एक्सक्लूसिव: 11,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल Vivo Y12, यात आहे ट्रिपल कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी

भारतात सर्वात आधी 91मोबाईल्स ने बातमी दिली होती कि Vivo लवकरच भारतात आपल्या नवीन वाय सीरीजचा फोन सादर करू शकते आणि त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने Y17 आणला. त्यानंतर आम्ही माहिती दिली होती कि लवकरच Vivo Y15 आणि Y12 लॉन्च होणार आहे आणि कंपनीने काही दिवसांनीच हे फोन्स पण सादर केले आहेत. Y15 सेल साठी उपलब्ध झाला पण Vivo Y12 च्या प्राइस आणि उपलब्धतेबद्दल कंपनीने आता पर्यंत काही सांगितले नाही. पण आज 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

आम्हाला हि माहिती Vivo मोबाईल फोनच्या डीलर्स कडून मिळाली आहे ज्यांनी सांगितले कि Vivo Y12 ची किंमत 11,990 रुपयांपासून सुरु होईल आणि या आठवड्यात हा फोन सेल साठी ऑफलाइन रिटेल स्टोर वर उपलब्ध होईल.

Vivo Y12 के स्पेसिफिकेशन आधीच समोर आले आहेत. भारतीय बाजारात हा फोन दोन मॉडेल मध्ये उपलब्ध होईल. एक मॉडेल 4GB रॅम सह उपलब्ध होईल आणि यात तुम्हाला 32GB ची मेमरी मिळेल. याची किंमत 11,990 रुपये असेल. तर दुसरा मॉडेल 3GB रॅम सह 64GB मेमरी सह येईल आणि हा फोन 12,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोनचे इतर स्पेसिफिकेशन पाहता यात 6.35-इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. तसेच कंपनीने यात वाटर ड्रॉप नॉच दिली आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाला मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये 2.0 गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याच्या बाबतीत हा खूप खास आहे. Vivo Y12 मध्ये पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मेन सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी देण्यात आला आहे. तीसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. सेल्फी साठी कंपनीने यात 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाय सीरीजच्या दुसऱ्या फोन प्रमाणे यात पण तुम्हाला मोठी बॅटरी मिळेल. यात 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही पण रिवर्स चार्जिंग आहे ज्यात तुम्ही या फोनने दुसरा डिवाइस चार्ज करू शकाल. फोन मध्ये डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here