Honor Tab X7 टॅबलेट 8 इंचाचा IPS डिस्प्ले आणि 5,100mAh बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

Honor Tab X7

हुवावेच्या सब-ब्रँड Honor ने गृह मार्केट चीनमध्ये Honor Tab X7 टॅबलेट लॉन्च केला आहे. Honor Tab X7 टॅब LTE आणि Wi-Fi वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहेत. ऑनरचा लेटेस्ट टॅबलेट 8 इंच IPS डिस्प्ले आणि मीडियाटेकच्या चिपसेटसह लॉन्च केला गेला आहे. लेटेस्ट Honor Tab X7 टॅबलेटमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या टॅबच्या मागे 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला या टॅबच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती देत आहोत. (Honor Tab X7 launched check price and specifications)

Honor Tab X7 स्पेसिफिकेशन्स

Honor Tab X7 टॅबलेटमध्ये 8 इंचाचा IPS डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1280×800 पिक्सल आहे, या फोनचा डिस्प्ले बॉडी टू रेश्यो 80 टक्के आहे. या फोनमध्ये 4.9mm चे बेजल देण्यात आले आहेत जेणेकरून टॅबमध्ये युजर्सना चांगला विजुअल एक्सपीरियंस मिळेल. त्याचबरोबर या टॅबचा किड्स वर्जन पण सादर केला गेला आहे. हा वर्जन एजुकेशन बेस्ड सॉफ्टवेयर आणि फीचरसह सादर केला गेला आहे जे मुलांच्या शालेय अभ्यासात मदत करतात.

हे देखील वाचा : 20,000 रुपयांच्या बजेटमधील टॉप 10 फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन्स, क्षणात होतील फुल चार्ज

Honor Tab X7 टॅबलेटचा डिस्प्ले चीनच्या नॅशनल आय इजीनियरिंग सेंसर फॉर आय केयरसह राइनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो. ऑनरचा हा टॅबलेट MediaTek MT8768T प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. ऑनरचा हा कस्टम युजर इंटरफेस Magic UI 4.0 सह सादर केला आहे. या टॅबलेटच्या फ्रंटला 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या टॅबमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी सिंगल चार्जमध्ये सलग 10 तास HD व्हिडीओ आणि 88 तास ऑडियो प्ले करू शकते.

हे देखील वाचा : Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती

Honor Tab X7 किंमत

Honor Tab X7 टॅबलेट तीन वेगवेगळ्या कॉनफीग्रेशनमध्ये सादर केले गेले आहेत. या टॅबचा लोवर वेरिएंट 3GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह फक्त wi-fi कनेक्टिविटीसह सादर केला गेला आहे. हा टॅब 899 युआन (जवळपास 10,200 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. तसेच या टॅबलेटचा हायर वेरिएंट 1,199 युआन (जवळपास 13,600 रुपये) सह सादर केला गेला आहे. हायर वेरिएंट 4G LTE सपोर्टसह सादर केला गेला आहे. या टॅबचा चिल्ड्रन्स वेरिएंट 999 युआन (जवळपास 11,300 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here