12GB दणकट रॅमसह Vivo S16e लाँच; सॅमसंगच्या प्रोसेसरसह चीनमध्ये एंट्री

विवो ‘एस’ सीरीज टेक मंचावर आली आहे ज्या अंतर्गत तीन नवीन 5G Phone Vivo S16, Vivo S16 Pro आणि Vivo S16e लाँच झाले आहेत. हे तिन्ही मोबाइल फोन सध्या चीनमध्ये आले आहेत जे भारतीय बाजारात Vivo V27 Series अंतर्गत सादर केले जाऊ शकतात. Vivo S16e चीनमध्ये 12GB RAM, Android 13 आणि सॅमसंग एक्सनॉस 1080 चिपसेटसह लाँच झाला आहे. पुढे आम्ही सीरिजमधातल्या स्वस्त विवो एस16ई ची प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo S16e Specifications

Vivo S16e अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर लाँच झाला आहे. यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा एक्सनॉस 1080 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी78 एमपी10 जीपीयूला सपोर्ट करतो. फोन LPDDR4X RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

फोटोग्राफीसाठी विवो एस16ई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो एस16ई स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.62 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

Vivo S16e ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनचे डायमेंशन एमएम आणि वजन 187ग्राम आहे.

Vivo S16e Price

विवो एस16ई 5जी फोन तीन व्हेरिएंट्समध्ये चीनमध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 2099 युआन म्हणजे 24,800 रुपयांच्या आसपास आहे. तर दुसरा व्हेरिएंट 2299 युआन म्हणजे जवळपास 27,000 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे जो 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. Vivo S16e च्या सर्वात मोठ्या मॉडेलमध्ये 12GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि ही प्राइस 2499 युआन (जवळपास 29,500 रुपये) आहे. हा फोन Black, Purple आणि Green कलरमध्ये बाजारात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here