Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा

Vivo ने गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये टेक मंचावर आपली ‘एस सीरीज’ वाढवत Vivo S7 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. 5जी कनेक्टिविटी सोबतच हा फोन 44एमपी डुअल सेल्फी कॅमेरा, 64एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो. आज या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडत कंपनीने vivo S7t लॉन्च केला आहे. 5G ला सपोर्ट करणारा वीवो एस7टी पण सध्या चीनी बाजारात सादर केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत दुसऱ्या मार्केट्स मध्ये पण येईल.

कॅमेऱ्याची कमाल

Vivo S7t 5G स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत कॅमेरा सेग्मेंट असल्याचे बोलले जात आहे. हा मोबाईल फोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 44 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जी एक अल्ट्रा क्लियर लेंस आहे. तसेच हा फोन एफ/2.28 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वायड अँगल लेंसला सपोर्ट करतो.

वीवो एस7टी च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जी एक अल्ट्राएचडी लेंस आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या ब्लॅक अँड व्हाईट सेंसरला सपोर्ट करतो.

Vivo S7t 5G

फोनचे इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वीवो एस7टी 5जी 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या चारही कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला जुन्या स्टाईलची रुंद नॉच देण्यात आली आहे. या नॉच मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप आहे. वीवोचा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9

Vivo S7t लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो ओरिजन ओएस 1.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर टेक्नोलॉजी वर बनलेला मीडियाटेक डायमनसिटी 820 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5Gला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी वीवो एस7टी मध्ये एआरएम एमसी5 जीपीयू देण्यात आला आहे.

वीवो एस7टी डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5G (SA/NSA) सह 4जी वोएलटीईला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी Vivo S7t मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन हा फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत CNY 2,598 म्हणजे जवळपास 29,000 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here