Vivo Z1 Pro 14,990 – Redmi Note 7 Pro 13,999 = 991, बघा काय मिळाले आणि काय गमवावे लागते

Vivo ने आज भारतीय बाजरात नवीन दाव खेळाला आहे. वीवो ने देशात आपले स्मार्टफोन्स वाढवत नवीन डिवाईस Z1 Pro लॉन्च केला आहे. Vivo Z1 Pro भारतात लॉन्च झालेला वीवो चा पहिला स्मार्टफोन आहे जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo Z1 Pro मीड बजेट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो शानदार फीचर्स सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. या सेग्मेंट मध्ये Vivo Z1 Pro ची पहिली टक्कर Xiaomi च्या Note 7 Pro शी आहे. एकीकडे देशात Xiaomi ची फॅन फॉलोइंग दमदार आहे तर दुसरीकडे Vivo फोन आवडणारे लोक पण काही कमी नाहीत. Vivo Z1 Pro ची किंमत 14,990 रुपयांपासून सुरु होत आहे तर Redmi Note 7 Pro ची स्टार्टिंग प्राइस 13,999 रुपये आहे. त्यामुळे प्रश्न असा उद्भवतो कि Vivo फोन घ्यावा कि Xiaomi. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन एक साथ वापरल्यानंतर हेच सांगितले आहे कि Redmi Note 7 Pro च्या तुलनेत लेटेस्ट Vivo Z1 Pro मध्ये काय मिळते आणि गमवावे लागते.

लुक व डिजाईन

Vivo Z1 Pro कंपनीचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. Redmi Note 7 Pro वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला होता तर Vivo Z1 Pro ने मार्केट मधील सर्वात नवीन ट्रेंड सह एंट्री घेतली आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप सोबत रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Z1 Pro साईजच्या बाबतीत Note 7 Pro पेक्षा मोठा आहे.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro च्या रुंद डिस्प्ले मुळे वन-हँड वापर कठीण वाटू लागतो.

रियर फिंगरप्रिंट साठी हात जास्त ताणावा लागेल.

मिळते

पंच-होल डिस्प्ले Vivo Z1 Pro ला खास बनवतो.

फोनचा कलर ग्रेडिएंट मित्रांमध्ये दिखावा करण्याच्या कमी येतो.

फुलव्यू डिस्प्ले फोनला आकर्षक करतो.

डिस्प्ले

Vivo Z1 Pro कंपनी द्वारा 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तर Redmi Note 7 Pro याच रेज्ल्यूशन सह 6.3-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. शाओमीने फोन स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 कोटेड ठेवली तर वीवो जेड1 प्रो मध्ये प्रोटेक्शन नाही.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro मध्ये स्क्रीन प्रोटेक्शन नसणे मोठी कमतरता आहे.

मिळते

मोठा डिस्प्ले असलेल्या फोन मध्ये वीडियो व गेमिंग एक्सपीरियंस शानदार मिळतो.

……..

प्रोसेसर

Vivo Z1 Pro आणि Redmi Note 7 Pro दोन्ही फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केले गेले आहेत. Vivo Z1 Pro 10एनएम टेक्नॉलजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720 एआई चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे तर Redmi Note 7 Pro स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो जो 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनला आहे. हे दोन्ही फोन ग्राफिक्स साठी एड्रेनो 612जीपीयू ला सपोर्ट करतात.

गमवावे लागते

प्रोसेसिंगच्या बाबतीत Vivo Z1 Pro मध्ये गमवण्यासाठी काहीच नाही.

मिळते

Vivo Z1 Pro मध्ये Redmi Note 7 Pro पेक्षा लेटेस्ट चिपसेट मिळेल.

स्नॅपड्रॅगॉन 720 आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह प्रोसेसिंग अजून चांगली करतो.

……..

फोटोग्राफी

Vivo Z1 Pro ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो पण Redmi Note 7 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Z1 Pro मध्ये तुम्हाला एफ/1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा वाइड एंगल लेंस + एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळेल. तसेच Redmi Note 7 Pro मध्ये एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर + 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro चा प्राइमरी सेंसर Redmi Note 7 Pro पेक्षा छोटा वाटतो.

मिळते

ट्रिपल कॅमेरा सेटअप कोणत्याही सेंसरची मेगापिक्सल पावर कमी करत नाही.

Vivo Z1 Pro मध्ये वाइड एंगल लेंस पॅनोरमा व लँडस्केप शॉट्स शानदार बनवतो.

……..

सेल्फी

Vivo Z1 Pro मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे वहीं Redmi Note 7 Pro को 13-मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता.

गमवावे लागते

फक्त Pout करण्याची स्टाईल तुम्हाला शिकावी लागेल.

मिळते

32-एमपी फ्रंट कॅमेरा सेल्फी लवर्स साठी खूप काही घेऊन आला आहे.

बॅटरी

Vivo Z1 Pro कंपनीने 5,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच Redmi Note 7 Pro मध्ये क्वालकॉम क्विक चार्ज 4 टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गमवावे लागते

मोठ्या बॅटरीमुळे फोनचे वजन पण थोडे वाढते.

मिळते

5,000एमएएच ची पावर संपूर्ण दिवस चालते.

18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मुळे मिनिटांत फोन चार्ज होतो.

……..

वेरिएंट्स आणि प्राइस

Vivo Z1 Pro

4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 14,990 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 16,990 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 17,990 रुपये

Redmi Note 7 Pro

4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 13,999 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 15,999 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

सध्या शब्दात म्हणायचे तर इथे Vivo Z1 Pro विकत घेतल्यास गमवण्यासाठी फक्त 991 रुपये आहेत तर त्या बदल्यात आकर्षक लुक, शानदार सेल्फी, फास्ट प्रोसेसर आणि ताकदवान बॅटरी मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here