Vivo S16 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:40:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12GB दणकट रॅमसह Vivo S16e लाँच; सॅमसंगच्या प्रोसेसरसह चीनमध्ये एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16e-5g-phone-launch-with-50mp-camera-and-exynos-1080-soc-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16e-5g-phone-launch-with-50mp-camera-and-exynos-1080-soc-know-price-and-specifications/#respond Fri, 23 Dec 2022 07:15:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16304 विवो ‘एस’ सीरीज टेक मंचावर आली आहे ज्या अंतर्गत तीन नवीन 5G Phone Vivo S16, Vivo S16 Pro आणि Vivo S16e लाँच झाले आहेत. हे तिन्ही मोबाइल फोन सध्या चीनमध्ये आले आहेत जे भारतीय बाजारात Vivo V27 Series अंतर्गत सादर केले जाऊ शकतात. Vivo S16e चीनमध्ये 12GB RAM, Android 13 आणि सॅमसंग एक्सनॉस 1080 चिपसेटसह […]

The post 12GB दणकट रॅमसह Vivo S16e लाँच; सॅमसंगच्या प्रोसेसरसह चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवो ‘एस’ सीरीज टेक मंचावर आली आहे ज्या अंतर्गत तीन नवीन 5G Phone Vivo S16, Vivo S16 Pro आणि Vivo S16e लाँच झाले आहेत. हे तिन्ही मोबाइल फोन सध्या चीनमध्ये आले आहेत जे भारतीय बाजारात Vivo V27 Series अंतर्गत सादर केले जाऊ शकतात. Vivo S16e चीनमध्ये 12GB RAM, Android 13 आणि सॅमसंग एक्सनॉस 1080 चिपसेटसह लाँच झाला आहे. पुढे आम्ही सीरिजमधातल्या स्वस्त विवो एस16ई ची प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo S16e Specifications

Vivo S16e अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर लाँच झाला आहे. यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा एक्सनॉस 1080 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी78 एमपी10 जीपीयूला सपोर्ट करतो. फोन LPDDR4X RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

फोटोग्राफीसाठी विवो एस16ई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो एस16ई स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.62 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

Vivo S16e ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनचे डायमेंशन एमएम आणि वजन 187ग्राम आहे.

Vivo S16e Price

विवो एस16ई 5जी फोन तीन व्हेरिएंट्समध्ये चीनमध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 2099 युआन म्हणजे 24,800 रुपयांच्या आसपास आहे. तर दुसरा व्हेरिएंट 2299 युआन म्हणजे जवळपास 27,000 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे जो 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. Vivo S16e च्या सर्वात मोठ्या मॉडेलमध्ये 12GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि ही प्राइस 2499 युआन (जवळपास 29,500 रुपये) आहे. हा फोन Black, Purple आणि Green कलरमध्ये बाजारात आला आहे.

The post 12GB दणकट रॅमसह Vivo S16e लाँच; सॅमसंगच्या प्रोसेसरसह चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16e-5g-phone-launch-with-50mp-camera-and-exynos-1080-soc-know-price-and-specifications/feed/ 0
50MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo S16 Pro आणि Vivo S16 लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-selfie-camera-phone-vivo-s16-pro-vivo-s16-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-selfie-camera-phone-vivo-s16-pro-vivo-s16-launched-know-price-and-specifications/#respond Fri, 23 Dec 2022 06:26:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16295 विवोनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘एस’ सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीनं तीन नवीन 5G Phone लाँच केले आहेत ज्यांची नावे Vivo S16, Vivo S16 Pro आणि Vivo S16e अशी ठेवण्यात आली आहेत. यातील बेस आणि प्रो मॉडेलची माहिती आपण इथे घेणार आहोत. जे 4600mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट, 64MP रियर कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेऱ्याला […]

The post 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo S16 Pro आणि Vivo S16 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवोनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘एस’ सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीनं तीन नवीन 5G Phone लाँच केले आहेत ज्यांची नावे Vivo S16, Vivo S16 Pro आणि Vivo S16e अशी ठेवण्यात आली आहेत. यातील बेस आणि प्रो मॉडेलची माहिती आपण इथे घेणार आहोत. जे 4600mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट, 64MP रियर कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Vivo S16 Pro and Vivo S16 Price

विवो एस16 प्रो चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 3299 युआन (जवळपास 39,000 रुपये) आहे. तर मोठा Vivo S16 Pro 12GB RAM + 512GB Storage सह 3599 युआन (जवळपास 42,500 रुपये) मध्ये आला आहे. हा फोन चायनामध्ये Black आणि Green कलरमध्ये आला आहे.

विवो एस16 5जी फोनचे चार व्हेरिएंट्स आले आहेत. तसेच Black, Green आणि Gradient कलर व्हेरिएंट देखील आहेत. vivo S16 च्या 8GB RAM व 128GB Storage असलेल्या बेस मॉडेलची किंमत 2499 युआन (जवळपास 29,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 8GB RAM व 256GB Storage ची किंमत 2699 युआन (जवळपास 32,000 रुपये), 12GB RAM व 256GB Storage मॉडेल 2999 युआन (जवळपास 35,500 रुपये) आणि 12GB RAM व 512GB Storage मॉडेल 3299 युआन (जवळपास 39,000 रुपये) मध्ये खरेदी करता येईल.

Vivo S16 Pro Specifications

विवो एस16 प्रो मध्ये 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 8000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 1.07बिलियन कलर्स आणि पी3 कलर गामुटला सपोर्ट करतो.

Vivo S16 Pro 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो. यात 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटसह माली जी610 जीपीयू आहे. तसेच memory fusion technology च्या मदतीनं यात 8GB RAM एक्स्ट्रा मिळवता येईल. फोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी 66वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.

फोटोग्राफीसाठी विवो एस16 प्रोच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा Sony IMX766V प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo S16 specifications

विवो एस16 स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा विवो मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. या फोनच्या डिस्प्लेवर एचडीआर10+ सारखे फीचर्स पण मिळतात.

Vivo S16 5G फोन अँड्रॉइड 12 वर आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि एड्रेनो 650 जीपीयू मिळतो. हा फोन LPDDR4X RAM आणि UFS 3.1 storage सह येतो. कंपनीनं यात 5G आणि बेसीक कनेक्टिव्हिटी ऑप्शनसह एनएफसी सपोर्ट दिला आहे. तर यातील 4,600 एमएएचची बॅटरी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी विवो एस16 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. Vivo S16 5G फोन 50 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो.

The post 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo S16 Pro आणि Vivo S16 लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-selfie-camera-phone-vivo-s16-pro-vivo-s16-launched-know-price-and-specifications/feed/ 0
दणकट प्रोसेसरसह येऊ शकतो Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro; याच महिन्यात होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16-5g-and-s16-pro-specifications-leaked-with-launch-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16-5g-and-s16-pro-specifications-leaked-with-launch-details/#respond Sat, 03 Dec 2022 06:30:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15639 विवो टेक मार्केटमध्ये आपल्या ‘एस’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि कंपनी लवकरच Vivo S16 Series जगासमोर सादर करू शकते. चर्चा आहे की विवो एस16 सीरीज अंतगर्त Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. या विवो स्मार्टफोन्सबद्दल नवीन माहिती समोर आली आहे त्यानुसार विवो एस16 5जी आणि विवो एस16 प्रो […]

The post दणकट प्रोसेसरसह येऊ शकतो Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro; याच महिन्यात होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवो टेक मार्केटमध्ये आपल्या ‘एस’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि कंपनी लवकरच Vivo S16 Series जगासमोर सादर करू शकते. चर्चा आहे की विवो एस16 सीरीज अंतगर्त Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. या विवो स्मार्टफोन्सबद्दल नवीन माहिती समोर आली आहे त्यानुसार विवो एस16 5जी आणि विवो एस16 प्रो 5जी फोन डिसेंबर 2022 मध्ये म्हणजे याच महिन्यात चीनमध्ये लाँच होऊ शकतात.

Vivo S16 series कधी होणार लाँच

विवो एस16 सीरीजच्या लाँचची माहिती डिजीटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की विवो कंपनी आपले नवीन मोबाइल फोन्ससह तयार आहे तसेच Vivo S16 आणि Vivo S16 Pro या महिन्यात टेक मार्केटमध्ये सादर केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार हे स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतात जे पुढील वर्षी 2023 मध्ये इतर बाजारांमध्ये उतरवले जाऊ शकतात. Vivo S16 series लाँच डिटेल्स सोबतच अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील या लीकमधून हाती लागली आहे, जी पुढे सांगण्यात आली आहे.

Vivo S16 series चे लीक स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या माहितीनुसार Vivo S16 Pro स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. तर Vivo S16 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो, हे दोन्ही चिपसेट फ्लॅगशिप ग्रेड आहेत. विशेष म्हणजे दोन्ही विवो मोबाइल 5G फोन असतील जे SA/NSA ड्युअल मोड 5जी वर चालू शकतात.

लीकनुसार विवो एस16 प्रो स्मार्टफोन ओएलईडी पॅनल असेलल्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो आणि कदाचित हा विवो स्मार्टफोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये विवो वी1+ आयपीएस स्क्रीन असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Vivo S16 आणि Vivo S16 Pro दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 80वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. या दोन्ही मोबाइल फोन्समध्ये बॅटरी पावर किती असेल हे मात्र या रिपोर्टमधून समजलं नाही. लीकनुसार विवो एस16 5जी फोन black, blue आणि purple कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर विवो एस16 प्रो स्मार्टफोन black, green आणि orange gold कलरमध्ये बाजारात प्रवेश करू शकतो.

The post दणकट प्रोसेसरसह येऊ शकतो Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro; याच महिन्यात होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16-5g-and-s16-pro-specifications-leaked-with-launch-details/feed/ 0