Vivo V21 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 26 Jul 2022 11:26:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सुंदर सेल्फी स्वस्तात! 44MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या Vivo V21 5G स्मार्टफोन 11,000 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/44mp-selfie-camera-smartphone-vivo-v21-5g-is-availabel-with-11000-discount/ https://www.91mobiles.com/marathi/44mp-selfie-camera-smartphone-vivo-v21-5g-is-availabel-with-11000-discount/#respond Tue, 26 Jul 2022 11:26:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11725 Vivo V21 5G मध्ये 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

The post सुंदर सेल्फी स्वस्तात! 44MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या Vivo V21 5G स्मार्टफोन 11,000 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सध्या Big Saving Days सेल सुरु आहे. 23 जुलैला सुरु झालेल्या या सेलची सांगता 27 जुलैला होईल. तोपर्यंत फ्लिपकार्टवरील या सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम्स आणि अ‍ॅक्सेसरीज धमाकेदार डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. तुम्ही जर एखादा शानदार सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधात असाल तर तुम्ही Vivo च्या या हँडसेटची निवड करू शकता, ज्यावर दमदार डिस्काउंट देखील मिळत आहे. 44MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V21 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवरील सेमध्ये 11,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

Vivo V21 5G वरील ऑफर

Vivo V21 5G स्मार्टफोनची रिटेल बॉक्सवरील किंमत 32,990 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर सेलमध्ये हा हँडसेट 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विवोचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 27,990 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. परंतु Vivo V21 5G स्मार्टफोनची खरेदी डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं केल्यास 2000 रुपयांची सूट मिळेल.

हे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड HDFC बँकेचं असल्यास तुम्हाला 4000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. तर Axis बँकेच्या कार्ड धारकांना 10 टक्के (मॅक्सिमम 3000 रुपये) पर्यंतचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे HDFC च्या कार्डनं पेमेंट केल्यास तुम्ही हा सेल्फी सेंट्रिक फोन फक्त 21,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

Vivo V21 5G Price in India

Vivo V21 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्टवर 27,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या हायएंड मॉडेल 30,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. विवोचा हा फोन सनसेट डॅझल आणि डस्क ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

Vivo V21चा फोटो

Vivo V21 5G Specifications

Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये 6.44-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सोबतीला ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC3 GPU मिळतो. फोन Android 11 आधारित Funtouch OS 11.1 UI वर चालतो.

मिड रेंज Vivo V21 5G स्मार्टफोनची फ्रंट फेसिंग कॅमेरा ही खासियत आहे. या फोनमध्ये 44MP चा सेल्फी कॅमेरा आहे मिळतो ऑटोफोकस आणि OIS ला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे फ्रंटला दोन LED फ्लॅश देखील आहेत. हा सेल्फी कॅमेरा 4K/30fps व्हिडीओ देखील शूट करू शकतो. Vivo V21 5G च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे.

Vivo V21 5G चा फोटो

Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फक्त 30 मिनिटांत 63 टक्के चार्ज होतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-SIM 5G, ड्युअल-बँड Wi-Fi ac, Bluetooth v5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

The post सुंदर सेल्फी स्वस्तात! 44MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या Vivo V21 5G स्मार्टफोन 11,000 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/44mp-selfie-camera-smartphone-vivo-v21-5g-is-availabel-with-11000-discount/feed/ 0
Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/vivo-v21-5g-launched-in-india-check-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v21-5g-launched-in-india-check-price-specifications-and-features/#respond Thu, 29 Apr 2021 10:26:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10761 Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. Vivo V21 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे

The post Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने अखेरीस आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या V21 series अंतर्गत नवीन फोन Vivo V21 5G लॉन्च केला आहे. या फोनबद्दल गेल्यावर्षीपासून लीक बातम्या समोर येत होत्या. 91मोबाईल्सनेच सर्वप्रथम एक्सक्लूसिवली अशी माहिती दिली होती कि कंपनी आपल्या वीवो वी21 सीरीजवर काम करत आहे आणि लवकरच या सीरीजमध्ये नवीन फोन्स सादर करेल. भारतापूर्वी मलेशियाच्या मार्केटमध्ये या सिरीजमध्ये Vivo V21, आणि Vivo V21e सादर करण्यात आले आहेत. भारतात फक्त वीवो वी21 5G सादर केला गेला आहे. जर वीवो वी21 5जी फोनची खासियत पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. (Vivo V21 5G launched in India check price specifications and features)

Vivo V21 5G लुक आणि डिस्प्ले

वीवोचा लेटेस्ट Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार स्लीक आणि कटिंग एज डिजाइनसह सादर केला गेला आहे. हा वीवोचा सर्वात पातळ 5G स्मार्टफोन आहे. वीवोच्या या फोनची जाडी फक्त 7.29mm आहे. बॅक पॅनलबद्दल बोलायचे तर हा वेगवेगळ्या कलर फिनिशसह सादर केला गेला आहे. ज्यात मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात तीन कॅमेरा सेंसर आणि एक LED फ्लॅश देण्यात आला आहे. फोन स्लीक असल्यामुळे या फोनचा कॅमेरा बंप थोडा जास्त दिसतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये वाटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. वीवोच्या या फोनमध्ये 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच डिस्प्लेचा रिजोल्यूशन 1080p आहे. या फोनमध्ये सॅमसंगचा E3 इमिसिव डिस्प्ले देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

Vivo V21 5G चा फोटो

Vivo V21 5G परफॉर्मन्स

Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. वीवोने हा स्मार्टफोन 11GB पर्यंतच्या रॅमसह सादर केला आहे, ज्यात 8GB ऑरिजन RAM आणि 3GB एक्सटेंड RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 128GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जसह सादर केला गेला आहे. वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो.

Vivo V21 5G कॅमेरा

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo V21 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP OIS आहे, तसेच 8MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 44 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन) आणि डुअल LED फ्रंट फ्लॅशसह येतो. म्हणजे या स्मार्टफोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरा सेंसरमध्ये OIS सपोर्ट मिळतो.

हे देखील वाचा : Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा

Vivo V21 5G किंमत

Vivo V21 5G स्मार्टफोन भारतात सिंगल वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. हा फोन भारतात 8+3GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 29,990 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत सादर केला गेला आहे. या फोनचा 256GB वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. वीवोचा हा स्मार्टफोन ऑनलाइन Vivo च्या वेबसाइट आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरु होईल. ऑफर पाहता HDFC कार्डने पेमेंट केल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. वीवोचा हा फोन तीन कलर Sunset Dazzle, Dusk Blue आणि Arctic White मध्ये सादर केला गेला आहे.

The post Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v21-5g-launched-in-india-check-price-specifications-and-features/feed/ 0
44MP सेल्फी कॅमेरा आणि स्लिम डिजाइनसह लॉन्च झाली Vivo V21 सीरीज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/vivo-v21-5g-and-vivo-v21e-launched-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v21-5g-and-vivo-v21e-launched-check-price-specifications/#respond Wed, 28 Apr 2021 13:42:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10747 Vivo V21 सीरीजच्या स्मार्टफोन स्लिम डिजाइनसह सादर केले आहेत. या फोनची जड 7.29mm आहे. वीवोने Vivo V21 5G स्मार्टफोन मीडियाटेक के प्रोसेसरसह लॉन्च केला आहे. तर Vivo V21e स्मार्टफोन Snapdragon चिपसेटसह सादर केला गेला आहे. इथे आम्ही तुम्हाला Vivo V21 5G आणि Vivo V21e दोन्ही स्मार्टफोन्सबाबत सविस्तर सांगत आहोत.

The post 44MP सेल्फी कॅमेरा आणि स्लिम डिजाइनसह लॉन्च झाली Vivo V21 सीरीज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आपली V-series वाढवत Vivo V21 सीरीजचे तीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवोने या सीरीजचे तीन स्मार्टफोन Vivo V21, Vivo V21 5G आणि Vivo V21e तीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. वीवोने सध्या V21 सीरीज मलेशियामध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने मलेशियामध्ये फक्त Vivo V21 5G आणि Vivo V21e दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Vivo V21 आणि Vivo V21 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जास्त फरक नाही. Vivo V21 सीरीजच्या स्मार्टफोन स्लिम डिजाइनसह सादर केले आहेत. या फोनची जड 7.29mm आहे. वीवोने Vivo V21 5G स्मार्टफोन मीडियाटेक के प्रोसेसरसह लॉन्च केला आहे. तर Vivo V21e स्मार्टफोन Snapdragon चिपसेटसह सादर केला गेला आहे. इथे आम्ही तुम्हाला Vivo V21 5G आणि Vivo V21e दोन्ही स्मार्टफोन्सबाबत सविस्तर सांगत आहोत. (Vivo V21 5G and Vivo V21e launched check price specifications)

Vivo V21 5G : स्पेसिफिकेशन्स

Vivo V21 आणि Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे, जो HDR 10+ सपोर्ट आणि SGS डिस्प्ले सर्टिफिकेशनसह येतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 500 निट्स आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच आहे. वीवोच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 44MP OIS कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात डुअल सेल्फी LED फ्लॅश पण दिला आहे.

Vivo V21e चा फोटो

Vivo V21 5G

Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek 800U SoC दिला आहे जो 8GB RAM + 3GB एक्सटेंड RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह येतो. वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 33W फ्लॅश चार्जसह सादर केला गेला आहे. वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये प्राइमेरी कॅमेरा 64MP OIS चा आहे, सोबत 8MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy M42 झाला लॉन्च, जाणून घ्या या फोनबाबत सर्वकाही

Vivo V21e स्पेसिफिकेशन्स

Vivo V21e स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले मिळत आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 570 निट्स आहे जो HDR 10 ला सपोर्ट करतो. वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 720G SoC सह येतो जो 8GB RAM + 3GB एक्सटेंड RAMला सपोर्ट करतो. वीवोच्या या फोनमध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे जी 1TB पर्यंत वाढवता येईल. Vivo V21e स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्ज दिला आहे.

Vivo V21e स्मार्टफोनमध्ये पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP AI आहे, ज्यांच्यासोबत 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेरा सेंसरसह LED फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये 44MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

हे देखील वाचा : COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी

Vivo V21 5G आणि Vivo V21e : किंमत

Vivo V21 5G स्मार्टफोन मलेशियामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 1,599 RM (जवळपास 29,000 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. Vivo V21 5G स्मार्टफोन सनसेट डेजल आणि डस्क ब्लू कलर वेरिएंटमध्ये सादर केला आहे.

Vivo V21e स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह मलेशियामध्ये 1,299 RM (जवळपास 23,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. वीवोचा हा स्मार्टफोन डायमंड फ्लेयर आणि रोमन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे.

The post 44MP सेल्फी कॅमेरा आणि स्लिम डिजाइनसह लॉन्च झाली Vivo V21 सीरीज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v21-5g-and-vivo-v21e-launched-check-price-specifications/feed/ 0