ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सध्या Big Saving Days सेल सुरु आहे. 23 जुलैला सुरु झालेल्या या सेलची सांगता 27 जुलैला होईल. तोपर्यंत फ्लिपकार्टवरील या सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम्स आणि अॅक्सेसरीज धमाकेदार डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. तुम्ही जर एखादा शानदार सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधात असाल तर तुम्ही Vivo च्या या हँडसेटची निवड करू शकता, ज्यावर दमदार डिस्काउंट देखील मिळत आहे. 44MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V21 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवरील सेमध्ये 11,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.
Vivo V21 5G वरील ऑफर
Vivo V21 5G स्मार्टफोनची रिटेल बॉक्सवरील किंमत 32,990 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर सेलमध्ये हा हँडसेट 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विवोचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 27,990 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. परंतु Vivo V21 5G स्मार्टफोनची खरेदी डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं केल्यास 2000 रुपयांची सूट मिळेल.

हे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड HDFC बँकेचं असल्यास तुम्हाला 4000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. तर Axis बँकेच्या कार्ड धारकांना 10 टक्के (मॅक्सिमम 3000 रुपये) पर्यंतचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे HDFC च्या कार्डनं पेमेंट केल्यास तुम्ही हा सेल्फी सेंट्रिक फोन फक्त 21,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
Vivo V21 5G Price in India
Vivo V21 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्टवर 27,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या हायएंड मॉडेल 30,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. विवोचा हा फोन सनसेट डॅझल आणि डस्क ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.
Vivo V21 5G Specifications
Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये 6.44-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सोबतीला ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC3 GPU मिळतो. फोन Android 11 आधारित Funtouch OS 11.1 UI वर चालतो.
मिड रेंज Vivo V21 5G स्मार्टफोनची फ्रंट फेसिंग कॅमेरा ही खासियत आहे. या फोनमध्ये 44MP चा सेल्फी कॅमेरा आहे मिळतो ऑटोफोकस आणि OIS ला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे फ्रंटला दोन LED फ्लॅश देखील आहेत. हा सेल्फी कॅमेरा 4K/30fps व्हिडीओ देखील शूट करू शकतो. Vivo V21 5G च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे.
Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फक्त 30 मिनिटांत 63 टक्के चार्ज होतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-SIM 5G, ड्युअल-बँड Wi-Fi ac, Bluetooth v5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.
















