Oppo K3 भारतात 19 जुलैला होईल लॉन्च, येईल या कॅमेरा टेक्नोलॉजीसह

91मोबाईल्सला अलीकडेच आपल्या सूत्रांकडून बातमी मिळाली होती कि Oppo India भारतात आपल्या K सीरीज वाढवत Oppo K3 स्मार्टफोन 19 जुलैला लॉन्च करणार आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. ई-कॉमर्स साइट अमेझॉन वर काही दिवसांपूर्वी Oppo K3 टीज केला होता. आता अमेझॉन वर एक पोस्टर जारी करण्यात आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी येत्या 19 जुलैला भारतात Oppo K3 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

आशा आहे कि या फोनची सुरवातीची किंमत 16,000 रुपयांच्या आसपास असू शकते. विशेष म्हणजे Oppo K3 भारतात लॉन्च होणारा सर्वात स्वस्त इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन पण असू शकतो. Oppo K3 भारतात सेल साठी कधी यईल याची माहिती पण लवकरच तुम्हाला दिली जाईल. ओप्पो के3 यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च झालेल्या ओप्पो के1 चा अपग्रेडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ओप्पो के3 भारताआधी मे मध्ये चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे, त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स समजले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

Oppo ने हँडसेट मध्ये 6.5-इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. सोबत हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ओपोच्या यूजर इंटरफेस कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे. कंपनीने सांगितले आहे कि Oppo K3 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट दिला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर वर आधारित आहे. Oppo K3 मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम सह 64जीबी, 128जीबी व 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. Oppo K3 मध्ये गेम बूस्ट 2.0 फीचर देण्यात आला आहे जो गेमिंग साठी लॅग फ्री व स्मूथ परफार्मेंस देईल.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Oppo K3 मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर ओपो ने K3 मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट दिला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,765एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here