Vivo च्या S-सीरीजचा आगामी फोन एस9 काही दिवसांपूर्वी गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये दिसला होता. आता या फोनची अजून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नवीन रिपोर्टनुसार स्मार्टफोन 6 मार्चला कंपनीच्या गृह मार्केट चीन मध्ये लॉन्च होऊ शकतो. हा रिपोर्ट फेमस टिप्सटरने चीनी माइक्रो ब्लॉगिंग साइट वीबो वर शेयर केला आहे. लॉन्च डेट व्यतिरिक्त टिप्सटरने फोनच्या काही स्पेसिफिकेशनची माहिती पण दिली आहे. जर हे स्पेसिफिकेशन्स खरे ठरले तर Vivo S9 पहिला असा फोन असेल जो मीडियाटेक डायमेंसिटी 1100 प्रोसेसरसह लॉन्च होईल.
Pseudonym Arsenal नावाच्या टिपस्टरने चीनी माइक्रो ब्लॉगिंग साइट वीबोवर सांगितले आहे कि वीवो एस9 फोन 6 मार्चला लॉन्च केला जाईल. बोलले जात आहे कि हा फोन लॉन्च झालेल्या Vivo S7 चा अपग्रेडेड वर्जन असेल. पण सध्या Vivo S9 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशनबद्दल कंपनीने कोणतीही घोषणा केली नाही. दुसरीकडे Abhishek Yadav ने ट्विटरवर वीवो एस9 च्या स्पेसिफिकेशन्ससह फोनचे रेंडर पण शेयर केले आहेत. ज्यातून डिवाइसच्या लुकची माहिती पण मिळाली आहे.
हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी
Vivo S9 launching on march 6 in China.
-Dimensity 1100?
-12GB Ram?
-Android 11 with origin OS ?
-6.4 inch notch display
-44MP front dual camera#VivoS9 #Vivo https://t.co/uefjY5AzjV pic.twitter.com/CUIy08Ajzk— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 2, 2021
Vivo S9 ची डिजाइन
रेंडर मध्ये फोनचा फ्रंट लुक दाखवण्यात आला आहे. फोटोनुसार डिवाइसच्या वरच्या बाजूला मोठी नॉच मिळेल, ज्यात डुअल कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप व्यतिरिक्त फोनच्या तिन्ही कडा बेजललेस असतील. तर बॉटमला थोडा रुंद चिन पार्ट दिसेल.
हे देखील वाचा : Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल
Vivo S9 चे स्पेसिफिकेशन्स
समोर आलेल्या माहितीनुसार वीवो एस9 मध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. तसेच गेल्या आठवड्यात लॉन्च झालेला अगदी नवीन मीडियाटेक डायमेंसिटी 1100 प्रोसेसर फोन मध्ये दिला जाऊ शकतो. प्रोसेसर 5जी सपोर्टसह येतो. अलीकडेच फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये पण दिसला होता. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 ओएस वर काम करेल.
दुसरीकडे टिप्सटरने असा पण दावा केला आहे कि फोन मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात फोनचा प्राइमरी कॅमेरा अल्ट्रा-वाइड लेंससह 44 मेगापिक्सलचा असू शकतो. दुसऱ्या कॅमेऱ्यांची माहिती अजूनतरी समोर आली नाही.
वर सांगितल्याप्रमाणे वीवो एस9 बाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही त्यामुळे हि माहिती फक्त अफवा पण असू शकते. अधिकृत विधान येईस्तोवर काही निश्चित सांगता येणार नाही.














