन्यात बजेट सेगमेंटमध्ये Tecno Camon 17 स्मार्टफोन MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला होता. आता कंपनीने या सीरीजचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 17 Pro लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन नाइजिरियन मार्केटमध्ये सादर केला गेला आहे. लेटेस्ट Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन 6.8 इंचाचा IPS LCD 90Hz डिस्प्ले आणि MediaTek Helio G95 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. टेक्नोने या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. टेक्नोचा हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो. त्याचबरोबर या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्ज देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला Tecno Camon 17 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत सांगत आहोत. (Tecno Camon 17 Pro smartphone launched with 48mp front and 64mp back camera check price and specifications)

Tecno Camon 17 Pro स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 17 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+ 1080 × 2460 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 500 निट्स आहे. टेक्नोचा हा स्मार्टफोन मीडियाटेक Helio G95 SoC सह सादर केला गेला आहे. सॉफ्टवेयर पाहता टेक्नोचा हा फोन Android 11 वर आधारित HiOS कस्टम युआयवर चालतो. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, जो पावर बटणवर आहे.

हे देखील वाचा : Honor Tab X7 टॅबलेट 8 इंचाचा IPS डिस्प्ले आणि 5,100mAh बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Camon 17 Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत कंपनीने 8MP ची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 48 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी पाहता डुअल-SIM सपोर्ट, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूछ, GPS, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जला सपोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi करत आहे धमाक्याची तयारी, अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच लॉन्च करेल फोल्डेबल स्मार्टफोन

Tecno Camon 17 Pro किंमत

Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन – कॅलिफोर्निया ड्रीम सिल्वर आणि मालिबू ब्लू मध्ये सादर केला गेला आहे. हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह सिंगल वेरिएंटमध्ये 125,000 NGN (करीब 22,597 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

The post Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन 48MP फ्रंट आणि 64MP बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-17-pro-smartphone-launched-with-48mp-front-and-64mp-back-camera-check-price-and-specifications/feed/ 0