Vivo X50 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 13:28:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-v19-price-cut-by-up-to-rs-5000/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-v19-price-cut-by-up-to-rs-5000/#respond Fri, 05 Feb 2021 11:48:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9905 कंपनीने Vivo X50 ची किंमत 5,000 रुपये आणि Vivo V19 स्मार्टफोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली आहे.

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आपल्या ग्राहकांना भेट देत 2 पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने Vivo X50 आणि Vivo V19 स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. नवीन किंमतीत सध्या फोन ऑफलाइन स्टोर्सवर विकत घेता येईल. टेक वेबसाइट MySmartPrice ने आपल्या रिपोर्ट मध्ये हि माहिती दिली आहे. कंपनीच्या ऑफिशियल साइटवर दोन्ही फोन आपल्या जुन्या किंमतीत विक्री केले जात आहेत. रिपोर्टनुसार कंपनीने Vivo X50 ची किंमत 5,000 रुपये आणि Vivo V19 स्मार्टफोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली आहे.

नवीन प्राइस

5000 रुपयांच्या कपातीनंतर वीवो एक्स50 29,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. प्राइस कटच्या आधी फोन 34,990 रुपयांमध्ये विकला जात होता. हि किंमत फोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची आहे. तर 8GB RAM + 256GB वेरिएंट आता 32,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB रॅम + 256GB वेरिएंट 37,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. दुसरीकडे Vivo V19 के 8GB RAM + 128GB वेरिएंट 21,990 रुपये आणि 8GB RAM + 256GB वेरिएंट 24,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा

Vivo X50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X50 मध्ये 6.56-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो पंच-होल कटआउट आणि 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच X50 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसरची ताकद आहे. स्मार्टफोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 13-मेगापिक्सल पोर्ट्रेट कॅमेरा, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Vivo X50 मध्ये 4,200mAh ची बॅटरी 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्टसह मिळते.

Vivo V19

Vivo V19 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.44 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 10 वर बेस्ड FunTouch ऑपरेटिंग सिस्टम पण आहे. फोनच्या मागे 4 कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात 48 मेगापिक्सलचा मेन सेंसर, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. तर, फ्रंटला 32 मेगापिक्सलचा मेन आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9

पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. तसेच फोन अँड्रॉइड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाय-फाय 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट आहे.

वीवो एक्स50 व्हिडीओ

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-v19-price-cut-by-up-to-rs-5000/feed/ 0
सुंदर डिजाइन आणि अनोख्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाले Vivo X50 आणि X50 Pro 5G, मिळेल का Xiaomi ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-series-launch-in-india-with-48mp-camera-up-to-4000mah-battery-know-price-specifications-sale-amazon-india-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-series-launch-in-india-with-48mp-camera-up-to-4000mah-battery-know-price-specifications-sale-amazon-india-flipkart/#respond Thu, 16 Jul 2020 11:02:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7657 Vivo X50 आणि X50 Pro मध्ये 6.56-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे

The post सुंदर डिजाइन आणि अनोख्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाले Vivo X50 आणि X50 Pro 5G, मिळेल का Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo X50 आणि Vivo X50 Pro आज भारतात एका डिजिटल इवेंटच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आले आहेत. वीवो एक्स50 स्मार्टफोन सीरीज जूनच्या सुरवातीला चीन मध्ये लॉन्च केला गेला होता. चीन मध्ये या सीरीज अंतर्गत Vivo X50 आणि Vivo X50 Pro सोबत Vivo X50 Pro+ पण सादर केले गेले होते. भारतात फक्त वीवो एक्स50 आणि वीवो एक्स50 प्रो मॉडेल लॉन्च केले गेले आहेत. दोन्ही मॉडेल 5जी आणि काही खास फीचर्स सह येतात, ज्यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरचा समावेश आहे.

डिजाइन

डिजाइनच्या बाबतीत दोन्ही फोनचा फ्रंट लुक एक सारखा आहे. पण मागे असलेला कॅमेरा सेटअप वेगवेगळा आहे. वीवो एक्स 50 सीरीजचा फ्रंट लुक पाहता यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. Vivo X50 सीरीजच्या स्क्रीन वर डावीकडे तुम्हाला हा पंच-होल मिळेल, ज्यात फ्रंट कॅमेरा असेल. होल-पंच स्क्रीन असल्यामुळे फोनच्या वर आणि दोन्ही बाजूंना बेजल्स नगण्य आहेत. तर डिवाइसच्या बॉटमला बारीक बेजल आहे.

तसेच डिवाइसच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. वीवो एक्स50 च्या मागची डिजाइन पाहता यात वर्टिकल शेप कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एका रांगेत तीन कॅमेरा सेंसर आणि त्याखाली सेंसर देण्यात आला आहे. तसेच वीवो एक्स50 प्रो मध्ये थोडा मोठा वर्टिकल शेप कॅमेरा सेटअप आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वर एक मोठ्या आकाराचा सेंसर देण्यात आला आहे. त्याखाली दोन सेंसर आहेत. त्रिकोणी आकाराच्या कॅमेरा सेंसर नंतर खाली चौथा सेंसर आहे.

Vivo X50 आणि X50 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X50 आणि X50 Pro मध्ये 6.56-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो पंच-होल कटआउट आणि 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच Pro मॉडेल HDR10+ ला सपोर्ट करतो. दोन्ही फोन्सची डिस्प्ले पिक्सल डेंसिटी 398 पीपीआई आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92.8 टक्के आहे. Vivo X50 Pro मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे, जो एड्रेनो 620 जीपीयू आणि 8 जीबी रॅम व 256जीबी ला सपोर्ट करतो. तसेच X50 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर सह 8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज देण्यात आली आहे.

Vivo X50 आणि X50 Pro चा कॅमेरा

दोन्ही स्मार्टफोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. वीवो एक्स50 बद्दल बोलायचे तर यात 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 13-मेगापिक्सल पोर्ट्रेट कॅमेरा, 8-मेगापिक्सेल वाइड-अँगल कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच एक्स50 प्रो मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 13-मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर आणि 8-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच दोन्ही फोनच्या मागच्या कॅमेऱ्यात 20x डिजिटल झूम, फोर-एक्सिस ओआईएस, ईआईएस आणि काही इतर आकर्षक फीचर्स पण आहेत. Vivo X50 आणि Vivo X50 Pro च्या फ्रंटला 32-मेगापिक्सल होल-पंच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Gimble कॅमेरा सिस्टम

दुसरीकडे Vivo X50 Pro मध्ये हॅन्डहेल्ड वीडियो फुटेज मध्ये शेक कमी करण्यासाठी गिम्बल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. वीडियो शूट करताना गिम्बल राडा नावाचा एक ऑन-स्क्रीन ऍनिमेटेड बॉल यूजर्सना स्क्रीन मध्ये दिसेल कि गिम्बलचा स्पीड किती आहे आणि फ्रेम कधी स्थिर आहे. फोनचा कॅमेरा डोळ्याप्रमाणे चारही बाजूनं फिरू शकतो, ज्याच्या मदतीने स्टेबल इमेज आणि विडियो आउटपुट मिळेल.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

दोन्ही फोन मध्ये बॅटरी वेगवेगळी देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी Vivo X50 मध्ये 4,200mAh ची बॅटरी आणि X50 Pro मध्ये 4,315mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पण दोन्ही फोन्सची बॅटरी 33W फास्ट-चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन्स मध्ये एनएसए 5जी, वाई-फाई, ब्लूटूथ v5.1, यूएसबी टाइप-सी आणि इतर काही फीचर्स आहेत. तसेच दोन्ही फोन इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर सह येतात.

किंमत

Vivo X50 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,990 रुपये आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,990 रुपये आहे. तर Vivo X50 Pro च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे. तसेच फोन विक्रीसाठी 24 जुलै पासून फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, क्रोमा, रिलायंस डिजिटल आणि इत्यादी ऑनलाइन स्टोर्स वर येईल. तसेच डिवाइसची प्री-बुकिंग आज पासून सुरु होईल.

The post सुंदर डिजाइन आणि अनोख्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाले Vivo X50 आणि X50 Pro 5G, मिळेल का Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-series-launch-in-india-with-48mp-camera-up-to-4000mah-battery-know-price-specifications-sale-amazon-india-flipkart/feed/ 0