Vivo Z1 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Dec 2019 12:34:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/#respond Wed, 18 Dec 2019 12:34:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6074 या सेल अंतर्गत Vivo ब्रँडच्या सर्व स्मार्टफोन 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआई वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
क्रिसमस आणि न्यू ईयरच्या तयारीने बाजार सजला आहे. त्याचबरोबर सर्व स्मार्टफोन आणि टेक ब्रँड या संधीचा फायदा घेण्यासाठी नवीन व आर्कषक ऑफर घेऊन येत आहेत. यात स्मार्टफोन ब्रँड Vivo ने पण क्रिसमस कार्निवलची घोषणा केली आहे. Vivo Christmas Carnival आज म्हणजे 18 डिसेंबरला सुरु होऊन 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. या तीन दिवसीय फेस्टिवल सेलचे आयोजन कंपनीने फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर केले आहे आणि यूजर्स वीवोच्या अधिकृत वेबसाइट वरच सेल अंतर्गत मिळणाऱ्या शानदार ऑफर्स, डिस्काउंट आणि फ्री गिफ्ट मिळवू शकतील.

सर्वात आधी Vivo Z सीरीज बद्दल बोलायचे तर क्रिसमस कॉर्निवल अंतर्गत Vivo Z1 Pro वर कंपनी थेट 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. 13,990 रुपयांचा फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट डिस्काउंटनंतर 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच 14,990 रुपयांचा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये मिळेल. Vivo Z1 Pro चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट Vivo प्रीपेड पेमेंट वर 1,000 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे.

त्याचप्रमाणे Vivo Z1x चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट पण Vivo Christmas Carnival अंतर्गत 1,000 डिस्काउंट सह विकत घेता येईल, ज्यामुळे 15,990 रुपयांचा हा फोन 14,990 रुपयांमध्ये मिळेल. तर Vivo Z1x चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट प्रीपेड पेमेंट सह विकत घेतल्यास 1,000 चा ऑफ मिळत आहे.

Vivo U10 चा 3 जीबी रॅम वेरिएंट्स क्रिसमस कॉर्निवल अंतर्गत 500 रुपये डिस्काउंट सह विकत घेता येईल. सेल अंतर्गत 8,990 रुपयांचा Vivo U10 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच 9,490 रुपयांचा Vivo U10 चा 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर Vivo U10 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंटचे प्रीपेड पेमेंट केल्यास हा वेरिएंट थेट 1,000 स्वस्त मिळत आहे.

Vivo Christmas Carnival संबंधित अजून एक खास बाब अशी कि या सेल अंतर्गत Vivo Z1 Pro, Vivo Z1x आणि Vivo U20 स्मार्टफोन विकत घेतल्यास कंपनी कडून मोबाईल यूजर्सना एक Selfie Stick पण फ्री मिळत आहे. तर Vivo V17, Vivo V17 Pro, Vivo V15 Pro, Vivo S1 आणि Vivo Y19 च्या खरेदीवर एचडीएफसी आणि आईसीआईसीआई बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. या सेल अंतर्गत Vivo ब्रँडच्या सर्व स्मार्टफोन 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआई वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post Vivo Christmas Carnival सुरु, आर्कषक ऑफर्स आणि भरपूर डिस्काउंट सह Selfie Stick पण मिळत आहे फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-christmas-carnival-offers-discounts-cashback-free-selfie-stick-z1pro-z1x-u20-v17pro-u20/feed/ 0
Vivo Z1x भारतात झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1x-launched-in-india-48mp-triple-rear-camera-4500mah-battery-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1x-launched-in-india-48mp-triple-rear-camera-4500mah-battery-specs-price-sale-offer/#respond Fri, 06 Sep 2019 12:08:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5242 Vivo Z1x कंपनीने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये आणला आहे जो 13 सप्टेंबर पासून ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल

The post Vivo Z1x भारतात झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्या महिन्यात सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘Z series’ वाढवणार आहे आणि यात लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Vivo Z1x असेल. त्यानुसार आज वीवो ने अधिकृतपणे Vivo Z1x भारतात लॉन्च केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला Vivo Z1x कंपनीने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये आणला आहे जो 13 सप्टेंबर पासून ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. चला एक नजर टाकूया Vivo Z1x च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वर.

Vivo Z1x लुक

Vivo Z सीरीजचा पहिला फोन Vivo Z1 Pro पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला गेला होता तर Vivo Z1x कंपनीने वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘यू’ शेपची छोटीशी नॉच दिली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत पण खालच्या बाजूला बरीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo Z1x ग्लॉसी बॅक पॅनल वर बनलेला आहे जो याला ग्लॉसी लुक देतो. फोनच्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे.

Vivo Z1x च्या बॅक पॅनल वरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. Vivo Z1x च्या रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे वहीं बाएं पॅनल वर Vivo का पर्सनल असिस्टेंट बटण आहे. त्याचप्रमाणे फोनच्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक सोबतच यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.

पावरफुल कॅमेरा

Vivo Z1x कंपनीने रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन 8-मेगापिक्सलच्या एआई सुपर वाइड-अँगल आणि 2-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Vivo Z1x मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Z1x स्पेसिफिकेशन्स

Vivo Z1x कंपनीने 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि हा सेंसर 0.48 सेकंदात फोन अनलॉक करू शकतो. Vivo Z1x एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे.

Vivo Z1x कंपनीने 6जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो बाजारात 64जीबी स्टोरेज आणि 128जीबी मेमरी सह सेल साठी उपलब्ध होईल. Vivo Z1x एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी सोबतच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 22.5वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मध्ये 3 तासांचा टॉकटाईम देते. हा फोन फँटम पर्पल आणि फ्यूजन ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

Vivo Z1x किंमत

6जीबी रॅम + 64 जीबी मेमरी = 16,990 रुपये

6जीबी रॅम + 128 जीबी मेमरी = 18,990 रुपये

The post Vivo Z1x भारतात झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1x-launched-in-india-48mp-triple-rear-camera-4500mah-battery-specs-price-sale-offer/feed/ 0
Vivo Z1 Pro साठी बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-now-available-in-open-sale-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-now-available-in-open-sale-in-india/#respond Mon, 29 Jul 2019 07:42:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4909 वीवो झेड1 प्रो याच महिन्यात भारतीय बाजारात 14,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला होता.

The post Vivo Z1 Pro साठी बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो ने आता आपला नवीन स्मार्टफोन Vivo Z1 Pro ओपन सेल मध्ये उपलब्ध केला आहे. लॉन्च नंतर हा फोन कंपनी फ्लिपकार्ट आणि वीवो इंडिया ई-स्टोर वर फ्लॅश सेल द्वारे उपलब्ध करून देत होती.

याचा अर्थ असा कि Vivo Z1 Pro ग्राहक आता कधीही विकत घेऊ शकतात आणि त्यांना फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही. विशेष म्हणजे वीवो झेड1 प्रो याच महिन्यात भारतीय बाजारात 14,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला होता.

किंमत

फोनच्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंटची किंमत 14,990 रुपये, 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 16,990 रुपये आणि 6जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 17,990 रुपये आहे. डिवाइस मिरर ब्लॅक, सॉनिक ब्लू आणि सॉनिक ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो.

स्पेसिफिकेशन्स

Vivo Z1 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन SD712 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज व 6जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्रफी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा आहे जो AI फेस ब्यूटी फीचर सह येतो. त्याचबरोबर फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मागे एक 16एमपी एफ/1.78 प्राइमरी कॅमेरा व 8एमपी एफ/2.2 सेकंडरी शूटर सह 2एमपी एफ/2.4 चा तिसरा सेंसर आहे.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येते. तसेच कंपनीने हा फोन खासकरून तरुणांसाठी डिजाइन केला आहे आणि हा मल्टी-टास्किंग फीचर्स सह येतो. त्याचबरोबर शानदार गेमिंग एक्सपीरियंस साठी फोन मध्ये गेम टर्बो आणि कूलिंग टर्बो फीचर देण्यात आला आहे. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

वीवो झेड1 प्रो वीडियो

The post Vivo Z1 Pro साठी बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-now-available-in-open-sale-in-india/feed/ 0
Vivo Z1 Pro 14,990 – Redmi Note 7 Pro 13,999 = 991, बघा काय मिळाले आणि काय गमवावे लागते https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-redmi-note-7-pro-comparison-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-redmi-note-7-pro-comparison-price-specifications/#respond Fri, 05 Jul 2019 13:44:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4737 आम्ही दोन्ही स्मार्टफोन एक साथ वापरल्यानंतर हेच सांगितले आहे कि Redmi Note 7 Pro च्या तुलनेत लेटेस्ट Vivo Z1 Pro मध्ये काय मिळते आणि गमवावे लागते.

The post Vivo Z1 Pro 14,990 – Redmi Note 7 Pro 13,999 = 991, बघा काय मिळाले आणि काय गमवावे लागते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज भारतीय बाजरात नवीन दाव खेळाला आहे. वीवो ने देशात आपले स्मार्टफोन्स वाढवत नवीन डिवाईस Z1 Pro लॉन्च केला आहे. Vivo Z1 Pro भारतात लॉन्च झालेला वीवो चा पहिला स्मार्टफोन आहे जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo Z1 Pro मीड बजेट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो शानदार फीचर्स सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. या सेग्मेंट मध्ये Vivo Z1 Pro ची पहिली टक्कर Xiaomi च्या Note 7 Pro शी आहे. एकीकडे देशात Xiaomi ची फॅन फॉलोइंग दमदार आहे तर दुसरीकडे Vivo फोन आवडणारे लोक पण काही कमी नाहीत. Vivo Z1 Pro ची किंमत 14,990 रुपयांपासून सुरु होत आहे तर Redmi Note 7 Pro ची स्टार्टिंग प्राइस 13,999 रुपये आहे. त्यामुळे प्रश्न असा उद्भवतो कि Vivo फोन घ्यावा कि Xiaomi. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन एक साथ वापरल्यानंतर हेच सांगितले आहे कि Redmi Note 7 Pro च्या तुलनेत लेटेस्ट Vivo Z1 Pro मध्ये काय मिळते आणि गमवावे लागते.

लुक व डिजाईन

Vivo Z1 Pro कंपनीचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. Redmi Note 7 Pro वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला होता तर Vivo Z1 Pro ने मार्केट मधील सर्वात नवीन ट्रेंड सह एंट्री घेतली आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप सोबत रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Z1 Pro साईजच्या बाबतीत Note 7 Pro पेक्षा मोठा आहे.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro च्या रुंद डिस्प्ले मुळे वन-हँड वापर कठीण वाटू लागतो.

रियर फिंगरप्रिंट साठी हात जास्त ताणावा लागेल.

मिळते

पंच-होल डिस्प्ले Vivo Z1 Pro ला खास बनवतो.

फोनचा कलर ग्रेडिएंट मित्रांमध्ये दिखावा करण्याच्या कमी येतो.

फुलव्यू डिस्प्ले फोनला आकर्षक करतो.

डिस्प्ले

Vivo Z1 Pro कंपनी द्वारा 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तर Redmi Note 7 Pro याच रेज्ल्यूशन सह 6.3-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. शाओमीने फोन स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 कोटेड ठेवली तर वीवो जेड1 प्रो मध्ये प्रोटेक्शन नाही.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro मध्ये स्क्रीन प्रोटेक्शन नसणे मोठी कमतरता आहे.

मिळते

मोठा डिस्प्ले असलेल्या फोन मध्ये वीडियो व गेमिंग एक्सपीरियंस शानदार मिळतो.

……..

प्रोसेसर

Vivo Z1 Pro आणि Redmi Note 7 Pro दोन्ही फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केले गेले आहेत. Vivo Z1 Pro 10एनएम टेक्नॉलजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720 एआई चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे तर Redmi Note 7 Pro स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो जो 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनला आहे. हे दोन्ही फोन ग्राफिक्स साठी एड्रेनो 612जीपीयू ला सपोर्ट करतात.

गमवावे लागते

प्रोसेसिंगच्या बाबतीत Vivo Z1 Pro मध्ये गमवण्यासाठी काहीच नाही.

मिळते

Vivo Z1 Pro मध्ये Redmi Note 7 Pro पेक्षा लेटेस्ट चिपसेट मिळेल.

स्नॅपड्रॅगॉन 720 आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह प्रोसेसिंग अजून चांगली करतो.

……..

फोटोग्राफी

Vivo Z1 Pro ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो पण Redmi Note 7 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Z1 Pro मध्ये तुम्हाला एफ/1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा वाइड एंगल लेंस + एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळेल. तसेच Redmi Note 7 Pro मध्ये एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर + 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro चा प्राइमरी सेंसर Redmi Note 7 Pro पेक्षा छोटा वाटतो.

मिळते

ट्रिपल कॅमेरा सेटअप कोणत्याही सेंसरची मेगापिक्सल पावर कमी करत नाही.

Vivo Z1 Pro मध्ये वाइड एंगल लेंस पॅनोरमा व लँडस्केप शॉट्स शानदार बनवतो.

……..

सेल्फी

Vivo Z1 Pro मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे वहीं Redmi Note 7 Pro को 13-मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता.

गमवावे लागते

फक्त Pout करण्याची स्टाईल तुम्हाला शिकावी लागेल.

मिळते

32-एमपी फ्रंट कॅमेरा सेल्फी लवर्स साठी खूप काही घेऊन आला आहे.

बॅटरी

Vivo Z1 Pro कंपनीने 5,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच Redmi Note 7 Pro मध्ये क्वालकॉम क्विक चार्ज 4 टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गमवावे लागते

मोठ्या बॅटरीमुळे फोनचे वजन पण थोडे वाढते.

मिळते

5,000एमएएच ची पावर संपूर्ण दिवस चालते.

18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मुळे मिनिटांत फोन चार्ज होतो.

……..

वेरिएंट्स आणि प्राइस

Vivo Z1 Pro

4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 14,990 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 16,990 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 17,990 रुपये

Redmi Note 7 Pro

4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 13,999 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 15,999 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

सध्या शब्दात म्हणायचे तर इथे Vivo Z1 Pro विकत घेतल्यास गमवण्यासाठी फक्त 991 रुपये आहेत तर त्या बदल्यात आकर्षक लुक, शानदार सेल्फी, फास्ट प्रोसेसर आणि ताकदवान बॅटरी मिळते.

The post Vivo Z1 Pro 14,990 – Redmi Note 7 Pro 13,999 = 991, बघा काय मिळाले आणि काय गमवावे लागते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-redmi-note-7-pro-comparison-price-specifications/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo Z1 Pro https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-to-launch-in-india-32mp-in-display-camera-5000mah-battery-snapdragon-710-aie-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-to-launch-in-india-32mp-in-display-camera-5000mah-battery-snapdragon-710-aie-chipset/#respond Tue, 18 Jun 2019 08:49:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4590 पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात क्वालकॉम 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 AIE चिपसेट दिला जाईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo Z1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo भारतात आपली झेड स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर या सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Z1 Pro टीज करायला सुरवात केली आहे. जरी वीवो ने Vivo Z1 Pro ची लॉन्च डेट सांगितली नसली तरी अशी चर्चा आहे कि हा स्मार्टफोन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येईल. अजूनतरी Vivo Z1 Pro चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x चा इंडियन वर्जन असल्याचे बोलले जात होते, पण कंपनीने Vivo Z1 Pro चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स शेयर करत सांगितले आहे कि भारतात लॉन्च होणार हा Z series चा स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च झालेल्या फोन पेक्षा पण जास्त एडवांस आणि पावरफुल असेल.

Vivo India ने आपला ऑफिशियल सोशल मीडिया प्लॅटफार्म वर Vivo Z1 Pro च्या फोटो सोबत या फोनच्या कॅमेरा सेग्मेंट, बॅटरी आणि चिपसेटची माहिती पण दिली आहे. Vivo Z1 Pro फक्त भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला इन-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन असणार नाही तर Vivo Z1 Pro भारतीय स्मार्टफोन बाजारात येणारा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात क्वालकॉम 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 AIE चिपसेट दिला जाईल.

5,000एमएएच बॅटरी

Vivo Z1 Pro चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवत कंपनीने सांगितले आहे कि झेड सीरीजचा आगामी स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलिजी असलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. तर दुसरीकडे फोनच्या पावरफुल बॅटरीचा खुलासा करत कंपनीने सांगितले कि Vivo Z1 Pro मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. फोन मधील बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करेल.

32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेरा

Vivo Z1 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत कंपनीने या फोनचा कॅमेरा सेटअप पण समोर ठेवला आहे. भारतात लॉन्च होणार हा पहिला वीवो फोन आहे जो इन-डिस्प्ले कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या डिस्प्ले मधील होल मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Z1 Pro भारतात 32-मेगापिक्सलच्या सेेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. रियर कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर मिळतील.

असा असेल लुक

Vivo Z1 Pro ची डिजाईन पाहता हा भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला ऐसा स्मार्टफोन आहे ज्यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेव्हा वरच्या बाजूला छोटेसे छिद्र देण्यात आले आहे आणि याच छिद्रता सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात वर्टिकल शेप मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅशलाईट पण आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 32-एमपी इन-डिस्प्ले कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo Z1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-to-launch-in-india-32mp-in-display-camera-5000mah-battery-snapdragon-710-aie-chipset/feed/ 0
Vivo ने सादर केला आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Vivo Z1 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-punch-hole-display-triple-rear-camera-india-listed/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-punch-hole-display-triple-rear-camera-india-listed/#respond Thu, 13 Jun 2019 13:45:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4573 Vivo Z1 Pro चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x चा इंडियन वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

The post Vivo ने सादर केला आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Vivo Z1 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo काही दिवसात भारतात आपल्या झेड स्मार्टफोन सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Z series मध्ये नवीन फोन लॉन्च करणार असल्याची माहिती देण्यासोबत सांगितले कि भारतात येणार हा फोन Vivo Z1 Pro नावाने बाजारात येईल. आज फोन लॉन्चच्या आधी कंपनीने या डिवाईसचा लुक पण ऑफिशियल केला आहे. वीवो ने Vivo Z1 Pro चा फोटो शेयर केला आहे ज्यातून फोनचा डिस्प्ले, डिजाईन व संपूर्ण लुकची माहिती मिळाली आहे.

Vivo India ने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वर Vivo Z1 Pro चे प्रोडक्ट पेज बनवले आहे. या पेज वर फोनच्या नावासह याचा फोटो पण दाखवण्यात आला आहे. फोनच्या प्रोडक्ट पेज वर Vivo Z1 Pro चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. हे फोटोज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Vivo Z1 Pro अलीकडेच चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x स्मार्टफोनचा इंडियन वर्जन आहे. लुक आणि डिजाईन मध्ये हा फोन पूर्णपणे Vivo Z5x सारखा आहे.

असा असेल लुक
Vivo Z1 Pro ची डिजाईन पाहता हा भारतात लॉन्च होणार वीवोचा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तुम्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला छोटासा होल देण्यात आला आहे आणि या होल मध्ये सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo Z1 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लश लाईट पण आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

स्पेसिफिकेशन्स
Vivo Z1 Pro चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo Z5x चा इंडियन वर्जन असल्याचे बोलले जात आहे. Vivo Z5x चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.53-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वर सादर केला आहे जो एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9 वर सादर झाला आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट देण्यात आला आहे.

वीवो ने Vivo Z5x चीन मध्ये चार वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोन चा सर्वात छोटा वेरिंएट 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज व 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. Vivo Z5x चा सर्वात मोठा वेरिएंट 8जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. आशा आहे कि भारतात Vivo Z1 Pro पण या वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z5x ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एआई टेक्नॉलॉजी सह येतो. सिक्योरिटी साठी Vivo Z5x च्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो. वीवो ने चीन मध्ये हा फोन को ब्लू, ग्रे ब्लू आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला आहे. आशा आहे कि कंपनी Vivo Z1 Pro भारतात याच कलर वेरिएंट्स सह आणेल.

The post Vivo ने सादर केला आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Vivo Z1 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-punch-hole-display-triple-rear-camera-india-listed/feed/ 0