Xiaomi करत आहे धमाक्याची तयारी, अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच लॉन्च करेल फोल्डेबल स्मार्टफोन

Xiaomi Mi Mix Fold

Xiaomi सध्या आपल्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहेत. शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि यांचे कोडनेम K8 आणि J18s आहे. या दोन्ही स्मार्टफोनबद्दल अंदाज लावला जात आहे कि हे दोन्ही फोन इन-स्क्रीन कॅमेरा असलेले कंपनीचे पहिले डिवाइस असू शकतात. चायनीज टिपस्टर Digital Chat Station ने आपल्या Weibo अकाउंटवर शाओमीच्या अपकमिंग स्मार्टफोन J18s बद्दल स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. (Xiaomi launch foldable phone with under display camera and 108mp triple rear camera)

Xiaomi ने चीनमध्ये मार्चमध्ये आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन MI MIX Fold लॉन्च केला आहे. शाओमीच्या आगामी J18s स्मार्टफोनबद्दल बोलले जात आहे कि हा कंपनीचा दुसरा फोल्डेबल फोन असू शकतो. टिपस्टरचा दावा आहे कि J18s स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती

शाओमीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन Mi MIX Fold चा आउटर डिस्प्ले पाहता याचा रिफ्रेट रेट 90Hz होता. तसेच या फोनच्या मुख्य डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz होता. असे बोलले जात आहे कि आगामी J18s फोल्डेबल फोनमध्ये कंपनी 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले असेल. तसेच कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या फोनचा प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे, सोबत 3X ऑप्टिकल झूम असलेली लिक्विड लेंस आणि एक अल्ट्रावाइड स्नाइपर दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Honor Tab X7 टॅबलेट 8 इंचाचा IPS डिस्प्ले आणि 5,100mAh बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

Xiaomi ने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आपली थर्ड जेनेरेशन अंडर डिस्प्ले कॅमेरा टेक्नोलॉजी सादर केली होती. शाओमीनुसार या टेक्नोलॉजीमध्ये कंपनीने डिस्प्लेच्या सब-पिक्सल गॅपमधून कॅमेरा फोटो क्लिक करतो. यामुळे कॅमेरा पूर्णपणे डिस्प्लेमध्ये लपतो. त्याचबरोबर शाओमीने असे म्हटले होते कि हा कॅमेरा पारंपरिक कॅमेऱ्याप्रमाणे फोटो क्लिक करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here