Vivo Y12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 12 Nov 2019 11:50:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/#respond Tue, 12 Nov 2019 11:50:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5749 आईसीआईसीआई तथा एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांना फोनच्या खरेदीवर डिस्काउंट पण मिळेल. Vivo चा हा सेल 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.

The post VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी VIVO ने वर्ष 2014 मध्ये भारतीय बाजारात पाऊल ठेवले होते. या वर्षी कंपनी भारतात आपले 5 वर्ष पूर्ण करत आहे. या 5 वर्षात VIVO ने वेगवेगळ्या बजेट मध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे लोकांना आवडले आहे. VIVO ने वेळोवेळी भारतात आपली एडवांस टेक्नॉलॉजी पण दाखवली आहे आणि यात पॉप-अप कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, डुअल पॉप-अप आणि पंच-होल डिस्प्ले यांचा पण समावेश आहे. VIVO 5 वर्षांचे यश साजरे करत आहे आणि आपल्या फॅन्स सोबत हा आनंद वाटत कंपनीने सेलचे आयोजन केले आहे.

अश्या आहेत ऑफर

आपल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने वीवो ने Vivo Z1x चा नवीन वेरिएंट पण भारतात लॉन्च केला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. कंपनीने हा नवीन फोन वेरिएंट 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच डिस्काउंट ऑफर पाहता Vivo Z1x च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी वेरिएंटची किंमत 16,990 रुपये तर 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 18,990 रुपये आहे. पण सेल मध्ये फोनचा 64 जीबी मेमरी वेरिएंट 15,990 रुपये आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo चा स्वस्त स्मार्टफोन Vivo U10 या सेल मध्ये अजून स्वस्त मिळत आहे. फोनचा 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 9,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 10,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Vivo U10 चा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट सेल मध्ये फक्त 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

एक्स्ट्रा बेनिफिट

डिस्काउंट सोबत Vivo शॉपिंग साइट अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वीवो डॉट कॉम वरून ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक पण देत आहे. जर ग्राहकांनी फोन विकत घेताना प्रीपेड पेयमेन्ट केले तर फोनच्या किंमतीती अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल. Vivo Z1 Pro आणि Vivo Z1x च्या खरेदीवर कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे जो प्रीपेड पेमेंट करताना मिळेल. त्याचप्रमाणे Vivo U10 च्या खरेदीवर प्रीपेड पेमेंट मध्ये 500 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल.

हे देखील वाचा: 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला 4500एमएएच बॅटरी आणि 32 एमपी सेल्फी कॅमेरा असलेला Vivo Z1x

Vivo Vivo V17 Pro तसेच Vivo V15 Pro च्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 1,000 रुपयांची सूट देत आहे. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo S1 स्मार्टफोन विकत घेतल्यास 700 रुपयांचा फायदा होईल. Vivo कडून एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo Y17, Vivo Y15 आणि Vivo Y12 स्मार्टफोन विकत घेतल्यास 500 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळत आहे.

3,000 रुपयांचे हेडफोन पण फ्री

Vivo आपले फोन स्वस्तात विकत पण आहे आणि एक्सचेंज अंतर्गत अतिरिक्त डिस्काउंट पण देत आहे. पण सोबतच वीवो एक्सचेंज ऑफर अंतर्गत ब्लूटूथ हेडफोन पण फ्री मध्ये देत आहे. म्हणजे जुन्या फोनच्या बदल्यात नवीन फोन विकत घेतल्यास Vivo कडून फ्री हेडफोन पण मिळत आहेत. Vivo V17 Pro तसेच Vivo V15 Pro एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास कंपनी कडून से 2999 रुपयांचे ब्लूटूथ हेडफोन फ्री मिळतील आणि सोबत 1000 रुपयांचा डिस्काउंट पण मिळेल.

हे देखील वाचा: 4920एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह लिस्ट झाला Vivo Z5i, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

तसेच Vivo V15 आणि Vivo S1 च्या खरेदीवर कंपनी 1,999 रुपयांचे हेडफोन आणि 700 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo Y17, Vivo Y15 आणि Vivo Y12 स्मार्टफोन विकत घेतल्यास 500 रुपयांच्या डिस्काउंट सोबत 999 रुपयांचे हेडफोन पण मिळतील. विशेष म्हणजे आईसीआईसीआई तथा एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांना फोनच्या खरेदीवर डिस्काउंट पण मिळेल. Vivo चा हा सेल 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.

The post VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Y12, किंमत फक्त 11,990 https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12-3gb-ram-64gb-storage-variant-launched-in-india-rs-11990-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12-3gb-ram-64gb-storage-variant-launched-in-india-rs-11990-price/#respond Mon, 01 Jul 2019 10:16:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4699 4जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल

The post 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Y12, किंमत फक्त 11,990 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्याच महिन्यात भारतीय मोबाईल बाजारात आपली वाय स्मार्टफोन सीरीज वाढवत Vivo Y12 लॉन्च केला होता. कंपनीने हा फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये उतरवला होता जो ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहे. Vivo ने भारतात Y12 एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला होता जो 4जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो पण आज कंपनीने Vivo Y12चा अजून एक वेरिएंट सादर केला आहे.

Vivo ने Y12 स्मार्टफोन अजून एका नवीन वेरिएंट सह इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. Vivo Y12 च्या या नवीन वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo Y12 चा हा नवीन वेरिएंट कंपनी द्वारा 11,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे Vivo Y12 चा आधीच 4जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही वेरिएंट शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहेत.

Vivo Y12

वीवो वाय सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा नवीन स्मार्टफोन इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये सर्वात स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्स पॅकी एक आहे. सर्वात आधी फोनचा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच Vivo Y12 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तथा 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर आहे.

Vivo Y12 मध्ये सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता वॉटरड्रॉप नॉच वर सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. Vivo Y12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे हा फोन रिवर्स चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो ज्याने दुसऱ्या डिवाईसला पण चार्ज करता येते.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Y12, किंमत फक्त 11,990 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12-3gb-ram-64gb-storage-variant-launched-in-india-rs-11990-price/feed/ 0
एक्सक्लूसिव: 11,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल Vivo Y12, यात आहे ट्रिपल कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch-2/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch-2/#respond Mon, 03 Jun 2019 13:21:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4488 हा फोन 12,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post एक्सक्लूसिव: 11,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल Vivo Y12, यात आहे ट्रिपल कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात सर्वात आधी 91मोबाईल्स ने बातमी दिली होती कि Vivo लवकरच भारतात आपल्या नवीन वाय सीरीजचा फोन सादर करू शकते आणि त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने Y17 आणला. त्यानंतर आम्ही माहिती दिली होती कि लवकरच Vivo Y15 आणि Y12 लॉन्च होणार आहे आणि कंपनीने काही दिवसांनीच हे फोन्स पण सादर केले आहेत. Y15 सेल साठी उपलब्ध झाला पण Vivo Y12 च्या प्राइस आणि उपलब्धतेबद्दल कंपनीने आता पर्यंत काही सांगितले नाही. पण आज 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

आम्हाला हि माहिती Vivo मोबाईल फोनच्या डीलर्स कडून मिळाली आहे ज्यांनी सांगितले कि Vivo Y12 ची किंमत 11,990 रुपयांपासून सुरु होईल आणि या आठवड्यात हा फोन सेल साठी ऑफलाइन रिटेल स्टोर वर उपलब्ध होईल.

Vivo Y12 के स्पेसिफिकेशन आधीच समोर आले आहेत. भारतीय बाजारात हा फोन दोन मॉडेल मध्ये उपलब्ध होईल. एक मॉडेल 4GB रॅम सह उपलब्ध होईल आणि यात तुम्हाला 32GB ची मेमरी मिळेल. याची किंमत 11,990 रुपये असेल. तर दुसरा मॉडेल 3GB रॅम सह 64GB मेमरी सह येईल आणि हा फोन 12,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोनचे इतर स्पेसिफिकेशन पाहता यात 6.35-इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. तसेच कंपनीने यात वाटर ड्रॉप नॉच दिली आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाला मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये 2.0 गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याच्या बाबतीत हा खूप खास आहे. Vivo Y12 मध्ये पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मेन सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी देण्यात आला आहे. तीसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. सेल्फी साठी कंपनीने यात 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाय सीरीजच्या दुसऱ्या फोन प्रमाणे यात पण तुम्हाला मोठी बॅटरी मिळेल. यात 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही पण रिवर्स चार्जिंग आहे ज्यात तुम्ही या फोनने दुसरा डिवाइस चार्ज करू शकाल. फोन मध्ये डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे.

The post एक्सक्लूसिव: 11,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल Vivo Y12, यात आहे ट्रिपल कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch-2/feed/ 0
एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch/#respond Fri, 24 May 2019 11:42:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4386 हा आगामी स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेट लॉन्च करेल

The post एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने Vivo Y सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या आगामी स्मार्टफोन Vivo Y15 बद्दल आधीपण एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. आम्हीच सर्वात आधी सांगितले होते कि वीवो भारतात आपली वी सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Vivo Y15 आणि Vivo Y12 लॉन्च करेल. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि किंमतीची माहिती पण दिली आहे. कंपनीने अजूनही आपल्या आगामी स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितलेली नाही, पण फोन बाजारात येण्याआधीच आज आम्ही Vivo Y15 चा फोटो आणि याचे फुल स्पेसिफिकेशन्स घेऊन आलो आहोत.

लुक व डिजाईन
सर्वात आधी Vivo Y15 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन ट्रेंड मधील वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वरच लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या वर ‘वी’ शेप नॉच दिली जाईल आणि याच नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. Vivo Y15 चे तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर दिले जातील जे डावीकडे असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश पण दिली जाईल. Vivo Y15 च्या बॅक पॅनल वरच फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर असेल. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजवीकडील पॅनल वर असतील फोनच्या डाव्या पॅनल वर सिम ट्रे दिली जाईल. तसेच Vivo Y15 च्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि स्पीकर असतील.

शानदार कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y15 ट्रिपर रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. वीवोचा हा फोन इतक्याच अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलच्या दुसऱ्या सेंसरला सपोर्ट करेल. त्याचबरोबर सेल्फी साठी Vivo Y15 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

स्पेसिफिकेशन्स
Vivo Y15 कंपनी द्वारा 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के असेल. हा फोन 720 X 1544 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.35-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्याच्या प्रोटेक्शन साठी ग्लास कोटिंग केली जाईल. कंपनी Vivo Y15 एंडरॉयड 9.0 आधारित फनटच ओएस 9 वर सादर करेल जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालेल. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन 4जीबी रॅम वर लॉन्च होईल तसेच यात 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

Vivo Y15 डुअल सिम तसेच 4जी वोएलटीई सपोर्ट सह बाजारात येईल. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Vivo Y15 मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी दिली जाईल. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार Vivo Y15 एक्वा ब्लू आणि रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर आशा आहे कि वीवो आपला हा आगामी स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेट लॉन्च करेल. अशा आहे​ कि आगामी आठवड्यातच Vivo Y15 इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.

The post एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch/feed/ 0
एक्सक्लूसिव: लवकरच लॉन्च होतील Vivo Y15 आणि Y12, 5,000 एमएएच बॅटरी सह असेल ​ट्रिपल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-y15-and-y12-going-launch-in-india-soon-with-triple-camera-and-5000-mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y15-and-y12-going-launch-in-india-soon-with-triple-camera-and-5000-mah-battery/#respond Mon, 20 May 2019 12:20:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4338 संपूर्ण स्पेसिफिकेशनची माहिती पण मिळाली आहे.

The post एक्सक्लूसिव: लवकरच लॉन्च होतील Vivo Y15 आणि Y12, 5,000 एमएएच बॅटरी सह असेल ​ट्रिपल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एप्रिल मध्ये आम्ही माहिती दिली होती कि वीवो मे मध्ये Y17 मॉडेल सादर करणार आहे आणि या महिन्याच्या सुरवातीलाच कंपनीने हा मॉडेल भारतात सादर केला. गेल्याच आठवड्यात आम्ही माहिती दिली आहे कि लवकरच कंपनी Y15 आणि Y12 मॉडेल लॉन्च करणार आहे आणि आज याबाबत आमच्याकडे अजून खास माहिती आहे. आम्हाला फक्त वीवो Y15 आणि Y12 चे पोस्टर मिळाले नसून संपूर्ण स्पेसिफिकेशनची माहिती पण मिळाली आहे. 91मोबाईल्सला हि माहिती कंपनीच्या ऑफलाइन रिटेल स्टोर मधून मिळाली आहे.

स्पेसिफिकेशन पाहता आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार Vivo Y15 मध्ये तुम्हाला 6.35-इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. तसेच हा फोन पण कंपनी वाटर ड्रॉप नॉच ज्याला वीवो ने हॅलो नॉच चे नाव दिले आहे, सह सादर करू शकते. हा फोन 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या मीडियाटेक एमटी6762 चिपसेट जो हेलियो पी22 नावाने पण ओळखला जातो, वर उपलब्ध होऊ शकतो. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

आम्ही आधीच माहिती दिली होती कि Vivo कमी रेंज मध्ये आता ट्रिपल कॅमेरा वाला फोन लॉन्च करू शकते आणि या फोन मध्ये पण असेच काहीसे आहे. वीवो Y15 च्या बॅक पॅनल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कंपनीने वीवो Y17 प्रमाणे Vivo Y15 मध्ये पण मोठी बॅटरी दिली आहे. हा फोन 5,000 एमएएच बॅटरी सह उपलब्ध होईल. गेल्या आठवड्यात लॉन्च झालेल्या Y17 प्रमाणे यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही.

राहिला प्रश्न Vivo Y12 चा तर हा फोन Vivo Y15 चा छोटा वेरियंट आहे. काही गोष्टी सोडल्या तर फोनचे स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत. Vivo Y12 मध्ये पण तुम्हाला 6.35-इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. तसेच या फोन मध्ये वाइटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोन मध्ये प्रोसेसर पण Y15 सारखा आहे आणि जो 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 वर आधारित आहे.या फोन मध्ये मेमरीचा फरक आहे. कंपनी हा 3जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल सह घेऊन येईल.

कॅमेरा पाहता वीवो Y15 प्रमाणे Vivo Y12 मध्ये पण ​ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मेन सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी देण्यात आला आहे. ​तिसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. तसेच सेल्फी मध्ये फरक आहे. या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन 5,000 एमएएच च्या बॅटरी सह यईल पण यात फास्ट चार्जिंग नसेल.

भारतीय बाजारात वीवो Y15 ची किंमत 15,000 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच वीवो Y12 12,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हे फोन्स लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार आहेत.

The post एक्सक्लूसिव: लवकरच लॉन्च होतील Vivo Y15 आणि Y12, 5,000 एमएएच बॅटरी सह असेल ​ट्रिपल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y15-and-y12-going-launch-in-india-soon-with-triple-camera-and-5000-mah-battery/feed/ 0