दणकट प्रोसेसरसह येऊ शकतो Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro; याच महिन्यात होऊ शकतो लाँच

Vivo S15 Pro

विवो टेक मार्केटमध्ये आपल्या ‘एस’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि कंपनी लवकरच Vivo S16 Series जगासमोर सादर करू शकते. चर्चा आहे की विवो एस16 सीरीज अंतगर्त Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. या विवो स्मार्टफोन्सबद्दल नवीन माहिती समोर आली आहे त्यानुसार विवो एस16 5जी आणि विवो एस16 प्रो 5जी फोन डिसेंबर 2022 मध्ये म्हणजे याच महिन्यात चीनमध्ये लाँच होऊ शकतात.

Vivo S16 series कधी होणार लाँच

विवो एस16 सीरीजच्या लाँचची माहिती डिजीटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की विवो कंपनी आपले नवीन मोबाइल फोन्ससह तयार आहे तसेच Vivo S16 आणि Vivo S16 Pro या महिन्यात टेक मार्केटमध्ये सादर केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार हे स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतात जे पुढील वर्षी 2023 मध्ये इतर बाजारांमध्ये उतरवले जाऊ शकतात. Vivo S16 series लाँच डिटेल्स सोबतच अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील या लीकमधून हाती लागली आहे, जी पुढे सांगण्यात आली आहे.

Vivo S16 series चे लीक स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या माहितीनुसार Vivo S16 Pro स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. तर Vivo S16 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो, हे दोन्ही चिपसेट फ्लॅगशिप ग्रेड आहेत. विशेष म्हणजे दोन्ही विवो मोबाइल 5G फोन असतील जे SA/NSA ड्युअल मोड 5जी वर चालू शकतात.

लीकनुसार विवो एस16 प्रो स्मार्टफोन ओएलईडी पॅनल असेलल्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो आणि कदाचित हा विवो स्मार्टफोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये विवो वी1+ आयपीएस स्क्रीन असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Vivo S16 आणि Vivo S16 Pro दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 80वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. या दोन्ही मोबाइल फोन्समध्ये बॅटरी पावर किती असेल हे मात्र या रिपोर्टमधून समजलं नाही. लीकनुसार विवो एस16 5जी फोन black, blue आणि purple कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर विवो एस16 प्रो स्मार्टफोन black, green आणि orange gold कलरमध्ये बाजारात प्रवेश करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here