Tenor - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 12 Jul 2019 14:05:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा असलेला हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/tenor-g2-10-or-g2-launch-in-india-6gb-ram-5000mah-battery-amazon-prime-day-2019-price-11999/ https://www.91mobiles.com/marathi/tenor-g2-10-or-g2-launch-in-india-6gb-ram-5000mah-battery-amazon-prime-day-2019-price-11999/#respond Fri, 12 Jul 2019 14:05:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4781 15 जुलै पासूनच देशात सेल साठी उपलब्ध होईल. 10.or G2 ट्वाईलाईट ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा असलेला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एंट्री करत नवीन ब्रँड Tenor बनवला होता जो 10.or असा लिहतात. या ब्रँड अंतर्गत कंपनीने गेल्याच महिन्यात एक नवीन स्मार्टफोन 10.or G2 सादर केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन अधिकृतपणे सादर केला होता पण Tenor ने फोनची किंमत सांगितली नव्हती. आज अधिकृत घोषणा करत कंपनीने 10.or G2 च्या किंमतीचा खुलासा पण केला आहे.

किंमत व उपलब्धता

10.or G2 कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर 10.or G2 चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 14,599 रुपयांमध्ये बाजार मध्ये आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने खासकरून Amazon Prime Day 2019 च्या निमित्ताने लॉन्च केला आहे जो 15 जुलै पासूनच देशात सेल साठी उपलब्ध होईल. 10.or G2 ट्वाईलाईट ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: Oppo K3 भारतात 19 जुलैला होईल लॉन्च, येईल या कॅमेरा टेक्नोलॉजीसह

10.or G2

कंपनीने हा स्मार्टफोन आईफोन 10 सारख्या नॉच डिस्प्लेसह सादर केला आहे. हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियोसह सादर केला आहे जो 2246 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन साठी कंपनीने हा 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला आहे. हा फोन एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो.

10.or G2 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जे माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतात. तसेच ग्राफिक्स साठी कंपनीने आपल्या या फोन मध्ये एड्रेनो 509 जीपीयू दिला आहे.

हे देखील वाचा: डुअल रियर कॅमेरा आणि 4जीबी रॅम असलेल्या Realme 3i ची किंमत असेल 8,000 रुपयांपेक्षा कमी!

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता 10.or G2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 12-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह येतो. 10.or G2 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी 10.or G2 15वॉट फास्ट चार्जिंग फीचर वाल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा असलेला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tenor-g2-10-or-g2-launch-in-india-6gb-ram-5000mah-battery-amazon-prime-day-2019-price-11999/feed/ 0
3जीबी रॅम आणि 3,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला टेनॉर चा स्वस्त स्मार्टफोन डी2 https://www.91mobiles.com/marathi/10-or-d2-india-launch-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/10-or-d2-india-launch-price-features-specifications-in-marathi/#respond Wed, 22 Aug 2018 09:38:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1792 फोन चा 2जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपये तसेच 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. टेनॉर डी2 येत्या 28 ऑगस्ट पासून अमेजॉन वरून विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम आणि 3,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला टेनॉर चा स्वस्त स्मार्टफोन डी2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेनॉर ने गेल्या वर्षी भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन डी2 लॉन्च केला होता. आज भरपुर दिवसांनी टेनॉर ने आपला अजून एक स्मार्टफोन इंडियन टेक बाजारात लॉन्च केला आहे. टेनॉर ने डी2 स्मार्टफोन सादर केला आहे जो 2 रॅम वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. टेनॉर ब्रांड ई-कॉमर्स साइट अमेजॉन ने बनवला आहे. त्यामुळे हा फोन पण अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

टेनॉर डी2 कंपनी ने 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. या फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.45-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो पांडा 2डी ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 1.4गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 308 जीपीयू देण्यात आला आहे.

कपंनी ने हा फोन दोन वेरिएंट मध्ये बाजारात आणला आहे. एक वेरिएंट मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये इंटरनल स्टोरेज 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता डी2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

टेनॉर डी2 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. टेनॉर ने आपल्या या फोन मध्ये फिजीकल फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही पण सिक्योरिटी साठी हा फोन फेस अनलॉक फीचर ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सोबत 3,140एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने हा फोन आईपीएक्स2 रेटिंग सह सादर केला आहे म्हणजे हा पाण्याच्या थेंबांपासून आणि धूळिपासून सुरक्षित राहील.

टेनॉर डी2 बियॉड ब्लॅक आणि ग्लो गोल्ड कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोन चा 2जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपये तसेच 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. टेनॉर डी2 येत्या 28 ऑगस्ट पासून अमेजॉन वरून विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम आणि 3,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला टेनॉर चा स्वस्त स्मार्टफोन डी2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-or-d2-india-launch-price-features-specifications-in-marathi/feed/ 0