डुअल रियर कॅमेरा आणि 4जीबी रॅम असलेल्या Realme 3i ची किंमत असेल 8,000 रुपयांपेक्षा कमी!

Realme ने मीडिया इनवाइट पाठवून सांगितले आहे कि कंपनी 15 जुलैला भारतात Realme X आणि Realme 3i लॉन्च केले जातील. कंपनी Realme X फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये आणि Realme 3i बजेट सेगमेंट मध्ये सादर करेल. तसेच लॉन्चच्या आधी Realme 3i ची किंमत, कॅमेरा डिटेल आणि स्टोरेज व रॅम ची माहिती समोर आली आहे.

या रिपोर्टआधी Realme 3i ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर लिस्ट झाला होता, फोन मध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर हीलियो पी60 चिपसेट, 4,230एमएएच बॅटरी व डायमंड कट डिजाइन सह डुअल रियर कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली होती. आता IndiaShopps नावाच्या वेबसाइट ने Realme 3i चा कॅमेरा सेंसर, डिस्प्ले साइज, रॅम आणि स्टोरेज ऑप्शन सोबतच किंमतीची माहिती दिली आहे.

रिपोर्ट्स नुसार कंपनी Realme 3i चा बेस वेरिएंट 8,000 रुपयांच्या आस-पास लॉन्च करू शकते. तसेच Realme 3i मध्ये 6.2-इंचाचा डिस्प्ले असू शकतो जो Realme 3 च्या डिस्प्ले पेक्षा छोटा असेल. तसेच फ्लिपकार्टने पण सांगितले आहे कि डिवाइस मध्ये 6.22-इंचाचा डिस्प्ले व नॉच ड्रॉप डिजाइन असेल.

रिपोर्ट नुसार हँडसेट दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये येईल. याच्या बेस वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज आणि टॉप-एंड वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज असेल. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढत येईल.

तसेच फोटोग्राफी साठी Realme 3i मध्ये रियर वर 13-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्यासह 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर डेप्थ इफेक्ट साठी असेल. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल जो एआई सह येईल. तसेच फोन डायमंड ब्लू आणि डायमंड रेड कलर ऑप्शन मध्ये येऊ शकतो. तसेच Realme 3i सह लॉन्च होत असलेला Realme X स्मार्टफोन भारतात 22 जुलैला फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

Realme 3i काही दिवसांपूर्वीच चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर RMX1827 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. या लिस्टिंग वरून समजले होते कि Realme 3i एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला जाईल सोबतच हा फोन आक्टाकोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीया पी60 चिपसेट वर चालेल. गीकबेंच वर Realme 3i 4जीबी रॅम सह येईल असे सांगण्यात आले आहे. आशा आहे कि कंपनी आपला हा फोन एकापेक्षा जास्त वेरिंएट्स मध्ये लॉन्च करेल. गीकबेंच स्कोर पाहता Realme 3i सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here