Vivo ने गेल्याच महिन्यात भारतीय मोबाईल बाजारात आपली वाय स्मार्टफोन सीरीज वाढवत Vivo Y12 लॉन्च केला होता. कंपनीने हा फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये उतरवला होता जो ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहे. Vivo ने भारतात Y12 एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला होता जो 4जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो पण आज कंपनीने Vivo Y12चा अजून एक वेरिएंट सादर केला आहे.
Vivo ने Y12 स्मार्टफोन अजून एका नवीन वेरिएंट सह इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. Vivo Y12 च्या या नवीन वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo Y12 चा हा नवीन वेरिएंट कंपनी द्वारा 11,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे Vivo Y12 चा आधीच 4जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही वेरिएंट शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहेत.
Vivo Y12
वीवो वाय सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा नवीन स्मार्टफोन इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये सर्वात स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्स पॅकी एक आहे. सर्वात आधी फोनचा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच Vivo Y12 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तथा 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर आहे.
Vivo Y12 मध्ये सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता वॉटरड्रॉप नॉच वर सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. Vivo Y12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे हा फोन रिवर्स चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो ज्याने दुसऱ्या डिवाईसला पण चार्ज करता येते.















